पाण्याचे उद्दिष्टे मराठी निबंध | Panyache Udishte Essay in Marathi

पाण्याचे उद्दिष्टे मराठी निबंध | Panyache Udishte Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” पाण्याचे उद्दिष्टे मराठी निबंध | Panyache Udishte Essay in Marathi” या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

पाण्याचे उद्दिष्टे मराठी निबंध | Panyache Udishte Essay in Marathi

पाणी हेच आपले जीवन आहे. निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे पाणी आहे. या पाण्यावरच संपूर्ण सजीव सृष्टी अवलंबून आहे.

पाणी आपल्यापर्यंत पोहोचण्याचे स्त्रोत नदी, नाले, सरोवर, तलाव हे आपल्याला वाटत असतील तरी पाण्याचा हा एक मात्र स्त्रोत आहे तो म्हणजे ” पाऊस “.

अलीकडे वाढते प्रदूषण आणि वृक्षतोड यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन जमिनीतील पाण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.

पाणी आडवा पाणी जिरवा ” हे उद्दिष्ट समोर ठेवून पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. पाणी संरक्षण आणि पाण्याचे उद्दिष्टाचे मुख्य स्तंभ आहेत.ते स्तंभ म्हणजे जलसंवर्धन, पाण्याचा योग्य वापर, पाण्याचा पुनर्वापर आणि तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग.

पाण्याचे वरील उद्दिष्टे लक्षात ठेवून पाण्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहेत.

  1. जलसंवर्धन :

दरवर्षी आपल्या देशात 1068 मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. तरीसुद्धा आपल्या देशातील काही भागांमध्ये पाण्याच्या समस्या पाहायला मिळतात. यामागचं कारण म्हणजे योग्य जलसंवर्धन नसणे होय.

पाणी हे आपले जीवन आहे पाण्यावर संपूर्ण सजीव सृष्टी अवलंबून आहेत. पाण्याचा योग्य वापर केला नाही तर एक दिवस असा येईल की आपल्याला पिण्यासाठीही पाणी येणार नाही अशा परिस्थितीमध्ये जलसंवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.

  1. पाण्याचा सुयोग्य वापर :

आज भारतातील प्रत्येक मनुष्य हा पाण्याचा बेजबाबदारपणे आणि भरमसाठ वापर करीत आहे. आपले जीवन हे संपूर्ण पाण्यावर अवलंबून आहे आपण उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कार्यासाठी पाण्याचा वापर करीत असतो.

पाण्याचा मुख्य वापर होतो तो म्हणजे शेतीसाठी त्यातल्या त्यात भात शेतीसाठी पाण्याचा खूपच वापर केला जातो. त्यानंतर ऊस पिकासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्यामुळे पाण्याचा सुयोग्य वापर करणे अत्यंत गरजेचे आहे पाणी उगाच व्यर्थ न जाऊ देता पाण्याचा काटकसरीने आणि पाण्याचा सुयोग्य वापर वापर करणे आवश्यक आहे.

  1. पाण्याचा पुनर्वापर :

पाण्याच्या समस्या अलीकडे खूप पाहायला मिळतात. काही भागामध्ये तर पिण्यासाठी पाणी मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा पुनर्वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

जगभरातील  कित्येक देश पाण्याचा पुनर्वापर करतात. मात्र आपल्याकडे पाण्यावर पुनर्वापर करण्याची प्रक्रिया  ही तीस टक्क्यांपेक्षा कमी आहे. पाण्याचा पुनर्वापर करण्याची जबाबदारी उद्योग जगताने घ्यायला हवी. अनेक उद्योगाने हे काम पुढे नेऊन सुरू केले पाहिजे.

  1. तंत्रज्ञानाचा वापर :

जलसंवर्धन, पाण्याचा सुयोग्य वापर आणि पाण्याचा पुनर्वापर या तिन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. जे पाणी निर्माण होते, मात्र ते पाणी त्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचत नाही. म्हणजेच वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण भारतामध्ये 40 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून पाणी वाया न जाऊ देता ते साठवून ठेवले पाहिजे.

 जन आंदोलन आणि  जन चर्चेची गरज :

पाण्याचे महत्व आणि उद्दिष्टे पटवून देण्यासाठी जन आंदोलन आणि ज्याने चर्चा करणे अत्यंत गरजेचे भाग आहे. जलसंवर्धनासाठी आपण आठवड्यातून एक तास बाजूला ठेवून पाण्यावर चर्चा करायला हवी.

आज देशभरामध्ये विविध भागांमध्ये जलसंवर्धनाचे विविध उपक्रम पार पडले जात आहेत ही एक सकारात्मक गोष्ट आहे. एवढेच नसून नदीजोड प्रकल्प सुद्धा सुरू केले आहेत. भारतातल्या प्रत्येक घरात पाणी पाईपा मार्फत पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान यांनी जाहीर केली आहे.

तर मित्रांनो ! ” पाण्याचे उद्दिष्टे मराठी निबंध | Panyache Udishte Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” पाण्याचे उद्दिष्टे मराठी निबंध | Panyache Udishte Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

2 thoughts on “पाण्याचे उद्दिष्टे मराठी निबंध | Panyache Udishte Essay in Marathi”

Leave a Comment