Loans For Students । शैक्षणिक कर्ज संपूर्ण माहिती

Loans For Students । शैक्षणिक कर्ज संपूर्ण माहिती

मित्रांनो शिक्षण ही प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक गरज आहे प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळावा यासाठी आपले शासन प्रयत्न करत असते परंतु काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही यावर उपाय म्हणून सरकारने शैक्षणिक कर्ज देण्यास सुरुवात केली.

आजच्या ” Education loan kase milel ya var purn mahiti | शैक्षणिक कर्ज संपूर्ण माहिती” या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शैक्षणिक कर्ज बद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Loans For Students । शैक्षणिक कर्ज संपूर्ण माहिती

मित्रांनो, वर्तमान काळामध्ये शिक्षणाला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्यामुळे आज गरीब कुटुंबातील मुले देखील शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा बाळगतात परंतु हे शक्य झाले ते म्हणजे education loan मुळे.

भारतात शिक्षणाचा अधिकार (Right to Education) लागू झाल्यापासून पाल्य आणि पालक चांगले शिक्षण घेण्यासाठी शक्य असलेले सगळे प्रयत्न करतात.

गेल्य काही वर्षात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत. आणि पर्यायाने शिक्षणासाठी लागणारा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाऊन पोहोचतो.

अशा परिस्थिती मध्ये आपल्या मुलांना शिकवणे हे पालकांसाठी शक्य राहत नाही त्यामुळे कित्येक गरीब कुटुंबातील मुलांचे शिक्षण हे अपूर्ण राहते किंवा काही पालक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आर्थिक संपत्ती विकतात किंवा बँकांकडून लोन काढतात, याशिवाय

बरेच लोक Mutual Fund, Fixed Deposit, Real Eastate यामध्ये गुंतवणूक करून शिक्षणासाठी तजवीज करून ठेवतात.

तरीही बऱ्याच लोकांसाठी इतके महाग झालेले शिक्षण घेणे कठीण होऊन बसले आहे.

त्यामुळे कित्येक मुलांचे नुकसान होत आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज पुरवण्याचे सुरुवात केली आहे.

यासाठी भारतातील बँक Education Loan म्हणजेच शैक्षणिक कर्ज पुरवतात.

यासाठी केवळ विद्यार्थी प्रवेश घेतांना कधीही मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेत आहोत का याची खात्री करून घ्या.

कारण संस्था मान्यताप्राप्त नसल्यास अर्ज नामंजूर होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला शैक्षणिक कर्ज मिळत नाही. या लेखात आपण Education Loan बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहोत.

शैक्षणिक कर्जाची काही वैशिष्ट्ये education loan information in Marathi :

मित्रांनो शैक्षणिक कर्ज हे कोणत्याही व्यक्तीला दिले जात नाही त्यासाठी देखील काही अटी आहेत ज्या पुढीलप्रमाणे आहेत-

1) Education Loan चा अर्ज देणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे.

2) भारतात Education Loan सामान्यतः उच्च शिक्षणासाठी १० लाख आणि विदेशात शिक्षण घेण्यासाठी २० लाख दिले जाते.

3) भारतात Education Loan चे व्याजदर (Interest Rate) वेगवेगळया बँकांमध्ये ९.३०% ते १३% या दरम्यान आहेत.

4) Education Loan वर Income Tax च्या कलम 80 E नुसार सूट मिळते.

Education Loan साठीची पात्रता… :

शैक्षणिक कर्जासाठी आवशक्य पात्रता मित्रांनो जसे की आम्ही सांगितले आहे शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी विविध अटी आहेत व त्या प्रमाणेच शैक्षणिक कर्जासाठी विद्यार्थ्याकडे पुढील प्रमाणे आवश्यक ती पात्रता असणे आवश्यक आहे.

उच्च शिक्षणासाठी इच्छुक असलेला कोणीही उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

याशिवाय त्यांचे वय १८ पेक्षा अधिक असणे आवश्यक य आहे ज्याद्वारे तो शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतो/शकते.

साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला आहे त्यांचा अर्ज शैक्षणिक कर्जासाठी विचारात घेतला जातो.

कर्ज देण्याआधी बँक guarantor घेते. हे guarantor पालक किंवा नातेवाईक असू शकतात.

कोणत्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळते? :

विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळते.

भारतात किंवा भारताबाहेर उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळते. यात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे ज्यामध्ये तुम्ही, PHD, Engineering, Medical, dental, Management, Information Technology इत्यादी काही क्षेत्रामधील पदवी प्राप्त केलेली असेल किंवा पदवी प्राप्त करायचे असेल तर शैक्षणिक कर्ज दिले जाते.

आवश्यक असलेली कागदपत्रे (Documents Required for Education Loan) :

मित्रांनो जर तुम्हाला एज्युकेशनल लोन घ्यायचे असेल तर तुमच्याकडे पुढील प्रमाणे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुढे दिलेली आहेत.

  1. ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे प्रमाणपत्र
  2. बँकेचा अर्ज
  3. Guarantor चे Income Proof
  4. जर तुम्ही शिक्षण घेण्यासाठी विदेशात जात असल्यास युनिव्हर्सिटीचे पत्र
  5. विदेशात जात असल्यास Visa संबंधित कागदपत्रे.
  6. आवश्यक फोटोग्राफ, ID Proof, Address Proof.
  7. शैक्षणिक प्रमाणपत्रे
  8. जर तुम्हाला पदवी चे शिक्षण घेत असताना काही scholarship मिळाली असल्यास त्याची माहिती.
  9. तसेच बँकांकडून दिली जाणारी सूट आपण स्वतः माहीत करून घ्यावी. काही बँका मुलींच्या अर्जावर प्रिपेमेंट चार्जेस मध्ये सूट देतात.

तर मित्रांनो, ” Education loan kase milel ya var purn mahiti | शैक्षणिक कर्ज संपूर्ण माहिती” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!!

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment