आई संपावर गेली तर निबंध | Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

आई संपावर गेली तर निबंध | Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले  या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” आई संपावर गेली तर निबंध | Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आई संपावर गेली तर निबंध | Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

आई म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप असते. असे म्हणतात कि, देवाला प्रत्येका जवळ येऊन राहता आले नाही म्हणून त्याने आईला बनविले. म्हणून आई ही परमेश्वराने दिलेली उत्कृष्ट भेट आहे. म्हणूनच म्हटले जाते की, ” स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी “.

आई ही कधीही कोणाकडेही कसल्याही प्रकारची तक्रार न करता घरातील सर्व कामे स्वत: करते आणि घरातील सर्व सदस्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत असते.

पण तुम्ही कधी विचार केलाय जर आई संपावर गेली तर काय होईल? हा विचार माझ्या मनात आला आणि मी जागेवरच स्तब्ध झालो, कारण आजच्या जागांमध्ये संपावर जाणे एक प्रकारची फॅशनच झाली आहे.

आजकाल जो उठतो तो संपावर जातो आपण बातम्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये अनेकदा वाचतो आणि ऐकतो की, आज शेतकरी संपावर गेला, कधी शिक्षक संपावर गेला, तर कधी विद्यार्थी संपावर गेला. त्यामुळे माझ्या मनात विचार आला की, जर आई संपावर गेली तर?

खरंच! आई संपावर गेली तर माझे आणि माझ्या कुटुंबाचे काय हाल होईल. एकतर दिवसाची सुरुवात होती ती आईच्या हाकेने. जर मला आणि बाबांना आवाज देऊन उठवले नाही तर आम्ही उशीरापर्यंत झोपू. त्यामुळे मला शाळेत आणि बाबांना कामावर जाण्यासाठी उशीर होईल.

आई संपावर गेली तर सर्व कामे मला स्वतःला करावे लागतील. स्वतःचा अंघोळीचे पाणी गरम करावे लागेल आणि स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागतील. आई संपावर गेली असल्याने घरात वेळेवर चहा आणि नाश्ता सुद्धा बनणार नाही.

मग मला आणि बाबांना मिळूनच कसाबसा चहा आणि नाश्ता स्वतःलाच करावे लागेल. घरातील सर्व काम आटोपल्यानंतर मला शाळेत आणि बाबांना कामाला जायला लागेल एवढं सगळं करेपर्यंत किती वेळ जाईल, बापरे!

एवढेच नसून दुपारी घरी आल्यावर जेवणाची पुन्हा अव्यवस्था होईल. घरात जेवण तयार असणारे एक बाहेरून जेवण मागवावे लागेल नाहीतर मला आणि बाबांना मिळून घरातच जेवण बनवावे लागेल.

स्वयंपाक घरात पसरलेला सर्व पसारा आम्हालाच आवरावा लागेल. एवढे सगळे काम करून माझी तब्येत खराब झाली तर मला माझी काळजी स्वतःलाच घ्यावी लागेल. वेळेवर जेवण, औषध गोळ्या घेणे हे मलाच बघावे लागेल. मला स्वतःलाच दवाखान्यात जावे लागेल.

बाजार मध्ये जाऊन भाजीपाला किंवा इतर सर्व वस्तू मला किंवा बाबांनाच आणाव्या लागतील. जर आई संपावर गेली तर घरातील आणि घरातील सर्व कुटुंबाची  जबाबदारी माझ्यावर पडेल. आई जेवढ्या उत्कृष्ट पद्धतीने सर्व कुटुंबाचा सांभाळ करते तेवढा पद्धतीने मला करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण काही गोष्टी अश्या असतात त्या फक्त आईच करू शकते.

शेवटी सांगायचे एवढेच आहे की, आई कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांसाठी खूप कष्ट करीत असते. आई विना घर चालवणे कठीण आहे. जर आई संपावर गेली तर घरात बहीण भावाची भांडणे वाढते. घरातील प्रत्येक सदस्यांना सांभाळणे कठीण होईल. आई ज्याप्रमाणेच प्रत्येकाचे काळजी घेते त्याप्रमाणे काळजी घेणे शक्य होणार नाही.

घरातील वातावरण पूर्णता बिघडेल आणि अव्यवस्थितपणा वाढेल. आईमुळेच संपुर्ण कुटुंब संस्था टिकून असते.  प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आई पालनकर्ता पासून शिक्षकापर्यंतची सर्व भूमिका बजावते. म्हणून आपण आपल्या आईचा कायम सन्मान करावा.

कारण एक वेळ ईश्वर आपल्यावर नाराज राहू शकतो परंतु आई आपल्यावर कधीही नाराज राहू शकत नाही. हेच कारण आहे त्यामुळे आईच्या आणि मुलांच्या नात्यांना जगातील सर्वात श्रेष्ठ नागेश समजले जाते.

तर मित्रांनो ! ” आई संपावर गेली तर निबंध | Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट ( Points ) राहिले असतील तर आम्हाला कमेंट ( Comment ) करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

2 thoughts on “आई संपावर गेली तर निबंध | Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi”

Leave a Comment