स्वतःवर मराठी निबंध । Essay On Myself in Marathi

स्वतःवर मराठी निबंध । Essay On Myself in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी निबंध या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” स्वतःवर मराठी निबंध । Essay On Myself in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

स्वतःवर मराठी निबंध । Essay On Myself in Marathi

आपल्याला अनेकदा शाळा किंवा महाविद्यालयांमधील स्वतःवर निबंध लिहायला सांगितले जाते. तसेच स्वतः चा परिचय किंवा ओळखत सुद्धा सांगायला सांगितले जाते. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना स स्वत: बद्दल माहिती कशी सांगावी, याबद्दल पुरेसे ज्ञान नसल्याने विद्यार्थी स्वतःचा परिचय देण्यामध्ये अनेकदा चुकतात.

फक्त विद्यार्थीच नसून आपल्या तरी बऱ्याच व्यक्तींना सुद्धा स्वतःचा परिचय कसा द्यावा हे कळत नाही. वेळा इंटरव्यू मध्ये किंवा एखाद्या व्यक्ती समोर स्वतःचा परिचय देण्यामध्ये आपण चाचपतो.

या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व वेगवेगळ्या असल्याने प्रत्येकाचा  स्वतःचा परिचय हा वेगवेगळा असतो. ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक ओळख निर्माण होते.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” स्वतःवर मराठी निबंध । Essay On Myself in Marathi “ घेऊन आलो होतो ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये सर्वत: वर निबंध कसा लिहायचा याबद्दल पुरेशी माहिती मिळेल.

माझ्या स्वतःवर मराठी निबंध । Myself Essay in Marathi :

नमस्कार मित्रांनो! माझे नाव ” रवी जाधव” असे असून मी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. माझे वय 14 वर्षे एवढे आहे. मी ज्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेचे नाव “न्यू इंग्लिश स्कूल” असे आहे. व माझी शाळा ही माझ्या शहरातील उत्तम आणि आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते.

अशा या आदर्श शाळेचा मी एक आदर्श विद्यार्थी आहे. माझी शाळा ही माझ्या घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर असल्याने मी रोज शाळेमध्ये चालत जातो.

लहानपणापासूनच माझ्या घरातील सदस्यांचा आणि शाळेतील शिक्षकांचा मला एक आदर्श विद्यार्थी आणी चांगले संस्कार देण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी सोडलेली नाही.

मला माहिती नाही की मी कितपत आदर्श आहे. परंतु या समाजामध्ये एक चांगला व्यक्ती म्हणून वावरण्यासाठी असलेल्या सर्व गुणांचा अंगीकार मी नेहमीच करत असतो. वडीलधाऱ्या माणसाचे म्हणणे ऐकणे, वृद्ध किंवा गरीब व्यक्तींना सतत मदत करणे, प्रत्येक व्यक्तीची सुसंवाद साधणे, घर कामात आई-बाबांना मदत करणे हे कार्य मी लहानपणापासूनच करत आलो.

 माझे कुटुंब :

प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या मागे किंवा चांगल्या व्यक्तीमत्वा मागे त्याच्या कुटुंबाचा महत्त्वाचा वाटा असतो असे म्हणतात. आणि हे म्हणणे चुकीचे नाही. लहानपणापासून मिळणारे संस्कार आणि चांगल्या वाईट गोष्टीची जाणीवही आपल्याला प्रथम ते आपल्या कुटुंबातूनच मिळते.

मला देखील माझ्या कुटुंबातून चांगल्या वाईट गोष्टींचे संस्कार मिळाले आहेत. माझ्या कुटुंबा मध्ये एकूण सहा सदस्य आहेत. माझ्या कुटुंबात माझी आई-बाबा, काकू- काका, आजोबा, मी आणि माझ्या काकांचा मुलगा सोनू इत्यादी आम्ही सर्व एकत्रित आणि प्रेमाने राहतो.

मी दोन वर्षाचा असताना माझ्या आजीचे स्वर्गवास झाले. त्यामुळे लहानपणापासूनच मला आजीचे प्रेम मिळाले नाहीं. परंतु आजोबांनी आजीचे आणि आजोबांचे प्रेम दिले.

माझे बाबा शिक्षक आहेत. काका हे एक व्यापारी आहेत, तर माझी आई आणि काकू या गृहिणी आहेत. माझे आजोबा हे शेतकरी होते. अतिशय परिश्रम करून आजोबा हे बाबांना आणि काकांना शिकवले कदाचित त्यांच्यामुळेच आज माझे बाबा आणि काका त्यांच्या पायावर उभे आहेत.

बाबा शिक्षक असल्याने घरामध्ये शिस्तबद्ध आणि टापटीप राहण्याची सवय ही सुरूवातीपासूनच चालत आली आहे. माझे बाबा आणि काका हे प्रेमळ स्वभावाचे आहेत.

आई आणि काकू गृहिणी असल्याने घरातील प्रत्येक सदस्याचे काळजी घेण्यासाठी ते कधीही कंटाळा करत नाही. रोज नवीन नवीन पक्वान्न आई आणि काकू मिळून बनवतात.

घरात आलेल्या पाहुण्यांची मनापासून सेवा माझी आई करते. आई नेहमी मनात असते “अतिथी देवो भव:” घरात येणारा प्रत्येक पाहुणा हा देवाचा अंश असतो असे म्हणून माझी आई त्यांची सेवा करते.

माझे आजोबा आणि माझ्या मध्ये आपुलकीचा आणि प्रेमाचा बंध आहे. आजोबांबरोबर माझा मोकळा वेळ घालवण्यासाठी मला खूप आवडते. कारण आजोबा त्यांच्या जीवनातील अनुभव, पौराणिक कथा आणि भविष्याला किंवा अडचणीला साहसाने कसे तोंड द्यावे याबद्दल मार्गदर्शन करतात.

तसेच आजोबा आणि घरातील इतर सर्व सदस्य मला माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. ज्यामुळे माझे मनोबल वाढते आणि माझ्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

 माझी व्यक्ती महत्त्व :

मी एक शांत स्वभावाचा मुलगा आहे. मी सगळ्यांसाठी एक आदर्श आणि सुसंस्कृत मुलगा आहे. मला नेहमी गरीब आणि गरजू लोकांना मदत करायला आवडते. माझ्या द्वारे केलेले कोणतेही कार्य किंवा बोलणे यामुळे एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी मी घेतो.

तसेच मी सर्वांना आनंदीत पाहू इच्छितो. मला वाटते की, या पृथ्वीवरील गरीब असो किंवा श्रीमंत असो, उच्च जातीचा असो किंवा कनिष्ठ जातीचा असो शेवटी माणूस हा माणूसच असतो. त्यामुळे मला सर्वांची मदत करायला खूप आवडते. एक आदर्श व्यक्ती महत्त्व बनवण्यासाठी लागणारे सर्व गुण माझ्या अंगी यावी यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.

 माझ्यातील चांगल्या सवयी :

प्रत्येक व्यक्ती हा पूर्णता परिपूर्ण नसतो, हे विधान मला मान्य आहे. परंतु माझ्या अंगी बरेच चांगल्या सवयी आहेत. आणि या सर्वांच्या आधारे मी भविष्यामध्ये एक चांगला व्यक्ती बनवू शकतो. आणि माझ्यातील दुर्गुण आहेत त्यांना लक्षात घेऊन मी ते बदलण्यासाठी प्रयत्न करेल.

माझा मध्ये अनेक चांगल्या सवयी आहेत. कारण मी माझी सर्व कामे वेळेत पूर्ण करतो वेळेला महत्त्व दिले पाहिजे हे मला माझ्या बाबांकडून मिळालेली शिकवण आहे. मी माझा अभ्यास वेळेवर पूर्ण करतो.

मला विविध झाडांची व फुलझाडांची लागवड करायला खूप आवडते. तसेच मला माझ्या घरातील सर्व सदस्यांची काळजी घ्यायला खूप आवडते. मी माझा नेहमीच दिनक्रम ठरवला आहे त्यानुसारच मी माझी सर्व कामे करतो. मला माझ्या जीवनामध्ये एक यशस्वी डॉक्टर बनवायचा आहे आणि गरीब, अनाथ, गरजू लोकांची मदत करायची आहे.

मला आपल्या देशासाठी सहकार्याचा हातभार लावायचा आहे. आणि हे काढण्यासाठी मी डॉक्टर हे पद निवडेल. कारण देवानंतर दुसरा कोणी व्यक्ती असेल जो लोकांना जीवन देतो तो डॉक्टर असतो. त्यामुळे मला डॉक्टर बनायला आवडेल.

 माझा छंद :

त्याचे काही ना काही छंद असतात. त्याप्रमाणेच माझ्या देखील छंद आहेत. जसे की, रिकाम्या वेळेमध्ये मला चित्र काढणे, रंगवणे, गोष्टींची पुस्तके वाचणे, संगीत ऐकणे, टीव्ही बघणे आणि बाहेर फिरायला सुद्धा आवडते. वरील सर्व  गोष्टींना सोडून मला सर्वात आवडलेला छंद म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे. त्या सुट्टीमध्ये मी घरातील खराब वस्तू एकत्रित करून त्यापासून शोभेच्या वस्तू बनवीत असतो.

 माझ्या आवडत्या गोष्टी :

मला आईस्क्रीम खायला खूप आवडते. माझे बाबा मला तर रविवारी आईस्क्रीम खायला घेऊन जातात. मी मोठ्या आनंदाने स्वाद घेत आईस्क्रीम खातो. तसेच मला डोसा पण खूप आवडतो. वेळेस माझी आई माझ्यासाठी डोसा बनविते. या सोबतच मला प्राणी आणि पक्षी खूप आवडतात. विविध पक्षांचा आवाज ऐकणे हे माझे आवडते कार्य आहे.

मला प्राणीसुद्धा आवडतात त्यामुळे मी माझ्या घरांमध्ये एक कुत्रा पाळलेला आहे. व त्याचे नाव “टायगर” असे ठेवले आहे.

 निष्कर्ष :

मी माझ्या आयुष्यामध्ये नेहमीच आदर्श आणि यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करेन. मी माझे व्यक्तिमत्व अधिक  सुधरवण्यासाठी आणि माझ्यातील उणीव दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच मी इतर लोकांना मदत करण्यासाठी तत्पर राहीन व माझ्या सर्व आवडत्या गोष्टींची जोपासना करेन.

तर मित्रांनो ! ” स्वतःवर मराठी निबंध । Essay On Myself in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” स्वतःवर मराठी निबंध । Essay On Myself in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment