सर्व फळांची नावे आणि माहिती मराठी । All Fruit Name in Marathi

All Fruit Name in Marathi मित्रांनो आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे फळे आपल्याला पहायला मिळतात. परंतु आपल्यातील बहुतांश लोकांना खूप सार्‍या फळांची नावे माहिती नाही तर म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून आम्ही सर्व फळांची नावे मराठीमध्ये घेऊन आलो असतो तसेच त्या फळाच्या संबंधित थोडीशी माहिती देखील देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्येक कपत व्यक्तीला फळ खायला आवडत असते तर फळाचा स्वाद आणि चव देखील वेगवेगळे असतात फळे आणि आरोग्यासाठी खूप फायद्याची ठरतात. म्हणून मित्रांनो फळे खाल्लीच पाहिजेत.

सर्व फळांची नावे आणि माहिती मराठी । All Fruit Name in Marathi

संपूर्ण जगामध्ये अशी एकही व्यक्ती तसेच ज्या व्यक्तीला फळे खाणे आवडत नाहीत किंवा फळे खात नाही फळे सर्वांनाच आवडतात त्यामुळे सर्व फळांची नावे आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे म्हणून आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी All fruit name in Marathi | सर्व फळांची नावे मराठीत घेऊन आलोत.

Fruit name in Marathi | Marathi fruits name फळांची नावे इंग्रजी आणि मराठी मध्ये

1. Apple – सफरचंद ( Sapharachand ) :

सफरचंद या फळाला इंग्रजी भाषेमध्ये एप्पल असे म्हटले जाते. सफरचंद हे फळ कोणत्या हे पत्र मध्ये पाहायला मिळते. असे म्हणतात की, रोज एक सफरचंद हे फळ खाल्ल्यास डॉक्टर कडे जाण्याची गरज भासणार नाही कारण सफरचंद फळांमध्ये खूप पौष्टिक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. सफरचंद ह्या फळाची चव गोड आणि रसाळ असते सफरचंद लाल रंगाचे असते काही ठिकाणी हिरव्या रंगाचे देते सफरचंद मिळतात.

सफरचंदामध्ये सामान्य ते गंभीर शारीरिक समस्यांवरील उपचार करण्याची क्षमता आहे. सफरचंदचे गुणधर्म आपल्याला मधुमेह, हृदयरोग, दमा आणि अगदी कर्करोगापासून वाचवू शकतात. त्याचे मुख्य स्थान मध्य आशिया आहे. 

2. Apricot – जर्दाळू ( Jardalu ) :

जर्दाळू हा गोल अगर किंचित लांबट असून काहीसा चपटा असतो. आकार थोडा पीचसारखा, पण बराच लहान, रंग पिवळट असतो. फळ झाडावरच पिकू लागल्यास पीचसारखाच त्याचा मंद पण सुरेख गंध आसपास दरवळतो. जरदाळू या फळांमध्ये अ जीवनसत्व कॅल्शियम चे प्रमाण विपुल प्रमाणात असते त्यामुळे हे फळ खाल्ल्यास आरोग्याला खूप सारे फायदे होतात.

3. Banana – केळे ( Kele ) :

केळी या फळाला इंग्रजी भाषेमध्ये banana बनाना असे म्हटले जाते.
फळांमध्ये केळी फळांची सर्वाधिक जास्त चर्चा असते. हे असे फळ आहे जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते तसेच आणि स्वादिष्ट देखील असते. दररोज केळी खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं.

केळीच्या झाडाची लागवड केली जाते. केळीचे फळ गुच्छा मध्ये असतात. एका गुच्छात 10 ते 20 केळी असतात. केळीचे फळ हिरव्या रंगाचे असते. पिकल्यावर ते पिवळे होते.

4. Indian Black Berry/ Jamun – जांभुळ ( Jambhul ) :

जांभूळ हे फळ दिसायला जांभळ्या रंगाचे असतात त्यामुळे या फळाला जांभूळ म्हटले जाते . जांभूळ हे फळ चवीला आंबटगोड आणि तुरट स्वरूपाचे असते जांभळीच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतात जांभळाचे झाड हे खूप उंच असते. जांभूळ च्या झाडाला जांभूळ गुच्छा मध्ये येतात. कच्चे असताना जांबो हिरव्या रंगाचे असते हळूहळू पिताना याचा रंग जांभळा होत जातो पूर्ण पिकलेले जांभूळ हे जांभळ्या रंगाचे असते.

5. Chickoo Sapota – चिक्कु ( Chikku ) :

चिकू हे फळ खूप स्वादिष्ट आणि गोड असतो रसाळ फळ आहे. सामान्य तापमानाला चार दिवसांमध्ये चिकू हे फळ पहायला मिळते चुकू चा ज्यूस खूपच फेमस आहे.

6. Custard apple – सिताफळ ( Sitaphal ) :

सीताफळ एक उपोष्णकटिबंधीय फळ आहे आणि त्याचा आकार आणि फळांच्या वरच्या त्वचेची उग्र त्वचा त्याला पूर्णपणे वेगळी ओळख देते. पांढर्‍या रंगाचा लगदा मलईदार आणि दही सारखा ओला असून काळ्या रंगाचे बिया असतात. सिताफळ चवीला अतिशय गोड असते. या फळाचा व्यास 8 सें.मी. त्याचा आकार अनियमित गोल, हृदयाच्या आकाराचा आहे. या फळाचे बाह्य आवरण बरेच कडक आणि पातळ आहे. पिकण्यापूर्वी या फळांची काढणी केली जाते. पिकल्यानंतर हे फळ पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे असते. हे फळ बहुतेक वेस्ट इंडिजमध्ये, मध्य अमेरिका, पेरू, मेक्सिकोमध्ये मध्ये जास्त दिसते.

Dates – खजूर (khajoor)

खजूर हे फळ चवीने गोड असते. आहारामध्ये खजुराचा वा खारिकाचा उपयोग अतिशय महत्त्वपूर्ण आहे. उपवासाचा पदार्थ म्हणूनही अनेकजणं खजूर खातात. खजुरामध्ये शरीराला पोषक ठरणारी अनेक नसíगक अन्नद्रव्ये आहेत. कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस व ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, खनिजे, तंतूमय पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ हे सर्वच घटक खजुरामध्ये असतात. 

Figs – अंजीर (anjIr )

अंजीर फळे दिसायला उमरा प्रमाणेच असते परंतु चवीला खूपच स्वादिष्ट आणि गोड असते या फळाला इंग्रजीमध्ये फिग fig असे म्हणतात.अंजीर हे गोड – आंबट स्वरूपाचे लालसर रंगाचे फळ असते. अंजीर हे फळ शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे फळ आहे. अति दुर्लभ आणि शरीरासाठी पोषक अशी जीवनसत्त्वे अंजीर फळात आढळतात. त्यामुळे त्याचे नियमित सेवन म्हणजे दीर्घकालीन आरोग्य प्राप्तीच आहे.

Grapes – द्राक्ष (draksha )

द्राक्षे हा फळांचा एक प्रकार आहे जो लाकडाच्या वेलीवर वाढतो. त्याची वेळ इतर वेलींनपेक्षा मजबूत आहे. इंग्रजी भाषेत द्राक्षाला “Grape” म्हणतात. द्राक्ष हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. हे संस्कृतमध्ये द्राशा म्हणून ओळखले जाते. द्राक्षाचे मनुका देखील तयार करतात. शरीराला ऊर्जा प्रदान करण्यात हे खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले पोषक घटक आपले शरीर निरोगी ठेवतात. द्राक्षे अनेक रंगात येतात. वेगवेगळ्या प्रजातीनुसार हे वेगवेगळ्या रंगात घेतले जाते. परंतु बहुतेक हिरव्या रंगाची द्राक्षे दिसतात.

Guavas – पेरू (peru )

पेरू या फळाला इंग्रजी भाषेमध्ये “guavas” असे म्हंटले जाते. ते फळ चवीला आंबट गोड असते सामान्यता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पेरू फळ आपल्याला दिसते. या फळाच्या आत मध्ये मलाई सारखा सतो आणि लहान लहान अशा कडक बिया असतात.पेरू हे फळ आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते त्यामुळे बहुतांश वेळा डॉक्टर देखील पेरू खाण्याचा सल्ला देतात मुख्यता मधुमेह असलेल्या व्यक्तीला पेरू खाण्याचा सल्ला दिला जातो.बद्धकोष्ठता आणि पोटाच्या आजारासाठी पेरू अत्यंत फायदेशीर आहे. पेरू या खेळाला जांभ नावाने देखील ओळखले जाते. पेरू या फळाला विटामिन एसीचा चांगला स्रोत मानला जातो.

Jackfruit – फणस (phanas )

फणस झाडाच्या फळांमधील सर्वात मोठे फळ असते आणि त्याचे पिवळ्या रंगाचे चमकदार गरे अतिशय गोड आणि रसाळ असतात. त्यात आढळणारी बियाणे मोठ्या प्रमाणात स्टार्च व प्रथिने बनलेली असतात. हे फळ आशिया जॅकफ्रूट कच्चा असतो तेव्हा ते भाजी म्हणून खाल्ले जाते.जेव्हा फणस पिकला जातो तेव्हा त्यातील कावा काढून फळ म्हणून खाल्ला जातो. याव्यतिरिक्त, योग्य फणसमधले बियाणे देखील खाल्ले जाते, फणसाची भाजी विशेषता कोकणामध्ये खाली जाते. याची पौष्टिक सामग्री अनेक आश्चर्यकारक आरोग्य फायदे प्रदान करते. त्यात जीवनसत्त्वे ए, सी आणि बी 6, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन आणि मॅग्नेशियम यासारखे बरेच महत्वाचे पोषक घटक असतात.

Mango Ripe – आंबा (Amba )

फळांचा राजा म्हणून ओळखले जाणारे फळ म्हणजे आंबा होय. आंब्याला इंग्रजी माहिती Mango असे म्हटले जाते. आंबा अभि रसाळ आणि चवीला गोड असणारे फळ आहे. विशेषता उन्हाळ्यामध्ये आंबा हे फळ खायला मिळते. उन्हाळ्यामध्ये आंब्याचा आमरस देखील अधिक प्रसिद्ध आहे. जग भरामध्ये आंब्याच्या 1000 व अधिक वेगवेगळ्या प्रजाती आढळल्या जातात.

Mango Raw – कैरी (kairI )

कच्चा अंडा ला कैरीत असे म्हटले जाते कैरीचे आंबट असते तरी चालवण्याचा करण्यासाठी मुख्यता कैरि वापरली जाते. या व्यतिरिक्त कैरीचा शरबत देखील केला जातो.कैरीमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात त्यामुळे आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते.

Cantaloupe – खरबूज (kharabuj )

टरबूज प्रमाणे असणारे खरबूज येथील एक प्रकारचे फळ आहे हे विशेष स्थानात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिळते खरबूज चा शरबत देखील बाजारामध्ये मिळतो खरबूज बियांचा वापर ड्रायफूट मध्ये केला जातो हे फळ चवीला गोड असते. काय खरबूज हेका कॅण्डी तयार करण्यासाठी देखील वापरले जाते.

Orange – संत्री (santri)

संत्रे या फळाला इंग्रजी भाषेमध्ये ऑरेंज असे म्हणतात. संत्रे हे एक प्रसिद्ध फळ आहे जे जवळजवळ प्रत्येक देशात आढळते. संत्र्यामध्ये बर्‍याच प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच जर हे फळ नियमित सेवन केले तर शरीर बर्‍याच आजारांपासूनही वाचू शकते.

संत्रे एक प्रकारचे मधुर फळ आहे. संत्याची वरची साल भगव्या केशरी रंगाची असते. त्यात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. याशिवाय व्हिटॅमिन ए, बी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कोलीन इतर घटकांनी परिपूर्ण असतात. हे फळ सहज उपलब्ध होते आणि हे फळ साल कडून खाऊ शकते किंवा त्याचा रसही कडून पिऊ जाऊ शकतो. याशिवाय संत्रे फळापासून बनवलेल्या चहाचे सेवनही बरेच लोक करतात. हे फळ खाल्ल्याने त्वचा, शरीर आणि केस यांच्यावर बरेच फायदे होतात.

Papaya – पपई (papaI)

पपई हे फळ सहजरीत्या कोठेही आढळणार पोर आहे अगदी घराच्या अवतीभोवती थोडीशी जागा असेल आणि त्याठिकाणी पपईच्या बिया लावल्यास हे झाड सहजरीत्या येऊ शकते. पपई हे फळ कच्चे आणि पिकलेले असे दोन्ही प्रकारांमध्ये वापरले जाते.

कच्या पपई पासून चेरी बनवली जाते तर पिकलेली पपई ही फळे खाल्ली जाते. कच्ची असताना पपई हिरव्या रंगाचे असते पिकल्यानंतर त्याचा रंग केशरी होतो.

दात आणि घशातील दुखण्याबरोबरच अतिसार, जिभेच्या जखमा, जळजळ यासारख्या अनेक आजारांसाठी हे औषध म्हणून वापरले जाते.

Pineapple – अननस (ananas )

अननस “Pineapple” म्हणून ओळखले जाते, एक फळ आहे जे सामान्यतः हिरव्या रंगाचे असते आणि आतमध्ये किंचित पिवळसर, आंबट-गोड आणि रसिला असते. अननस एक अतिशय उपयुक्त फळ आहे. पूर्वीच्या काळात हे फळ केवळ मर्यादित कालावधीत उपलब्ध होते, परंतु बदलत्या काळाच्या कृषीशास्त्राने मोठी प्रगती केली आहे, इतकेच नाही तर हे बारा महिने मिळू लागले आहेत. अननस हे असे फळ आहे, ज्यामध्ये पौष्टिक पदार्थ भरपूर असतात.

Pomogranate – डाळिंब (Dalimb )

डाळिंब फळ आहे, ते लाल रंगाचे आहे. यात लाल रंगाचे शेकडो लहान परंतु रसाळ बी असतात . डाळिंब जगातील गरम प्रदेशांमध्ये आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने हे महत्वाचे फळ आहे. डाळिंबाची साल जितकी कठीण, तितकेच मधुर आणि गोड फळ असते. जर एखाद्या व्यक्तीस कोणताही आजार झाला तर लोक प्रथम त्यांना डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. अशक्तपणापासून मुक्त होण्यासाठी किंवा उपचारानंतर आरोग्यासाठी फायदे मिळवण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्यास सांगतात. आपल्याला हे देखील समजेल की डाळिंबाचे सेवन आपल्या आरोग्यास चांगले फायदे देते, डाळिंब फळच नाही तर संपूर्ण झाड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. जेव्हा डाळिंबाचे बरेच फायदे असतात.

Watermelon – टरबूज (Tarabuj ), कलिंगड (kalingad)

watermelon या फळाला कलिंगड असे म्हटले जाते. हे फळ खूप गोड असते विशेषतः उन्हाळ्यामध्ये कलिंगड हे फळ बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. कलिंगड हे दिसायला हिरव्या रंगाचे असते आणि आत मधील भागात लाल रंगाचा असून त्यामध्ये लहान काळ्या रंगाच्या बिया असतात. कलिंगड या फळांमध्ये जवळजवळ 97 टक्के पाणी असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे फळ खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात.

Sweet lime – मोसंबे (mosambe)

लिंबू प्रमाणे दिसणारे मोसंबी हे फळ चवीला आंबट आणि गोड असते त्याला प्रमाणात असते परंतु याचा आकार लिंबू पेक्षा थोडा मोठा असतो. कच्चे असताना हे फळ हिरवे असते पिकल्यानंतर याचा रंग पिवळा होतो. मोसंबी मध्ये अनेक पौष्टिक तत्वे असतात त्यामुळे डॉक्टर नेहमी मोसंबी फळ खाण्याचा सल्ला देत असतात.

Strawberry – स्ट्रॉबेरी (strawberry)

स्ट्रॉबेरी फ्रिग्रीया प्रजातीचे एक झाड आहे, ज्यासाठी जगभरात त्याची लागवड केली जाते. स्ट्रॉबेरीचा विशेष वास त्याची ओळख बनली आहे. ते चमकदार लाल रंगाचे आहे. हे ताजे, फळ म्हणून खाल्ले जाते, तसेच जॅम, ज्यूस, पाई, आइस्क्रीम, दुधाचे शेक इत्यादी स्वरूपात जतन आणि खाल्ले जाते.

Jujube – बोर (bor)

बोर हे फळ चवीला गोड, आंबट, तुरट अशा तीन प्रकारचे असते तसेच बोराच्या वेगवेगळ्या प्रजाती देखील पाहायला मिळतात. बोर या काळामध्ये अनेक प्रकारची तक्रार त्याची आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतात.

आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्यास बोर फळ आपल्याला यात मदत करू शकेल. हे आपल्याला चांगली झोप घेण्यास मदत करते, एंझाइम्सपासून मुक्त होते आणि रक्तदाब नियंत्रित करते. त्याची चव आंबट आणि गोड असते. हे लाल ते पिवळ्या, तपकिरी अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे फळ केवळ चांगली आणि शांत झोप आणत नाही तर असे बरेच फायदे देते. आयुर्वेदात बोर डोकेदुखी, रक्तस्राव, तोंडात अल्सर, अतिसार, उलट्या, मूळव्याध अशा अनेक रोग आहेत ज्यासाठी बोराची पाने, फळे आणि बियाणे चिंचेच्या वापरली जातात.

Coconut- नारळ( Naral)

श्रीफळ म्हणून ओळखले जाणारे नारळ हे फळ धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले जाते. कारण या पाण्याचा वापर मुख्यत अंडीवाला फोडण्यासाठी केला जातो तसेच नारळ या फळांमध्ये मिळणारे पाणी हे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे असते त्यावर डॉक्टर नेहमी नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. नारळ आणि फरक मोठ्या प्रमाणात पहायला मिळते.

Tamarind fruit – चिंच ( Chinch)

चिंच देखील एक प्रकारचे फळ चांगले चिंचोली चवीला खूप आंबट असतात. चिंचेचे झाड आकाराने खूप मोठे असते. चिंचेच्या झाडाला हजारोच्या संख्येने चिंचा लागतात. चीनची भीती आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.

Kiwi fruit- किवी

किवी हे फळ आंबट आणि गोड असते आणि हे सर्व देशांना रंगाचे असते परंतु आत मधील फिकट हिरव्या रंगाचा असून त्यामध्ये क*** रंगाच्या असतात की हे फळ आणि त्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते कारण की मी या काळामध्ये अनेक पौष्टिक तत्वे आढळतात.

तर मित्रांनो, ” सर्व फळांची नावे आणि माहिती मराठी । All Fruit Name in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

हे देखील अवश्य वाचा :

1 thought on “सर्व फळांची नावे आणि माहिती मराठी । All Fruit Name in Marathi”

Leave a Comment