पाणी वाचावा जीवन वाचवा । Save Water Save Lives Essay In Marathi

पाणी वाचावा जीवन वाचवा । Save Water Save Lives Essay In Marathi

प्रत्येकाला माहिती की अन्न, पाणी या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत. मूलभूत म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या गरजा. त्या नसतील तर आपण जगू शकत नाही.

अन्न नसेल तर सजीव एक आठवड्या पेक्षा जास्त जगू शकतो पण पाणी नसेल तर आपण जास्त काळ जिवंत राहू शकत नाही.यावरून कळते की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पाण्याला किती महत्त्व आहे.

तरी आज आपण ‘ पाणी बचत’ किंवा ‘ पाणी आडवा, पाणी जिरवा’ या विषयांवर निबंध बघणार आहोत. आपण लहानपणी शाळेमध्ये किंवा घरामध्ये शिकत असतो.

पाणी वाचावा जीवन वाचवा । Save Water Essay In Marathi

आई -वडील, आज्जी आजोबा नेहमी आपल्याला सांगतात कि पाणीचा जास्त वापर करू नका, ” पाणी हे आपले जीवन आहे” याचा अर्थ असा की आपल्या आयुष्यामध्ये पाणी खूप महत्त्वाचे आहे.

आपण ऐकत आलो की आपल्या पृथ्वीवर ७०% पाणी आहे व २९% जमीन आहे. यावरून आपण विचार करतो की आपल्या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात आहे.

पण खूप कमी लोकांना हे माहिती नाही कि या ७१% पाण्यापैकी ३% पाणी पिण्यायोग्य आहे.
यावरून कळते की आपल्याला पाण्याची कमतरता किती मोठ्या प्रमाणात पडू शकेल?

पाणी ही निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. विनामूल्य व मुक्तपणे पाणी आपल्या पर्यंत पोहोचते म्हणून आजच्या या आधुनिक काळात पाण्याची किंमत कमी होत चालली आहे. व दिवसंदिवस पाण्याची टंचाई वाढू लागली आहे.

जगभरातले शास्त्रज्ञ, संशोधक यांनी असा दावा केला आहे की भविष्यात जर तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठीच होईल. आणि आजचे ते १००% बरोबर आहे असे चित्र बघायला मिळत आहेत.

पाण्याचे समस्येने भयंकर रूप धारण केलेले आहे. प्रदूषणाने तर सर्व निसर्ग चक्रच बदलून टाकले.

पृथ्वीचे वाढते तापमान, बदलत जाणारे ऋतुचक्र, पावसाचे प्रमाण कमी व आफाट वाढत जाणारी लोकसंख्या, वृक्षतोड यामुळे पर्यावरणामध्ये अत्यंत खराब परिणाम होताना दिसत आहेत.

यामुळे मानव जातच धोक्यात येत नसून संपूर्ण सजीव सृष्टीला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.

साधारणतः असे मानले जाते भारत हा नद्यांचा देश आहे. हे बरोबरच आहे पण भारतामध्येही आज काही भागामध्ये पाण्याची भीषण समस्या बघायला मिळत आहे.

शहरी भागामध्ये तीन, चार दिवसाला एकदा तरी पाणी मिळते परंतु भारतातील काही ग्रामीण भागांमध्ये आजही पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक मैल लांब चालत जाऊन डोक्यावर बायका पाणी आणताना दिसतायेच.

आजही ग्रामीण भागामधील लोक एक थेंब पाण्यासाठी भटकंती करतात.

‘ जल- प्रदूषणाने’ हे विक्राळ रूप घेतले आहे. जल म्हणजेच पाणी. आणि पाण्याला जीवन मानले जाते पण वाढते शहरीकरण व औद्योगीकरण यामुळे पाणी दूषित होत चालले आहे तो पाण्याचा तुटवडा होत आहे.

कारखान्यांमधून निघणारे दूषित पाणी, नाल्यांमध्ये सोडले जाते त्यामुळे पाणी दूषित होते. प्लास्टिकच्या पिशव्या, पालापाचोळा नदीपात्रात टाकल्याने नदीपात्राच्या पाण्यावर दुर्गंधी येते मच्छर, डासांचे प्रमाण वाढते व पाणी दूषित होते.

पाण्याविना जीवनाचा विचार केला असता आपल्या जीवनाला काही अर्थ नाही.

दैनंदिन जीवनामध्ये ९०% कामांमध्ये आपण पाण्याचा वापर करतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण पाण्यामध्येच असतो असे म्हणणे देखील चुकीचे ठरणार नाही.

कारण प्रत्येकाला माहिती आहे की आपण दिवसभरा मधील सर्व कामांमध्ये पाण्याचा उपयोग करतो. तरी हि आपल्याला आज पाण्याची समस्या बघायला मिळत आहे.

पाण्याची किंमत सर्वांना कळावी म्हणून लहानपणापासून शाळा-महाविद्यालयांमध्ये पाण्याचे महत्व शिकवले जाते, कारण आज आपण पाण्याची बचत केलो तरच

उद्या येणाऱ्या भविष्यातील आपल्या पिढीसाठी पाणी शिल्लक राहील अन्यथा ही संपूर्ण सजीव सृष्टी पाण्या वितिरिक्त नष्ट होऊ शकते. म्हणून लहान मुलांचे पासूनच पाणी बचत करण्याचे संस्कार दिले पाहिजे व ते दिलेही जातात.

शाळेमध्ये अनेक उपक्रमाद्वारे देखिल ‘ पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा संदेश दिला जातो. त्यामुळे येणाऱ्या भविष्य कालीन पिढीसाठी आत्तापासून पाणी वाचवले पाहिजे.

आपल्या राज्यस्थान सारखा वाळवंटी प्रदेशांमध्ये पाण्याचा मोठा तुरवडा होत आहे. तेथील लोक पाण्याचा एक एक थेंबाला महत्व देतात. ती परिस्थिती आपल्याकडेही होऊ नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे.

आपल्या शरीरात स्थित असणाऱ्या प्रत्येक पेशीला त्यांचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पाण्याची अवश्यकता लागते, म्हणून आपण दिवसभरामध्ये कित्येकदा पाणी पितो व तसेच पृथ्वीवरील सर्व सजीवांना जगण्यासाठी पाणी लागतेच.

पण अलीकडे होणाऱ्या प्रदूषणामुळे पाणी दूषित होत चालले आहे. व पाण्याच्या समस्या उद्भवत आहेत. वृक्षतोडी मुळे झाडांचे प्रमाण कमी झाले व त्यामुळे पावसाचेही प्रमाण कमी झाले आहे.

वर्षभरात पावसाळ्यामध्ये पडणारा पाऊस कमी झाला व पाण्याचा तुटवडा होऊ लागला आहे.

पुर्वी पावसाळा आला की ओला दुष्काळ पडायचा हे आपण आपल्या आजी- आजोबांकडून ऐकले असेल. ओला दुष्काळ म्हणजे पावसाळ्यामध्ये अति पावसाने नद्या, नाले, तलाव यांना पूर.

महापूर येऊन गावांमध्ये पाणी शिरायचे त्यामुळे अनेकांना अन्न, निवार्‍या शिवाय हाल होते. येऊन त्याला ओला दुष्काळ म्हणतात. परंतु पूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप फरक असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी पाण्यामुळे लोकांचा मृत्यू होत तर आज पाणी नाही म्हणून लोक आत्महत्या करत अर्थात आजच्या परिस्थितीला कोरडा दुष्काळ म्हणले तरी चालेल.

कोरडा दुष्काळ म्हणजे पाण्याशिवाय दुष्काळ. पाण्या विना अनेक लोक आत्महत्या करण्याच्या बातम्या रोज ऐकतो आपण. मग हे असे होऊ नये म्हणून देखील काहीतरी केलेच पाहिजे ना?

दुष्काळ परिस्थिती होऊ नये म्हणून पाण्याचा वापर काटकसरीनेच केला पाहिजे. पाण्याच्या एक थेंबाला हि महत्त्व दिले पाहिजे. सांडपाणी, पिण्याचे पाणी जेवढे लागेल तेवढेच वापरले पाहिजे कारण आपण आज वाचिवलेले पाणी उद्या आपल्याला वापरता येऊ शकेल.

काही ठिकाणी तर सांडपाणी ला Recycle करून तेच पाणी पुन्हा वापरतात आणले जाते त्यामुळे पाण्याची बचत होते.

शेतीमध्ये देखील पिकांना जेवढे पाणी उपयुक्त आहे तेवढेच दिले पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये पाणी खूप महत्त्वाचे आहे हा विचार करून पाणी साठवले पाहिजे.

नद्या, तलाव मधील पाणी घोषित न करता योग्य रीतीने साठवल्यास वर्षभर पाण्याचा तूरडाळ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

काही ठिकाणी Rainwater Harresting केली जाते. म्हणजेच पावसाच्या पाण्याची साठवण करून ते पाणी पुन्हा आपल्या वापरात आणले जाते.

पावसाचे पाणी घराच्या, इमारतीच्या छतावरून पडणारे पाणी जमिनी खाली टाकीमध्ये गोळा केली जाते व तसेच पाणी नंतर वापरात आणले जाते.

काही ठिकाणी खोल खड्डे, विहिरी यांच्या मध्ये देखील पाण्याची साठवण केली जाते. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी हि वाढली जाते व पाण्याची बचत होते.

अशा प्रकारे अनेक उपक्रमाद्वारे देखील पाण्याची बचत केली जाते ” पाणी आडवा, पाणी जिरवा” या उपक्रमांमधून लोकांमध्ये पाण्याच्या बचतीसाठी जनजागृती केली जाते.

पाणी हे आपले जीवन आहे. आपण आपल्या जीवनाचा उपयोग गिरी तुला केला पाहिजे. प्रत्येकाने पुढे येऊन पाणी वाचवले पाहिजे व येणाऱ्या आपल्या पिढी साठी पाण्याची बचत केलीच पाहिजे.


ये देखील अवश्य वाचा :-