माझा आवडता विषय‌ इतिहास मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh

माझा आवडता विषय‌ इतिहास मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता विषय‌ इतिहास मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की ,या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता विषय‌ इतिहास मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh

शालेय जीवनामध्ये आपण विविध विषयांचा अभ्यास करीत असतो. परंतु त्यातील काही विषय आपले खूप आवडीचे असतात आणि विषयाचा आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास करतो. परंतु शालेय जीवनातील प्रत्येक विषय हे आपल्या जीवनाला नवीन वाटचाल देणारे असतात.

जसे की इतिहास हा विषय. बहुतेक जण आला इतिहास विषय वाचण्यासाठी खूप कंटाळा येतो. पण त्यांना माहिती नाही की इतिहास विषयात आपल्याला जीवन जगण्याची नवीन प्रेरणा मिळू शकते.

आपण जेव्हा भारताचा इतिहास वाचतो तेव्हा तो इतिहास आपल्या जीवनाला नवीन वळण देण्यासाठी उपयोगी ठरू शकतो.

भारताचा इतिहास पाजल्यास आपल्याला कळून येईल की आपल्या देशावर कितीक वेळा मोगलांनी आक्रमण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्यासाठी किती बलिदान केले. थोडक्यात इतिहास म्हणजे प्राचीन काळामध्ये झालेल्या सर्व गोष्टींचा एक पुरावाच आहे. त्यामुळे माझा आवडता विषय इतिहास आहे.

प्रत्येकाच्या जीवनामध्ये विद्येला खूप महत्त्व आहे. विद्येविना जिवन जणू अपूर्णच आहे. आपल्या जीवनाला भविष्याला उज्वल काढण्यासाठी आपण शिकलेच पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार आपले करियर निवडते. कोणाला मराठी विषय आवडतो तर कोणाला शास्त्र त्याप्रमाणेच माझा आवडता विषय इतिहास आहे.

इतिहासाचा अर्थः घडून गेलेल्या घटना असा होतो. प्राचीन काळामध्ये ज्या घटना घडून गेल्या आहेत त्यांचा पुरावा हा इतिहास विषयांमध्ये पाहायला मिळतात. इतिहासामध्ये घडून गेलेला घटना, प्रसंग, व्यक्ती महत्त्व यांचे वर्णन केलेले असते. तसेच इतिहासामध्ये थोर लोकांची माहिती असते. कार्य, शोध, युद्ध, प्रगती यांमध्ये लोकांनी केलेले कार्य व त्यांचे बलिदान याची माहिती इतिहास आपल्यापर्यंत पोहोचतो.

तसेच इतिहास आणि भविष्यामध्ये काय फरक आहे हेसुद्धा इतिहासावर आपण जाणून घेऊ शकतो. इतिहासाच्या ज्ञानाशिवाय आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही.

त्यामुळे मला इतिहास विषय खूप आवडतो मी या विषयातील खोलवर अभ्यास केला आहे. इतिहास विषयांमध्ये अधिकच रुची निर्माण झाली. रशियाच्या अभ्यासा मधून मला भारतीय संस्कृती, सिंधू संस्कृती याची माहिती मिळाली.

तसेच इतिहास विषयातून मला भारतातील जैन आणि बौद्ध धर्माचा उदय, सिकंदर चे भारतावर आक्रमण, इस्लामचे भारतात आगमन, अकबर, जहांगीर, औरंगजेब, शहाजान, छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट या सर्वांबद्दल ची माहिती आपल्याला इतिहास या विषयात दोनच प्राप्त होते.

असे म्हणतात की पूर्वी भारतामधून सोन्याचा धूर निघत होता परंतु इंग्रजांनी भारतातील सर्व साधन संपत्ती लुटून आपल्या देशांमध्ये घेऊन निघून गेले. 150 वर्षापेक्षा अधिक काळ इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले. आपल्या स्वार्थासाठी इंग्रजांनी देशावर राज्य केले देशातील सर्व मालमत्ता साधनसंपत्ती भारतातून ते आपल्या देशात घेऊन गेले.

परंतु आपल्या देशाला अशा इंग्रजांच्या ताब्यातून, गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या भारतामध्ये जन्म घेतला जसे की राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महान पुरुष आणि आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिली. या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला इतिहासामध्ये सविस्तर प्रकारे वाचायला मिळेल.

आपल्या इतिहासात कोणकोणती  युद्ध होऊन गेले याची माहिती सुद्धा  इतिहासातून मिळते. एवढेच नसून इतिहासातून आपल्याला तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती पहायला मिळते. तसेच  त्या काळातील शिक्षण पद्धती धर्मप्रसार,   राहणीमान, संस्कृती, वस्त्रकला, व त्या काळातील साहित्याची ज्ञान मिळते.

इतिहास हा असा विषय आहे जो आपल्याला आपल्या देशावर प्रेम करायला भाग पाडतो. तसेच एकोप्याची भावना, जातीभेद ,धर्मवाद सर्व काही विसरून एकत्र राहण्यासाठी प्रोत्साहित करतो.

इतिहासातून आपल्याला जीवन जगण्यासाठी नवीन सुवर्ण किरण पाहायला मिळते. इतिहास आपल्या आजच्या जीवनाला बदलण्याची ताकद देऊ शकतो. इतिहासातील घटना आपल्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी करण्यासाठी कारणीभूत ठरतात.

तसेच इतिहासात बांधलेल्या वास्तु म्हणजेच प्रेमाचे प्रतीक असलेले ताजमहाल, अजिंठा वेरूळच्या लेण्या, लाल किल्ला, सिंधुदुर्ग अशी ऐतिहासिक पर्यटन स्थळ आजही पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. व आपल्या इतिहासकालीन संस्कृतीचे जिवंत उदाहरण आपल्या समोर सदर करतात.

इतिहास आपल्याला व्यक्तीची आणि राष्ट्राची प्रगती दर्शवतात. तसेच आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका पुन्हा न करण्याची प्रेरणा इतिहासातून मिळते. आपला ज्ञानसंग्रह वाढवण्याच्या दृष्टीने माझ्यामते इतिहासात सर्वात चांगला विषय आहे. त्यामुळेच इतिहासाविषयी मला खूप आवडतो आणि माझा आवडता विषय आहे.

तर मित्रांनो ! ” माझा आवडता विषय‌ इतिहास मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझा आवडता विषय इतिहास मराठी निबंध “ यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिले असेल तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment