होम इन्शुरन्स घेण्याचे फायदे । Home Insurance ghyayche Fayade

Home Insurance ghyayche Fayade

मित्रांनो स्वतःचे घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी काही जण दिवस-रात्र कष्ट करत असतात. आणि या कष्टातून स्वतःचे घर साकारत असतात. पण आपण जे घर घेतो त्या घराची सुरक्षितता ठेवणे आणि सुरक्षितता विचार करणे हे देखील महत्त्वाची गोष्ट आहे. घराची चोरी किंवा त्यात ठेवलेल्या वस्तू किंवा कोणतीही दुर्घटना या पासून घराचे होणारे नुकसान वाचवण्यासाठी Home insurance खूप फायद्याचे ठरते.

होम इन्शुरन्स घेण्याचे फायदे । Home Insurance ghyayche Fayade

नैसर्गिक आपत्ती असो किंवा कृतीम आपत्तीमुळे आपल्या घराचे होणारे नुकसान गृह विम्यामध्ये तुम्हाला या सर्व नुकसान ना साठी संरक्षण मिळते म्हणून स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर त्यासोबत होम इन्शुरन्स देखील घ्यावा. कारण होम इन्शुरन्स घेण्याचे फायदे हे वेगवेगळे आहेत.

म्हणून मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Benefits of home insurance in Marathi | होम इन्शुरन्स घेण्याचे फायदे सांगणार आहोत.

गृह विम्याचे फायदे । Home Insurance ghyayche Fayade

मित्रानो तुम्ही एखाद्या अपारमेंट विकास घेत असाल किंवा स्वतःचे घर बांधत असाल तेव्हा तुमच्या घराच्या वैयक्तिक सामानाचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच होम इन्शुरन्स असणे देखील अत्यंत आवश्यक आहे.

स्वतःचे घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर खरेदी करून लोक त्यांच्या राहण्याचे कायमचे ठिकाण बनवतात. त्याच वेळी, काही लोक त्यांची गुंतवणूक किंवा बचत मालमत्तेत ठेवतात. ही सर्व कामे कोणत्याही व्यक्तीच्या कष्टाने आणि कष्टाने कमावलेली असतात. अशा परिस्थितीत घर खरेदीसोबतच घराचा विमा घेणेही महत्त्वाचे ठरते.

मित्रांनो आपण नेहमी पाहतो की, घर खरेदी केल्यानंतर बरेचसे लोक घराच्या विम्याकडे लक्ष देत नाहीत. कारण त्यांना वाटतं की, गृह विमा हा फारसा फायद्याचा नाही किंवा त्याची आवश्यकता आपल्याला भासत नाही. त्यामुळे बहुतांशी लोक डोहाल माकडे दुर्लक्ष करतात वरू गृह विमा काढत नाही. परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का इतर कोणत्याही विम्याप्रमाणे, गृह विमा तुमच्या वाईट काळात जास्त उपयोगी पडतो. नैसर्गिक आपत्तींमुळे किंवा कृत्रिम आपत्तीमुळे लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत, गृह विमा पॉलिसीधारकाला आर्थिक मदत पुरवतो.

गृह विमा सामान्यतः भूकंप, वीज, वादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे मालमत्तेचे आणि सामग्रीचे नुकसान कव्हर करते. मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास तेही कव्हर केले जाते. त्यामुळे स्वतःचे घर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने home Insurance काढावा.

पावसामुळे तुमच्या घराचे विविध प्रकारे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही घराचा विमा घेताना, पूर आराखड्यात वैयक्तिक गोष्टींचाही अंतर्भाव आहे की नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. ओवा सर्व गोष्टीचा उल्लेख करूनच गृह विमा घ्यावा जेणेकरून तुमच्या आपत्कालीन काळामध्ये तुमच्या घराचे होणारे नुकसान home Insurance च्या अंतर्गत कव्हर केले जाईल.

तसेच होम इन्शुरन्स घेत असताना पेमेंटच्या अटी आणि किमान रक्कम कपात करण्याच्या अटी आधीच जाणून घेणे उचित आहे. गृहकर्ज घेताना खरेदी केलेल्या गृह विमा पॉलिसीमध्ये फक्त इमारतीच्या संरचनेचे संरक्षण होते. ते घरगुती वस्तू आणि इलेक्ट्रिकल उपकरणे यासारख्या गोष्टी कव्हर करत नाहीत, ज्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी खराब होऊ शकतात.

Hole insurance घेताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? :

मित्रानो आता आपणास कळालेच असेल कि होम इन्शुरन्स हा आपल्या घरासाठी आणि घराच्या संरक्षणासाठी व सुरक्षितेसाठी किती महत्त्वाचा आहे. तसेच होम इन्शुरन्स केस असताना काही गोष्टी आहेत त्यांची काळजी घेऊन होम इन्शुरन्स काढावा.

  1. कोणत्याही मध्यस्थ याशिवाय कर्ज घ्यावे-

जर तुम्ही कोणत्याही मध्यस्थ शिवाय घेत असाल तर याचे खूप फायदे होतात. असे कर्ज घेत असताना तुम्ही ऑनलाईन माध्यमाचा वापर करावा. यामुळे तुमचे वेळ आणि श्रम दोन्ही वाचले.

  1. सर्वसमावेशक धोरण निवडा-

सामान्यता होम इन्शुरन्स द्वारे घरगुती वस्तूंसाठी स्वतंत्र दिले जाते. परंतु या व्यतिरिक्त तुम्ही एक सर्वसमावेशक पॉलिसी निवडली तर त्याच्यामार्फत तुम्हाला दरोडा, आग, दहशतवादी हल्ला यामुळे देखील तुमच्या घराच्या होणारे नुकसान कवर केले जाते.

  1. Home insurance चा दावा कसा करावा? किंवा नुकसान भरपाई कशी भरून काढावी?

मित्रांनो जर तुमचे नुकसान झाले असेल आणि तुम्हाला नुकसानभरपाई भरून काढायचे असेल तर घराची सर्व कागदपत्रे आणि विम्याची कागदपत्रे एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे.

विम्याचा दावा करण्यापूर्वी तुमच्याकडे सर्व माहिती असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक होम इन्शुरन्स विमा देणार या कंपनीची कालमर्यादा देखील वेगळी असते.

म्हणून तुम्हाला त्या बद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही वेळेत दावा करू शकता.

  1. योग्य होम इन्शुरन्स कसा निवडावा?

मित्रांनो तुम्हाला योग्य इन्शुरन्स निवडायचा असेल तर तुम्ही एजंट ची मदत घेऊ शकता एजंट तुम्हाला चांगला होम इन्शुरन्स पॉलिसी कुठली आहे याचे ज्ञान देतात. तसेच एजंट तुमची परिस्थिती ,घर, स्थान , ठिकाण यावरून योग्य इन्शुरन्स घेण्याचा सल्ला देतात.

तर मित्रांनो, ” Home Insurance ghyayche Fayade” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!!!

Leave a Comment