माझा आवडता विषय‌ विज्ञान मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh

माझा आवडता विषय‌ विज्ञान मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता विषय‌ विज्ञान मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता विषय‌ विज्ञान मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh

विज्ञान विषय कोणाला आवडत नाही ? विज्ञानाच्या जोरावर तर आज आपल्या जगाने एवढी प्रगती केली आहे.विज्ञान हा आपल्या संपूर्ण जगावर राज्य करित आहे. विज्ञान विषयामध्ये आणखी प्रगती व्हावी. विज्ञानाच्या जोरावर अनेक नवीन नवीन शोध लाभते याकरिता लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची शिक्षण दिले जाते.

शाळेमध्ये मुख्यता सहा विषय असतात त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, हिंदी या विषयांचा समावेश होतो. परंतु या सर्व विषयांमध्ये माझा आवडीचा विषय म्हणजे विज्ञान हा आहे कारण विज्ञानामुळे मला जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते. विज्ञानात रोज चा रोज नवीन नवीन आहे ना गाडी शिकायला मिळत असते.

विज्ञानातील गणिते प्रयोग, नियम, संकल्पना या सोडवणे मला खूप आवडते. या कारणामुळेच माझा आवडता विषय विज्ञान आहे.

इयत्ता पाचवी पासून मी विज्ञान विषयाचे नाना घेत आलो. सुरुवातीला मला विज्ञान हा विषय खूप अवघड वाटेल परंतु जसजसे मी या विषयांमध्ये तल्लीन होत गेलो तसतसे विज्ञाना विषय मला आवडत गेला. आणि आज माझा आवडता विषयी विज्ञान आहे.

विज्ञाना मुळे मला खूप काही शिकायला मिळाले. प्रत्येक दिसणार्‍या सजीव वस्तूंमध्ये तसेच भौतिक वस्तू त्याच्या असण्यामागे आणि कार्य करण्यामागे असणारी कारणे ही खूप गूढ आहेत आणि हे आपल्या सर्वांना माहिती असणे खूप गरजेचे आहे. परंतु हे सर्वांना सांगणे सहज रित्या सोपे नाही. त्यामुळे हे सांगण्याचे काम विज्ञान विषय करतो. आणि विज्ञानावर सहजरीत्या सर्वजण विश्वास सुद्धा ठेवतात.

विज्ञान विषयामध्ये असलेल्या अनेक नवीन गोष्टी मला कळू लागल्या आणि विज्ञान विषयामुळे आपले जीवन परिवर्तन होऊ शकते याची जाणीव मला होऊ लागल्यापासून मी अत्यंत प्रखरतेने विज्ञान विषयाचा अभ्यास करू लागलो.

विज्ञान विषय माझा आवडता विषय बनवण्यामागे आणखी एक कारण म्हणजे आमच्या शाळेतल्या विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणजे कदम सर होय. त्यांनी विज्ञानातील प्रत्येक व्याख्या, संकल्पना, नियम आणि रिआक्शन अगदी उत्तम रित्या शिकविले. तसेच प्रत्येक प्रयोग हा अगदी उत्तम रित्या शिकविला यामुळे विज्ञान विषयी आवडणामध्ये आणखीन भर पडली.

आमच्या शाळेमध्ये विज्ञान विषयाची भव्य अशी प्रयोग शाळा आहे. ज्यामध्ये आठवड्यात दोन वेळा आम्हाला विविध प्रयोग प्रात्यक्षिक रित्या करून दाखवले जातात.

मला विज्ञानाचे प्रयोग करायला खूप आवडतात त्यामुळे मी शाळेमध्ये शिकवलेले सर्व प्रयोग घरी येऊन पुन्हा करून पाहत असतो. आणि माझ्या प्रयोगामध्ये मला आई बाबा मदत करतात.

मला विज्ञान विषय खूप आवडतो. त्याबद्दल सर्व माहिती मी मोबाईल, कॉम्प्युटर वर्तमानपत्रांत मध्ये आलेल्या लेखाद्वारे घेत असतो. तेरे शाळेमध्ये शिकलेली विज्ञानातील एखादी संकल्पना मला कळाली नाही तर मी पुन्हा सरांना विचारून त्याबद्दल संपूर्ण ज्ञान घेतो.

बुद्धीचा संपूर्ण विकास आणी उपयोग हा तर्कशुद्ध विचाराने होत असतो, आणि असे विचार करण्याची शक्ती विज्ञानातून दिली जाते. निसर्गातील कितीतरी अशा घटना आणि नियम आहेत जे अजूनदेखील शोधले गेलेले नाहीत. त्यासाठी विज्ञान सतत प्रयत्न करीत आहे.

आज आपल्या अवतीभवती झालेली प्रगती हेदेखील विज्ञान चे दिलेली देणगी आहे. मोबाईल, संगणक, तंत्रज्ञान, भौतिक सुविधा आणि दळणवळणाची साधने हे सर्वकाही विज्ञानामुळे शक्य झाले आहे. विज्ञान हा असा विषय आहे जो फक्त शाळेत पुरताच मर्यादित नसून आपल्या दैनंदिन जीवनात वापरला जातो.

मला विज्ञान विषयाचा खूप आवडतो. त्यासोबतच माना भविष्यात शास्त्रज्ञ किंवा संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. संशोधन हे नुसते विश्वास देऊन चालत नाही तर त्यासाठी पुरावा द्यावा लागतो. आपण जेथे राहतो, जगतो, क्रिया करतो आणि निसर्गात जे जे घडते या सर्वामागे शास्त्रीय कारण आहे. या सर्व गोष्टी मागे कारण शोधले जाते त्याला विज्ञान चा शोध असे म्हटले जाते.

विज्ञानामुळे आपले जीवन सुखी आणि समाधानी झाले आहेत. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विज्ञानाला खूप महत्व आहे. आपण आपल्या रोजच्या जीवना मध्ये विज्ञान जगतो, पाहतो आणि त्याच्यासोबत खेळतो सुद्धा. त्यामुळे अशा या उत्तम कामगिरी करणारा क्षेत्रातील विज्ञान विषय

मला खूप आवडतो.माझी इच्छा आहे की, मी सुद्धा या विषयांमध्ये माझी उत्कृष्ट कामगिरी करून माझे नाव उंच करावे. असा हा माझ्या भविष्याला उज्वल करणारा विज्ञान विषय मी लहानपणापासून शाळा महाविद्यालयांमध्ये शिकत आलो आहे. आणि माझी इच्छा आहे की, मी पुढेही शिकत राहावे आणि त्याच विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी.

तर मित्रांनो ! ” माझा आवडता विषय‌ विज्ञान मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” माझा आवडता विषय‌ विज्ञान मराठी निबंध | Maza Avadta Vishay Marathi Nibandh “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment