वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध | Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध | Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध | Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi “ घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईटवर हे सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध | Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi

संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग मांडला आहे तो म्हणजे असा की,

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

पक्षीही सुस्वरे। आळविती।।

येणे सुख रुचे एकांताचा वास।

नाही गुणदोष। अंगी येत।।

वृक्ष खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात.

आपण जर वृक्षरोपण केले वृक्षांचे योग्य पालनपोषण केले तर त्यांच्यापासून आपल्याला विविध गोष्टी प्राप्त होतात. ज्या भागांमध्ये वृक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्या भागातील परिसर हा स्वच्छ आणि निसर्गमय पाहायला मिळतो.

आपल्या आजूबाजूला असलेली झाडे ही आपल्याला अन्न, वस्त्र, फळे, फुले, पाने, आयुर्वेदामध्ये औषध उपचार म्हणून अनेक झाडांचा वापर केला जातो.

तसेच पर्यावरणातील काही झाडांपासून रबर आणि विविध प्रकारचे इंधन सुद्धा प्राप्त होते. आपल्या सभोवतालचे अनेक लहान पक्षी या झाडांच्या आधारेच आपले घर बांधतात व विसावा घेतात.

आपल्या आजूबाजूला असलेल्या या वृक्षांमुळे निसर्ग सुंदर होऊन जातो. तसेच निसर्गात असलेल्या विविध झाडांमुळे आपला निसर्ग हिरवागार सुद्धा दिसतो. वृक्षांचा मानवाला होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे ऑक्सिजन होय.

तसेच आपल्या वातावरणातील हवा शुद्ध करण्यासाठी आणि पर्यावरणात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची ठरतात. वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आपली हवा शुद्ध होते.

वृक्षांमुळे आपल्या जीवनात येणाऱ्या खूप सार्‍या अडचणी आणि समस्या दूर करण्यासाठी फायदा होतो. प्रत्येकाला हिरव्यागार आणि निसर्गमय व मनाला मोहक करणाऱ्या निसर्गामध्ये वेळ घालवायला खूप आवडते. त्यामुळे या निसर्गाला आणखीन निसर्गमय आणि सुंदर करण्यासाठी झाडे भर घालतात.

वृक्षांना आपले मित्र म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही कारण, वृक्ष आपल्यासाठी खूप मदत करतात वृक्ष आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचे अपेक्षा न ठेवता त्यांच्यापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टी मनुष्याला प्रदान करतात. वृक्ष हे पर्यावरणाचे संतुलन नीट करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू वृक्ष सोसून घेतात व मानवाला जीवनावश्यक असलेला ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात त्याच्यामुळेच या पृथ्वीवर सर्व सजीव सृष्टी टिकून आहे. आज वृक्ष अस्तित्वात आहे म्हणूनच सजीवांच्या अस्तित्व टिकून आहे.

हे वृक्ष आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त करून देतात. वृक्ष हे जीवनावश्यक ऑक्सिजन वायू तर देतातच व त्यासोबत फळ फुले इंधन वारा सावली इतर अनेक गोष्टी सुद्धा देतात. वृक्ष निस्वार्थी पणाने आपल्या मनुष्याचे आयुष्य टिकून राहावे यासाठी सतत काम करीत असतात.

अलीकडे जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि हवा प्रदूषण यांसारख्या प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवले आहेत. या प्रदूषणामुळे मनुष्याला आले कडे अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मामा तिला हवा प्रदूषण कमी करण्याचे काम वृक्ष करतात.

एवढेच नसून अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती, वृक्ष औषधी निर्मिती करताना वापरले जातात. गंभीर आजारांवर अशा वनस्पती चे गुणधर्म वापरून आजार बरे केले जातात.

आपल्या जीवनामध्ये ऑक्‍सिजन ना जेवढे महत्त्वाचे स्थान आहे तेवढेच मोठे स्थान पाण्याला देखील आहे वेळेवर पाऊस पडला नाही तर आपल्याला पाण्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पाऊस पाडण्याच पोषक वातावरण हे वृक्ष तयार करतात त्यामुळे वृक्षांना निसर्गामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते.

जमिनीची होणारी धूप हीदेखील खूप मोठी समस्या आहे आणि ही समस्या रोखण्यासाठी वृक्ष खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.वृक्षांचे मुळे जेव्हा जमीन खाली जातात तेव्हा ते जमिनीला व माती ला घट्ट धरून ठेवतात त्यामुळे जमिनीची होणारी धूप रोखण्यास मदत होते.

अलीकडच्या काळात दिवसेंदिवस माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मोठे मोठे उद्योग धंदे उभारण्याच्या दृष्टिकोनातून वृक्षांची मोठी तोड करत आहे त्यामुळे वायू प्रदूषण वाढ होऊन जागतिक तापमान वाढ असे परिणाम दिसून येत आहेत.

प्रदूषण वाढल्याने मनुष्याला श्वसनाचे आणि हृदयाचे आजार उद्भवत आहेत जागतिक तापमानामुळे त्वचेचे रोग , कर्करोग यांसारख्या समस्या दिसत आहेत.

वेगवेगळे वायूचा ज्वलनाने व इंधन ज्वलनाने घातक वायू वातावरणामध्ये सोडले जातात त्यामुळे वायू प्रदूषण होते आणि हे प्रदूषण रोखायचे असेल तर आपल्याला अधिक अधिक वृक्षांची लागवड करायला हवी. जर आपण जास्त वृक्षांची लागवड केली तर प्रदूषण कमी होईल त्यासोबत आपल्याला शुद्ध हवा देखील मिळेल.

त्यामुळे मनुष्याला आपले अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला अधिकाधिक वृक्ष लागवड करायला हवी. वृक्षांची संख्या कमी झाली तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल जसे की वृक्षांची संख्या कमी झाल्याने अलीकडे पावसाचे प्रमाण देखील कमी झाले त्यामुळे काही भागांमध्ये दुष्काळासारख्या परिस्थिती उद्भवली आहे.

तसेच वृक्षांची संख्या कमी झाले तर जमिनीची धूप होऊन जमीन नापीक होऊ शकते. आपणच आतापासूनच वृक्षलागवड करायला सुरुवात केली तर आपल्याला शुद्ध हवा मिळेल त्या सोबतच वृक्षांपासून आपल्याला आणि जीवनावश्यक गोष्टी सुद्धा प्राप्त होतील.

वृक्ष आपल्याला लाकूड, फळे-फुले, सावली, कडक उन्हापासून आपले संरक्षण करतात. झाडे स्वतः ऊन, वारा, थंडी अशी प्रत्येक परिस्थिती सहन करतात व मनुष्याला आवश्यक वस्तू प्राप्त करून देतात.

त्यामुळे पर्यावरणाचे प्रत्येक वृक्षांची जबाबदारी घेणे त्यांचे संगोपन करणे व जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहे.

सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षरोपण करणे याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करायला हवे.” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या वाक्याचा अर्थ सर्वांनी समजून घेऊन त्यानुसार आपले वर्तन व करते हे गरजेचे आहे.

वृक्षांचे महत्त्व संपून जनतेला पटवून देण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा, वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन असे विविध उपक्रम घेऊन झाडाचे महत्व संपूर्ण जनतेला सांगणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment