अण्णाभाऊ साठे मराठी निबंध | Annabhau Sathe Nibandh in Marathi

अण्णाभाऊ साठे मराठी निबंध | Annabhau Sathe Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” अण्णाभाऊ साठे मराठी निबंध | Annabhau Sathe Nibandh in Marathi “ घेऊन आलोत. आम्हाला खात्री आहे की या वेबसाईटवर हे सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

अण्णाभाऊ साठे मराठी निबंध | Annabhau Sathe Nibandh in Marathi

आपल्या भारत देशामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले अशा समाजसुधारणा पैकी एक म्हणजे अण्णाभाऊ साठे होय.

अण्णाभाऊ साठे एक समाज सुधारक होते त्यासोबत साहित्यकार, कवी, लेखक, कादंबरीकार, लावणी, पोवाडे, आश्या वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले नामांकित मराठी साहित्यिक म्हणून देखील अण्णाभाऊ साठे यांना ओळखले जाते.

आपण जरी अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखत असेल तरी अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव ” तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे” असे आहे.

ब्रिटिश राज्यकर्त्याने ‘गुन्हेगार’ म्हणून असा शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्यील वाटेगाव या लहान असता गावामध्ये झाला.

अण्णाभाऊ भाऊ साठे यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले नाही तरी देखील त्यांनी अक्षर ज्ञान प्राप्त करून घेतले.

अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी इयत्ता साहित्य प्रकार त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर आणि अशिक्षित असे व्यक्ती अण्णाभाऊ साठे यांनी या क्षेत्रामध्ये आपले महत्त्वाचे कामगिरी बजावली.

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवन प्रवासामध्ये अनेक कथा, कादंबऱ्या, नाट्य, लोकनाट्य, चित्रपट, लावण्या, गवळण, प्रवास वर्णन आशा प्रकार सशक्त आणि समृद्ध केले.

तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या शाहीर अण्णाभाऊ साठे यांनाच जाते. आण्णा भाऊ साठे यांनी आपल्या प्रत्येक साहित्यातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केला. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यरचना चा वापर त्यांनी कष्टकरी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व त्यांना अभिनय प्रेरणा देण्यासाठी केला.

स्वतंत्र पूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील अण्णाभाऊ साठे यांनी राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्र राज्यात पूर्णता जनजागृती केली.

आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचा महत्त्वाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम यांसारख्या आंदोलनांमध्ये त्यांनी आपले सहकार्य दाखवले.

1944 ला अण्णाभाऊ साठे यांनी “लाल बावटा” या नावाचे पथक स्थापन केले आणि बघता बघता त्यांच्या हे पथक संपूर्ण देशभरात पसरले. अण्णाभाऊ साठे यांची अनेक लावण्या आणि चित्रपट खूप प्रसिद्ध आहे त्यातील काही लावण्या म्हणजे ‘ माझी मैना गावाकडे राहिली’ आणि ‘ माझ्या जीवाची होतीय काह्यली’ या अण्णाभाऊ साठे यांच्या सुप्रसिद्ध लावण्या आहेत.

आण्णा भाऊ साठे यांचे चरित्र देखिल लीहली त्यातील प्रसिद्ध झालेले चरित्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र होय. शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांनी रशियन भाषेमध्ये भाषांतर केले. यासाठी त्यांना पुढे राष्ट्र अध्यक्षांकडून सन्मान देखील मिळवला.

16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी शिवाजी पार्क येथे ” ये आजादी छूटी है, देश कि जनता भुकी है” असा नारा दिला. त्यावेळी पावसाने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते तरीसुद्धा अण्णाभाऊ साठे या पावसाला न घाबरतात ते शिवाजी पार्कवर हा नारा देत उभे राहिले.

अण्णाभाऊ साठे आणि आपल्या जीवनामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी साहित्य रचना केली. त्यांनी आपल्या अल्पायुष्य मध्ये 21  ग्रंथ संग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबरीची रचना केली.

अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या सातपेक्षा अधिक कादंबऱ्या वर मराठी चित्रपट देखील काढलेले आहेत. तर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या “फकीरा” या कादंबरीला 1961 ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी चा पुरस्कार मिळाला आणि मराठी साहित्य मध्ये आपले महत्त्वाचे योगदान देणारे वि. स. खांडेकर यांनी देखील या कादंबरीचे कौतुक केले.

अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या फकीरा या कादंबरीमध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांचे  खनिजे, अन्नधान्य, संपत्ती लूटून आपल्या देशातील गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकीरा या मांग समाजातील  लढाऊ तरुणाचे चित्रण केलेले आहे.

तर “वैजयंता” या कादंबरीमध्ये अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या वैजयंता या कादंबरीमध्ये प्रथमताच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केलेले आहे.

तसेच त्यांनी लिहिलेल्या “माकडाची माळ” या कादंबरीमध्ये भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म असे चित्रण केलेले आहेत. घरगडी, कोळसेवाला, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार,  मजूर अशा विविध रचना अण्णाभाऊ साठे यांनी रंगविल्या.

अण्णाभाऊ साठे मराठी साहित्याला लाभणारे खरोखरच एक अनमोल असे रत्न होते. तसेच त्यांची निरीक्षण शक्ती देखील अतिशय   सूक्ष्म आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या लेखनशैलीला मराठमोळ, रांगडा आणि लोभस घट आहे असे म्हटले जाते.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment