आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी । Rashtradhwaj Essay in Marathi

आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी । Rashtradhwaj Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी । Rashtradhwaj Essay in Marathi “  घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे कि, या वेबसाईटवरील सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी । Rashtradhwaj Essay in Marathi

भारतीय राष्ट्रध्वज हा भारताचा अभिमान आहे. भारतीय राष्ट्रध्वजाला भारतातील सर्व जनता तिरंगा या नावाने ओळखते. भारतीय राष्ट्रध्वज 12 जुलै 1947 रोजी म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या चोवीस दिवस अगोदर अंगीकारला होता. त्या अगोदर म्हणजेच 24 मार्च रोजी इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला होता.

नंतर भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा, त्याचा आकार कसा असावा, रंग कसा असावा यासाठी तातडीने बैठक करण्यात आली. त्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, भारताचा राष्ट्रध्वज काँग्रेस ध्वज हा स्वतंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करण्यात यावा.

परंतु, या ध्वजाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र असावे. अशाप्रकारे 22 जुलैला भारताच्या राष्ट्रध्वजाला परवानगी मिळाली. तिरंगा ध्वज हा भारताचा राष्ट्रीय अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला.

त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्याने म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी पहिल्यांदा भारताच्या आधिपत्याखालील अधिकृत ध्वज झाले.त्यानंतर भारतीय ध्वज म्हणून तिरंगा ध्वज कायम ठेवण्यात आला.

 राष्ट्रध्वजाचे वर्णन :

भारतीय राष्ट्रध्वज हा भारताच्या स्वतंत्र चे आणि अखंडते चे प्रतीक आहे. भारतीय राष्ट्रध्वज हे कोणत्याही परकीय हस्तक्षेपाशिवाय राष्ट्राच्या स्वतःच्या लोकांद्वारे चालवले जाते.

भारताचा राष्ट्रीय ध्वज हा आयताकृती तिरंगा आहे. तिरंगा म्हणजे तीन रंग असलेला. भारताच्या तिरंग्यामध्ये प्रामुख्याने तीन रंग आहेत परंतु मध्ये असलेले अशोक चक्र हे निळ्या रंगाचे असल्याने भारताच्या तिरंग्यात चार रंगाचा सामावेश होतो.

भारतीय तिरंगा च्या वरच्या बाजूला केसरी रंग, मध्ये पांढरा तर खाली हिरवा रंग आढळतो. पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. अशाप्रकारे तीन रंगाचे पट्टे मिळून भारताचा आयताकृती तिरंगा बनला आहे. मधोमध निळ्या रंगाचे एकूण 24 आरे असलेले अशोक चक्र आहे. भारताच्या ध्वजा मध्ये असलेले हे तीन रंगातून काहीना काही बोध मिळतो तो म्हणजे-

 केसरी रंग :

भारताचा राष्ट्रध्वज मध्ये असलेला सर्वात वरचा केशरी रंग हा त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे.

 पांढरा रंग :

भारताचा राष्ट्रध्वज्यातील सर्वात मधला रंग म्हणजे पांढरा रंग. प्रकाशाचा आणि सत्य मार्गाचा तसेच शांती आणि पवित्र याचे प्रतीक आहे.

 हिरवा रंग :

भारताच्या राष्ट्रध्वजात असलेल्या सर्वात शेवटी चा हिरवा रंग. हा हिरवा रंग निसर्गाचे भूमीशी असलेले नाते दर्शवितो तसेच हिरवा रंग हा समृद्धीचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे.

 अशोक चक्र :

भारताच्या राष्ट्रध्वजात असलेले निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे बदलत जाणारे जगाचे प्रतिक आहे. जीवन गतिमान आहे सर्व भारतीयांनी शांततापूर्वक आगेकूच करावी असे हे चक्र दर्शवते.

असे म्हणतात ,मुख्यता हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धर्मचक्र आहे. त्याला अशोक चक्र या नावाने ओळखले जाते.

 ध्वजांचा इतिहास :

प्राचीन काळापासूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ध्वजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ध्वजाचे परंपरा ही प्राचीन काळापासूनच आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात आढळतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा केशरी रंगाचा ध्वज हा आपल्याला पाहायला मिळतो.

1831 साली राजा राममोहन रॉय हे बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी इतरांच्या बोटीवर त्यांचा तिरंगा झेंडा लावण्याचे बघीतले. तेव्हा त्यांना वाटले की, आपल्या देशालाही असा राष्ट्रध्वज लाभावा. अशा प्रकारे प्राचीन काळापासूनच राष्ट्रध्वजाला आणण्यास साधारण महत्त्व आहे.

 राष्ट्रध्वज कसा बनवितात :

राष्ट्रध्वज बनवण्यासाठी खास प्रकारच्या खादी कापडाचा वापर केला जातो. राष्ट्रध्वज बनविण्यासाठी सुती कापड किंवा रेशीम कापड वापरले जाते. मुख्यता महात्मा गांधी आणि लोकप्रिय केलेले खादी कापडाचा वापर केला जातो.

राष्ट्रध्वज बनवण्याचा हाक्क कोणालाही नसून तो फक्त विशिष्ट भारतीय मानक कार्यालये व ध्वज निर्मिती केंद्र यांना दिला जातो. ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाकडे आहे. कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ हा साल 2009 पर्यंत एकमेव ध्वज निर्मिती केंद्र होता. राष्ट्रध्वजाचा वापर सर्वसामान्य केवळ  स्वतंत्रदिन आणि प्रजासत्ताक दिन याच दिवशी करतात. इतर वेळेस राष्ट्रध्वजाचा वापर काढण्यास मनाई आहे.

ध्वजाचा वापर भारतीय ध्वजसंहिता आणि राष्ट्रीय चिन्हाशी संबंधित इतर कायद्याद्वारे केला जातो.

 राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली :

राष्ट्रध्वज ही आपल्या देशाची शान आणि अभिमान आहे. त्यामुळे आपला राष्ट्रध्वज हा कशाप्रकारे फडकवला पाहिजे यासाठी काही नियमावली बनवण्यात आली आहे. ध्वज संहितांनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज खाली हळूहळू उतरवला पाहिजे.

राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना बागुल वाजवण्याची प्रथा आहे. राष्ट्रध्वजाचा केसरी रंग हा वरती झाला पाहिजे अशा प्रकारे ध्वज फडकवणे गरजेचे आहे.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला पाहिजे की, उपस्थित मान्यवरांचे तोंडाच्या डाव्या बाजूला राष्ट्रध्वज आला पाहिजे. तसेच राष्ट्रध्वज फडकवताना किंवा उतरताना व्यक्तिपरीच्या सावधान स्थितीत असायला हवा. खाजगी नागरिकांनी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन सोडून इतर वेळेस राष्ट्रध्वज फडकण्यास मनाई आहे. राष्ट्रध्वज पायाखाली किंवा जमिनीवर पडता कामा नये.

तसेच संहितेनुसार, राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या वेळेस ध्वज हा व्यक्तीच्या उजव्या हातात असावा. त्याप्रमाणेच फाटलेला, मळलेला राष्ट्रध्वज फडकवताना कामा नये.

तसेच राष्ट्रध्वजाच्या रंगाची कपडे, परदे किंवा अन्य कुठल्याही कामासाठी राष्ट्रध्वजाचे कापड वापरले जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याप्रमाणेच राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण किंवा जाहिरात केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

जर सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून राहा राष्ट्रध्वज जात असेल तर त्यांनी मान पूर्वक राष्ट्रध्वजाला वंदन केले पाहिजे.

 देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज :

भारतातील पंजाब राज्याच्या अटारी येथे भारतीय सीमेच्या आत तीनशेसाठ फूट म्हणजेच एकशे पाच मीटर उंचीचा राष्ट्रध्वज हा भारतातील सर्वात उंच राष्ट्रध्वज म्हणून ओळखला जातो. या राष्ट्रध्वजाची लांबी 120 फूट आहे तर रुंदी ही  80 फूट एवढी आहे.

पुण्यातील कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला  दोनशे सदोतीस फूट उंचीचा राष्ट्रध्वज हा महाराष्ट्रातील सर्वात उंच राष्ट्रध्वज आहे.

कोल्हापूर येथे 82 फुट उंचीचा  राष्ट्रध्वज आहे.

 निष्कर्ष :

भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा हा भारतातील राष्ट्रीय सणांच्या वेळी फडकवला जातो. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा हा भारताचा अभिमान आहे. शांततेचे ,समृद्धीचे प्रतीक असलेला हा तिरंगा ध्वज.

या ध्वजाचा आपण मनपूर्वक आणि  सन्मानाने त्याला फडकवणे आणि उतरवत राहणे याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपला राष्ट्रध्वज इतरत्र कुठेही पडता कामा नये. त्याची संपूर्ण दक्षता घेणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

तर मित्रांनो ! ” आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी । Rashtradhwaj Essay in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी । Rashtradhwaj Essay in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असतील तर,कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

2 thoughts on “आपला राष्ट्रध्वज निबंध मराठी । Rashtradhwaj Essay in Marathi”

Leave a Comment