विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी । Vidnyan Shap Ki Vardan Nibandh In Marathi

विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी । Vidnyan Shap Ki Vardan Nibandh In Marathi

तर मित्रांनो! आपण नेहमी म्हणत असतो की, आजचे जग हे विज्ञानाचे जग आहे परंतु नेमके तुम्हाला माहिती आहे का विज्ञानाचे जग म्हणजेच काय?

प्राचीन काळामध्ये अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टी या आत्ताच्या काळामध्ये साध्य झालेल्या आहेत नवनवीन शोध लागलेले आहेत नवीन शास्त्रज्ञाने निर्माण केलेल्या शोधांवर आजचे जीवन सोपे आणि सोयीस्कर झाले आहे.

विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी । Vidnyan Shap Ki Vardan Nibandh In Marathi

आजच्या आपल्या जीवनावर विज्ञानाने इतका प्रभाव पाडला आहे की त्याचा विचार करणे देखील शक्य नाही. कदाचित आजच्या काळामध्ये चे काही प्रगती झाली आहे त्यामुळे आजच्या जगाला विज्ञानाचे जग म्हणून ओळखले जाते.

अभियांत्रिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपला विकास झाला आहे बरोबर परंतु या विकासासोबत मानवाच्या अस्तित्वाला देखील धोका पोहोचला आहे त्यामुळे आज सगळ्यांसमोर हा प्रश्न उठत आहे की, विज्ञान शाप की वरदान?

विज्ञान म्हणजे काय ?

विज्ञान म्हणजे एखाद्या कोणत्याही वस्तू किंवा विषयाबद्दल संपूर्ण, विशेष आणि पद्धतशीर ज्ञान असणे. एवढेच नसून विज्ञान म्हणजे आपल्या सभोवताली आपल्या शहरांमध्ये मनामध्ये जे काही क्रिया घडतात त्या क्रिया घडण्यामागचे कारण शोधणे.

घडत असणाऱ्या प्रक्रिया आणि त्या का घडतात यांच्यातील नाते त्यांच्यातील नाते शोधणे याचेच नाव विज्ञान आहे आणि त्या शोधून काढण्याच्या पद्धतीचे नाव देखील विज्ञानच. आज पर्यंत घडत आलेले विविध प्रकार आणि झालेली प्रगती हेदेखील विज्ञानाचं परिणाम आहे.

विज्ञान शाप की वरदान ?

विज्ञानाच्या प्रगतीमुळे आजच्या काळात जगणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे सरल, सुखी आणि सोपे झाले आहे. आज विज्ञानाचे जितके फायदे आहेत किंबहुना त्यापेक्षा अधिक विज्ञानाचे तोटे देखील जगासमोर उभे आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडत आहे की विज्ञान शाप की वरदान?

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान आणि आपली बाजी मारलेली पाहायला मिळते. विज्ञानाने आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी कार्यक्षमतेमध्ये वृद्धी झाली.

प्राचीन काळामध्ये अशक्य वाटलेले कार्य आजच्या काळामध्ये शक्य झाले आहेत. एवढेच नसून पूर्वीच्या काळामध्ये एखादे कार्य करण्यासाठी तासन्तास लागणारा वेळ विज्ञानामुळे आता फक्त काही मिनिटात मध्येच ते कार्य पूर्ण करू शकतो.

परंतु विज्ञानामुळे जेवढ्या सुखसुविधा आपल्याला उपलब्ध झाले आहेत त्यापेक्षा अधिक दुष्परिणाम देखील आपल्यासमोर आहेत हे विसरता कामा नये.

विज्ञानाला आपण ज्या दृष्टिकोनातून पाहतो तो दृष्टिकोन आपल्या समोर उभा राहतो. म्हणजे विज्ञानाला जर आपण वरदान रूपाने पाहिले तर विज्ञानाने मानवी कल्याणासाठी अनेक साधने उपलब्ध करून दिलेली आहेत.

प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विज्ञानाच्या सहवासामध्ये आपले कार्य करीत असतो. विज्ञानाचा वापर केल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीचे कुठलेच कार्य पूर्ण होऊ शकत नाही.

विजेचा शोध हादेखील विज्ञानाचा एक सर्वात मोठा शोध आहे आज विजेचा शोध लागला म्हणून आपण सर्वजण विजेवर कपडे धुणे, अन्न शिजवणे, पाणी गरम करणे, पंखा चालविणे, दूरदर्शन, मोबाईल इत्यादी चार्ज करणे इत्यादी सर्व औद्योगिक प्रगती विज्ञानाने लावलेल्या विजेच्या शोधांमुळे शक्य झाली आहे.

तसेच वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये विज्ञानाने लावलेले शोध हे देखील प्रशंसनीय आहे. जसे की, विमानाचा, रेल्वेचा, गाडी, मोटार सायकल, सायकल, कार इत्यादी शोध आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत.

या वाहतुकीच्या साधनांमुळे आज मनुष्य एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे शक्य झाले आहे. एवढेच नसून अंतराळ राधाचा शोध लागला म्हणूनच आजच्या काळातील म्हणजे चंद्रावर देखील जाणे शक्य झाले आहे.

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान यामध्ये विज्ञान तर खूप महत्त्वाचे कामगिरी बजावते. विज्ञानामुळे कॉम्प्युटर, दूरदर्शन, मोबाईल आणि आकाशवाणी इत्यादी संशोधनाचा शोध लावला.

याशिवाय विज्ञान आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पहायला मिळते. शेती क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि मनोरंजनाच्या क्षेत्रांमध्ये विज्ञान महत्त्वाचे भूमिका बजावते.

असे म्हणतात कि नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याप्रमाणे विज्ञानाचा देखील दोन बाजू आहेत विज्ञानाला आपण वरदान समजले तर विज्ञान आपल्यासाठी वरदान ठरू शकते. परंतु दुसऱ्या बाजूला प्रमाणे विज्ञानाचे काही तोटे दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात.

विज्ञानाने मनुष्याला प्रत्येक गोष्टीबाबत नवनवीन ज्ञान आणि देशाची प्रगती करण्यासाठी नवनवीन शोध लावून दिले परंतु आपल्याच आसपास असे काही व्यक्ती असतात जे क्रूर बुद्धीच्या असतात ते त्यांनी विज्ञानाने लावलेल्या शोधांचा वाईट वापर करायला सुरुवात केली आहे. जगभरात विविध लोक विज्ञानाचा शोध हे स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेत आहेत.

विज्ञानाच्या शोधांमुळे नवनवीन तंत्रांचा अनुबाम्ब शोध लागला आणि याचाच उपयोग एकमेकांना मारण्यासाठी करत आहे आणि त्याचे उदाहरण म्हणजे द्वितीय युद्ध होय. विज्ञानाने लावलेला मोबाईलच्या या शोधामुळे अलीकडील पिढी बिघडत चाललेली आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे विज्ञानाने लावलेले शोध हे मानवी कल्याणासाठी होते पण आज या  शोधांचा वापर मनुष्य वाईट कृत्यासाठी करत आहे.

वास्तविकता विज्ञान हे वरदान आणि शाप दोन्ही प्रकारचे ठरते. परंतु आपण विज्ञानाचा वापर कशासाठी करतो यावर अवलंबून आहे जर आपण विज्ञानाचा वापर वरदान म्हणून केला तर विज्ञान आपल्यासाठी वरदान ठरू शकते अन्यथा विज्ञान शाप ठरू शकते.

तर मित्रांनो ! ” विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी । Vidnyan Shap Ki Vardan Nibandh In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment