शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध | Shetkari Jagacha Poshinda Marathi Nibandh

शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध | Shetkari Jagacha Poshinda Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध | Shetkari Jagacha Poshinda Marathi Nibandh “ घेऊन आलोत. आम्हाला खात्री आहे की या वेबसाईटवर हे सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध | Shetkari Jagacha Poshinda Marathi Nibandh

शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप,

तिथं राबतो कष्टतो, माझा शेतकरी बाप,

लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर,

काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर,

काटा त्याच्याच का पायी, त्यानं काय केलं पाप,

माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा,

त्याच्या भाळी लिहिलेला, रातदिस कामधंदा….

वरील ओळीतून आपल्याला शेतकऱ्यांचे महत्व काय शेतकरी हा खरोखरच जगाचा पोशिंदा आहे हे संपूर्ण जग शेतकऱ्यांवर अवलंबून आहे.

शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो राब राब राबतो आणि पीक काढतो ते पीक अन्नधान्य संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवले जाते त्यामुळे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते आपण सर्वजण दोन वेळचे चे अन्न खातो ते या शेतकऱ्यांमुळे शक्य झालेले आहे.

शेतकऱ्याच्या अंगावर तिने अंग झाकण्यासाठी वस्त्र सुद्धा नसतात तो आपल्या अंगावर कसल्याही फाटक्या चिंध्या घालतो, पायामध्ये चप्पल देखील नसते परंतु आपल्या शेतामध्ये राबतो, कष्ट करतो व आपल्या शेतजमिनीतून सोन्यासारखे धान्य पिकवतो.

सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की उभ्या जगाचा साठी कष्ट करणारा जगाचा पोशिंदा उपाशी राहतो, आत्महत्या करण्यासारखे अनेक घटना शेतकऱ्यांसोबत होतात तेव्हा मात्र चित्रपट सृष्टीतील अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मेकप पासूनच्या ब्रेकअप पर्यंतच्या सारा बातम्या सांगणाऱ्या मीडियाचे लक्ष आपल्या जगाचा पोशिंदा कडे जात नाही.

खऱ्या अर्थाने ज्यांच्या जीवावर देशाची अर्थव्यवस्था बळकट आहे व टिकून आहे. व्यवसाय, उद्योग धंदे जरी बंद पडले तरी शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करायचे थांबत नाही.

आज शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो पीक पिकतो आणि धान्य काढतो त्यामुळे देशभरातील संपूर्ण जनता दोन वेळचे पोटभर जेवण होऊ शकत आहे.

त्यांना आपण खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा याचा विचार केला तर त्याच्या एवढी बळकट परिस्थिती ही कोणाची ही असू शकत नाही. चौधरी आपल्या शेतामध्ये सतत कष्ट करून अन्य धान्य उगवत असला तरी त्यामागे काय अनेक परिस्थितीला सामोरे जावे लागते.

शेतकऱ्याच्या घरामध्ये स्वतःचा अंधार असलेल्या पाहायला मिळतात लोकांचे फोटो काढणारा शेतकरी स्वतः उपाशी राहतो. त्याच्या अन्नधान्याला बाजारपेठांमध्ये योग्य दर न मिळाल्याने त्याला स्वतःचे घर भागविण्यासाठी सावकाराकडून कर्ज काढावे लागतात.

कधी पावसाच्या आभावामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे पिकांचे खूप नुकसान होते. तरी तो कुठल्याही परिस्थितीला न घाबरता अतिशय निष्ठेने आपल्या शेतामध्ये राबतो.

अतोनात कष्ट करून अन्नदान जेव्हा बाजारपेठांमध्ये विकायला घेऊन जाते तेव्हा त्याला योग्य किंमत न मिळणे तो हाताश होतो आणि या परिस्थितीमध्ये आपल्या देशातील अनेक शेतकरी वर्षभरामध्ये किती तरी आत्महत्या करतात.

सर्वत्र: च्या घरा मध्ये खायला तुकडा जरी नसला तरी उभ्या जगाचे फोटो भरणाऱ्या शेतकऱ्याचा जीवावरच आज संपूर्ण देशभर आचे अर्थव्यवस्था उभी आहे.

अतोनात कष्ट करून आपल्या मालाला योग्य किंमत न मिळाल्याने किंवा दुष्काळाने आपल्या शेताचा अन्नधान्याचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकरी सरकारला मागतो तेव्हा देशातील अनेक महान नेते शेतकऱ्यांना फक्त पोकळ भाषण देऊन गप्प करतात. त्यावेळी मात्र शेतकरी स्वतःच्या गळ्याला फास लावून आत्महत्या करतो.

स्वतःचे पोट मारून काळ्याआईच्या गर्भात आत्ताच्या स्वप्नांची पेरणी करणारा आमचा बळीराजा संपूर्ण देशा साठी साला प्रमाणे काम करतो. जेव्हा पाचवी पंचवार्षिक योजना मांडली गेली, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था च्या शेतीवर अवलंबून आहे तेव्हा त्या पाचव्या पंचवार्षिक योजनेत शेतीला बारा टक्के इतका तुटपुंज्या भाग देण्यात आला‌.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संपूर्ण जनता शेतीवर अवलंबून होते व त्या काळातील दुष्काळ पडला होता. पण त्यांच्या स्वराज मध्ये एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही या मागचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले शेतीविषयक धोरण. महाराजांनी त्यांच्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांना हेळसांड करू दिली नाही.

त्यामुळे त्या काळातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही आणि सध्याच्या काळाला ही छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धोरण लागू केली त्या धोरणाची गरज आहे जेणेकरून आपल्या जगाचा पोशिंदा बळीराजा हा आत्महत्या करू नये व त्याच्या मालमत्तेला बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळावा जेणेकरून आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.

त्यामुळे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे सर्वांनी लक्षात ठेवून शेतकऱ्यांबद्दल जागृत राहणे गरजेचे आहे.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment