राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध | Essay On My National Bird Peacock In Marathi

राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध | Essay On My National Bird Peacock In Marathi

मोर हा पक्षी सर्व पक्षांमधील सुंदर आणि आकारमानाने मोठा असलेला पक्षी आहे. साधारणत सर्वच ठिकाणी आढळणारा मोर हा पक्षी रंगीबिरंगी पिसारा आणि डोक्यावर असलेला तुरा यामुळे खूप प्रसिद्ध आहे.

मोर हा असा पक्षी आहे जो सर्वच मानवजातीला त्याच्याकडे आकर्षित करतो. मोराची ऐट आणि त्याचा रुबाब व त्याच्याकडे असलेल्या रंग-बिरंगी पिसारा यामुळे अधिकच सुंदर दिसतो.

मोर हा पक्षी भारतातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. मोर हा पक्षी त्याच्या मोहक अशा सौंदर्यामुळे अधिकच प्रसिद्ध आहे.

राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध | Essay On My National Bird Peacock In Marathi

मोर हा पक्षी दिसायला निळा आणि हिरवट रंगाचा असतो. तसेच मोराला लांब आणि निळा रंगाची व चमकदार अशी मान असते. मोराला मोठा पिसारा असतो व त्याच्या पी साऱ्यावर सप्तरंगी चंद्राकर आकाराचे मोठे आणि जमतात ठिपके असतात या प्रसारामुळे अधिक प्रसिद्ध झाला आहे.

तसेच मोराच्या पंखांवर हिरव्या निळ्या सोनेरी अशा रंगाच्या छटा असतात. मोराचे पाय लांब जाड आणि पिवळसर रंगाचे असतात व त्याच्या डोक्या वरती तुरा असतो.

मोर हा पक्षी मुख्यतः जास्त हिरवळ आणि झाडेझुडपे असलेल्या ठिकाणी पाहायला मिळतो. तसेच मोर हा पक्षी अन्नधान्य असलेल्या भागातील शेतीमध्ये, डोंगरावरती आणि जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

मुख्यता मोरे हे पाण्या जवळील जागेमध्ये राहायला पसंत करतात. रात्रीच्या वेळी झाडांच्या फांद्या वर्ती किंवा शाखां वरती झोपतात. मोरांना जास्त उंचावरती उडता येत नाही. आकर्षक असणारा पक्षी म्याऊ म्याऊ या आवाजामध्ये ओरडतो.

मोरया पक्षाचे मुख्य खाद्य म्हणजे अन्नधान्य आणि कीटक होय. तसेच मोराला शेतकऱ्यांचा चांगला मित्र म्हणून ओळखले जाते कारण शेतामध्ये वावरणारे किडे अळ्या, उंदीर, बेडूक आणि साप यांना मोर खाद्य म्हणून खात होतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस न होता बचाव होतो त्यामुळेच मोरला शेतकऱ्याचा मित्र म्हणून देखील ओळखले जाते.

मोर हा पक्षी स्वभावाने अतिशय शांत आणि लाजाळू असतो. त्यामुळे जराही कोणाचा आवाज आल्यास किंवा चाहूल लागल्यास मोर पक्षी मनुष्यापासून दूर पळतात. तसेच मोर पक्षी प्राण्यांना देखील खूप घाबरतात.

मोर पक्षाला समूहामध्ये राहायला खूप आवडते त्यामुळे मोर अपेक्षेने या समूहामध्ये पाहायला मिळतात. श्रावण महिना किंवा पावसाळ्याचा ऋतू हा मोरांचा सर्वात आवडतीचा ऋतू संबंधात. पावसाळ्याचे दिवस सुरू होताच मोर डोंगरावर ती किंवा शेतजमिनीवर नाचताना पाहायला मिळतात.

मंद किंव्हा रिमझिम पावसामध्ये मोर पक्षी आपला पिसारा फुलवून चालताना किंवा नाचताना पाहायला मिळतात. मोराचे हे पावसाळ्यातील सुंदर रूप पाहूनच मोहन वरती असंख्य असे गाणी आणि गीते तयार केलेले आहेत.

एवढेच नसून मोराच्या सुंदर रूपामुळे मोराला चित्रपटसृष्टीमध्ये देखील महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. अनेक सिनेमांमध्ये किंवा गाण्यांमध्ये मोर पक्षी पाहायला मिळतात. लहान मुलांना देखील मोर बच्चे के गाडी शिकवली जातात जसे कि, “नाच रे मोरा” , “मोर आला धाऊन” अशा गाण्यातून मोराचे वर्णन केले जाते.

मोराला सौंदर्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे चित्रकार किंवा लेखक यांचे पहिले लेख किंवा चित्रकाराचे पहिले चित्र हे मोराचे चित्र असते.

एवढेच नसून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. प्राचीन किंवा अशा काळामध्ये देखे मोराच्या अनेक चित्र कलाकृती पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे मोराला प्राचीन वारसा देखील लाभलेला आहे असे म्हटले जाते.

हिंदू संस्कृतीमध्ये मोराला देवाचे स्थान दिले जाते कारण, भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर असणारा पिसारा हा मोराच आहे. विद्येची देवता सरस्वती त्यांचे वाहन देखील मोरच आहे व महादेव पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन देखील मोरच आहे. त्यामुळे मोराला खूप पवित्रा आणि धार्मिक स्थान दिलेले आहे मोराचा पिसारा आपल्या घरामध्ये ठेवले शुभ आणि पवित्र मानले जाते.

मोराच्या मादीला लांडोर असे म्हटले जाते.मोराला ज्याप्रमाणे पिसारा असतो त्याप्रमाणे लांडोरीला पिसारा नसतो. लांडोरी मोरा पासून पूर्णतः भिन्न असते. तसेच लांडोर ही दिसायला तपकिरी आणि करड्या रंगाचे असते.

जगभरामध्ये मोराचे खूप प्रकार आढळतात.परंतु त्यातील तीन प्रकार हे मुख्य आहेत ते म्हणजे भारतीय मोर, ग्रीन मोर आणि काँगो मोर.

असा हा सर्वच दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि सौंदर्याचे प्रतीक मानला जाणारा व हिंदू धर्मानुसार अतिशय पवित्र मानला जाणारा पक्षाला 31 जानेवारी 1963 ला भारत सरकारने राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. मोर या पक्षाचे हत्या करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. जर कोणी मोराचे हत्या केली तर त्याला काही काळासाठी करावासाची शिक्षा सुद्धा मिळते.

अशाप्रकारे रंगीबिरंगी आणि विविधतेने नटलेला हा मोर राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो.

तर मित्रांनो ! ” राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध | Essay On My National Bird Peacock In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment