माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध | Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathi.

माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध | Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathi.

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईट मध्ये तुम्हाला विविध निबंध आणि माहिती वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध | Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathi “ घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध | Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathi.

मी मुंबई शहरांमध्ये राहतो. आपण सर्वांना तर माहितीच आहे मुंबई शहर किती धावपळीच्या आणि गोंधळलेले शहर आहे. या शहरांमध्ये प्रत्येक माणूस आपापल्या कामाच्या मागे धावताना दिसतो कोणीही शांतपणे आणि आरामदायी जीवन जगत नाही.

मुंबईला समस्यांचे माहेरघर म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही, कारण मुंबई शहरामध्ये सतत काही ना काही समस्या उद्भवलेली असतात जसे की पाणीटंचाई, ट्राफिक समस्या, जागेची टंचाई आणि शुद्ध हवेची टंचाई व स्वच्छता अशा अनेक समस्या मुंबई शहरामध्ये दैनंदिन दिवस वाढत जाताना दिसत आहे.

अभिषेक तसेच अलीकडच्या काळामध्ये प्रदूषण हे तर संपूर्ण देशावर बसल्या टाकल्या जातात मुंबई शहरामध्ये प्रदूषणाचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मुंबई शहरातील या सर्व समस्यांमुळे माझे मन अस्वस्थ झाले आणि माझ्या स्वप्नातील शहराच्या कल्पना करू लागले.

माझ्या स्वप्नातील शहरे अगदी सुंदर, स्वच्छ आणि आखीव-रेखीव असेल. करण्यापूर्वी मी शहर कशा पद्धतीचे असेल याचा पूर्व नकाशा काढणे व त्यानुसार संपूर्ण शहराची रचना करेन. माझ्या स्वप्नातील शहर हे माझ्या प्रमाणेच असेल. म्हणजेच शांत, सुंदर आणि आनंदमय वातावरण असलेले व स्वच्छ असेल.

माझ्या स्वप्नातील शहरांमध्ये वाहनांची गर्दी होणार नाही यासाठी मी मोठे रस्ते तयार करीन. एवढेच नसून प्रदूषणाचे प्रमाण वाढणार नाही त्यामुळे माझ्या स्वप्नातील शहरांमध्ये पाण्यावर चालणाऱ्या गाड्या व इतर वाहने असतील त्यामुळे आपले वातावरण दूषित होणार नाही. पायी चालणाऱ्या लोकांसाठी वेगळा मार्ग काढेल.

माझ्या स्वप्नातील शहर सुंदर करण्यासाठी मी आतोनात प्रयत्न करीत तसेच शहर सुंदर करीन त्यासोबत शहराचे सुंदरता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न देखील करीन.

माझ्या स्वप्नातील शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मी स्वतंत्र घर देईन जेणेकरून मुंबई शहराप्रमाणे शहरांमध्ये झोपड्या दिसणार नाहीत. माझ्या कल्पनेतील शहरामध्ये स्वच्छतेचे वेळोवेळी काळजी घेतली जाईल. त्यासाठी शहरातील सर्व कचरा एकत्र गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल.

बाग-बगीचे, सुंदर झाडे आणि हिरवागार निसर्ग हा शहराचे सुंदरता वाढीवतात. त्यामुळे शहर उभारण्यापूर्वी त्याठिकाणी सौंदर्य कितपत आहे याचा विचार करेल. त्याचबरोबर माझ्या स्वप्नातील शहरामध्ये सांस्कृतिक केंद्र, चित्रपटगृह, मनोरंजनासाठी नाट्यगृह, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बाग-बगीचे, क्रीडांगण भव्य वाचनालय, शाळा, महाविद्यालये दवाखानेआणि विविध छंद जोपासा साठी आवश्यक असणारे ठिकाणी उभारीन.

माझ्या कल्पनेतील शहरामध्ये जीवना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळतील. तसेच माझ्या स्वप्नातील शहरांमध्ये शहराचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी वेळेवर पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सांडपाण्याचे व्यवस्थित सोय, घरोघरी शौचालय तसेच महिन्यातून एकदा डेंगू, मलेरिया यांसारख्या रोगाची साथ पसरू नये म्हणून वेळेवर फवारणी केली जाईल.

तसेच माझ्या कल्पनेतील माझ्या आदर्श शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिक आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडेल. माझ्या स्वप्नातील शहरात गुन्हेगारी, भांडण-तंटे, चोरी, खून, स्त्रियांवर अत्याचार, लूटमार यांसारखे कोणतेही गुन्हे होणार नाहीत.

तसेच व्यक्तीच्या मनातील राग, द्वेष या सर्वांना माझ्या शहरात हद्दपार केले जाईल. माझ्या स्वप्नातील शहरामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यक्तीशी मैत्रीपूर्ण संबंधाने राहील.

माझा शहरांमध्ये जात, धर्म यामध्ये भेदभाव न करता सर्वजण समान हक्काने राहतील व आपले कर्तव्य पार पाडतील. माझ्या शहरांमध्ये राहणारे प्रत्येक नागरिक सुख समाधानाने आनंदी जीवन जगतील. तसेच माझ्या स्वप्नातील शहराला आदर्श बनवण्यासाठी आवश्यक असणारे सर्व

गोष्टी प्राप्त होते माझ्या कल्पनेतील शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार हा शहरांमध्येच प्राप्त करून दिला जाईल जेणेकरून कुठल्याही गोष्टीसाठी लोकांना शहराबाहेर जावे लागणार नाही. माझ्या स्वप्नातील शहरांमध्ये आनंदाचे, निसर्गमय ,संपन्न व सुखद वातावरण असेल.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

या निबंधा मध्ये आमच्या कडून काही पॉईंट राहिल्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment