मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे | Name of Months in Marathi

मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे | Name of Months in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध आणि माहिती वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही मराठी इंग्रजी महिन्यांची नावे | Marathi Months name | Name of Months in Marathi “ या विषयावर माहिती घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध आणि माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे | Name of Months in Marathi

Marathi Months Name :

आपल्यातील बऱ्याच जणांना मराठी महिन्यांची नावे पुर्णता माहिती नाहीत. आज सर्वजण इंग्रजी भाषेच्या आहारी गेले त्यामुळे सर्वांना इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे.

त्यामुळे साधे महिन्यांची नावे विचारले तरी सर्व जण इंग्रजी मधून सांगतात. त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही मराठी महिन्यांची नावे सोबत इंग्रजी महिन्याची नावे सुद्धा घेऊन आलो.

भारतामध्ये प्राचीन काळापासून पंचांग बघण्यासाठी कॅलेंडर वापरले जाते. परंतु आज जगभरामध्ये सर्वात जास्त इंग्रजी कॅलेंडर वापरले जाते त्याला सामान्यता ग्रेगोरियन कॅलेंडर असे म्हणतात.

इंग्रजी कॅलेंडर नुसार ही वर्षभरात बारा महिने असतात त्याप्रमाणे मराठी कॅलेंडर मध्ये ही बारा महिने असतात.

असे म्हणतात की, पहिले इंग्रजी कॅलेंडर हे पंधराव्या शतकामध्ये तयार करण्यात आले. परंतु आपले भारतीय कॅलेंडर हे हजारो वर्षापूर्वी जुने असल्याचा उल्लेख आढळतो.

आज आपण येथे Marathi Months Name पाहणार आहोत. मराठी कालगणना ची भूमिका हे महाराष्ट्रीय लोकांना खूप महत्त्वाचे असते. वार, दिनांक ,तिथी, पंचांग सर्व पाहण्यासाठी याच कॅलेंडरचा वापर केला जातो. म्हणून प्रत्येकाला “मराठी महिन्यांची नावे” माहिती असणे खूप गरजेचे आहे.

मराठी महिने | Marathi mahine name

इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे मराठी कॅलेंडर मध्ये बारा महिने असतात व प्रत्येक महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात. प्रत्येक महिन्यामध्ये पंधरा-पंधरा दिवसाचे दोन पंधरवाडा असतात. यापैकी पहिल्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष तर दुसऱ्या पंधरवड्याला शुक्लपक्ष असे म्हणतात.

मराठी महिन्यांची नावे– Marathi months name

1) चैत्र

2) वैशाख

3) ज्येष्ठ

4) आषाढ

5) श्रावण

6) भाद्रपद

7) अश्विन

8) कार्तिक

9) मार्गशीष

10) पौष

11) माघ

12) फाल्गुन

आता आपण मराठी महिन्यांची नावे पाहिजे आहेत. परंतु या बारा महिन्याचे स्वतःचे काही वैशिष्ट्य महत्त्व असते. ते आपण थोडक्यात पाहू,

1) चैत्र महिना :

मराठी महिन्याची सुरुवात ही चैत्र महिन्यापासून होते. हा महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत असतो आणि चैत्र महिन्यामध्ये गुढी पाडवा हा सण येतो या सणापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. सर्वजण गुढीपाडवा सण साजरा करू नववर्षाचे स्वागत करतात.

2) वैशाख महिना :

मराठी कॅलेंडर नुसार दुसरा महिना म्हणून ओळखला जाणारा महिना म्हणजे वैशाख महिना होय. इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना एप्रिल ते मे महिन्यामध्ये असतो. या महिना शेतकरी शेतातील नवीन पीक काढतात. पंजाब प्रांतामध्ये या महिन्यात महिन्याला बैसाखी असे म्हणून बैसाखी हा उत्सव साजरा केला जातो.

3) जेष्ठ महिना :

ज्येष्ठ महिना हा मराठी कॅलेंडर मधील तिसऱ्या क्रमांकाचा महिना आहे. हा महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार मे आणि जून महिन्यात असतो. या महिन्यांमध्ये हवामान खूप उष्ण असते. तसेच जेष्ठ महिन्यामध्ये नवविवाहित स्त्रियांचा वटपोर्णिमा आणि मंगळागौरी हे सण असतात.

4) आषाढ महिना :

आषाढ महिना हा मराठी कॅलेंडर मधील चौथ्या क्रमांकाचा महिना आहे. इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना जून-जुलै महिन्यांमध्ये येतो. या महिना मधील गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हे उत्सव येतात.

5) श्रावण महिना :

श्रावण महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार जुलै-ऑगस्ट महिन्यांत दरम्यान येतो. श्रावण महिन्यापासून वर्षा ऋतु ला सुरुवात होते. या महिन्यामध्ये सरळ कोणा वातावरण हे निसर्गरम्य असते.

6) भाद्रपद महिना :

भाद्रपद महिना हा इंग्रजी कॅलेंडर नुसार ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात दरम्यान असतो.

भाद्रपद महिना हा सर्वांच्या आवडतीचा महिना म्हणून देखील ओळखला जातो कारण या महिन्यांमध्ये सर्वांच्या आवडती चे देवता गणपती बाप्पाचे आगमन होते.

7) अश्विन महिना :

आश्विन महिना हा इंग्रजीत कॅलेंडर नुसार सप्टेंबर-ऑक्टोबर महिना दरम्यान असतो.

हिंदू धर्मातील सर्वात मोठा देवीचा सण म्हणजे नवरात्र होय. नवरात्र हा सण अश्विन महिन्यामध्ये येतो. तसेच अश्विन महिन्यापासून दिवाळी सणाला सुरुवात होते.

8) कार्तिक महिना :

कार्तिक महिना हा इंग्रजी कॅलेंडर नुसार ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिना दरम्यान असतो.

या महिन्यांमध्ये दिवाळी उत्सवातील भाऊबीज हा उत्सव असतो.

9) मार्गशीष महिना :

मार्गशीष महिना हा इंग्रजी कॅलेंडर नुसार नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात दरम्यान असतो. या महिन्यांमध्ये दत्तजयंती साजरी केली जाते.

10) पौष महिना :

पौष महिना हा इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर-जानेवारी महिना दरम्यान असतो.

पौष महिन्याच्या सुरुवातीलाच मकरसंक्राती हा सण साजरा केला जातो.

11) माघ महिना :

माघ महिना हा इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दरम्यान असतो.

माघ महिन्यामध्ये महाशिवरात्रि हा सण साजरा केला जातो.

12) फाल्गुन महिना :

फाल्गुन महिना हा इंग्रजी कॅलेंडर नुसार फेब्रुवारी-मार्च महिना दरम्यान असतो.

फाल्गुन महिना मध्ये थंडीचे दिवस असतात व या महिन्यामध्ये होळी हा सण साजरा केला जातो.

इंग्रजी महिन्यांची मराठी नावे– English months in Marathi

1) जानेवारी ( January ) : जानेवारी हा महिना 31 दिवसांचा असतो.

2) फेब्रुवारी ( February ) : फेब्रुवारी हा महिना 28 दिवसांचा असतो परंतु दर चार वर्षांनी लीप वर्षे येते 29 दिवस असतात.

3) मार्च ( March ) : मार्च महिना 31 दिवसांचा असतो.

4) एप्रिल ( April ) : एप्रिल महिना 30 दिवसांचा असतो.

5) मे ( May ) : मे महिना 31 दिवसांचा असतो.

6) जून ( Jun ) : जून महिना 30 दिवसांचा असतो.

7) जुलाई ( July) : जुलै महिना 31 दिवसांचा असतो.

8) ऑगस्ट ( August) : ऑगस्ट महिना 31 दिवसांचा असतो.

9) सप्टेंबर ( September ) : नंबर महिना 30 दिवसांचा असतो.

10) ऑक्टोंबर ( October ) : ऑक्टोंबर महिना 31 दिवसांचा असतो.

11) नोव्हेंबर ( November ) : नोव्हेंबर महिना 30 दिवसांचा असतो.

12) डिसेंबर ( December ) : डिसेंबर महिना 31 दिवसांचा असतो.

तर मित्रांनो ! ” मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे | Marathi Months name | Marathi mahine “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे | Marathi Months name | Marathi mahine “ यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिल्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment