लहान मुलांच्या गोष्टी चांगल्या । Lahan Mulanchi Goshti In Marathi

लहान मुलांच्या गोष्टी चांगल्या । Lahan Mulanchi Goshti In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” लहान मुलांच्या गोष्टी चांगल्या । Lahan Mulanchi Goshti In Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईट वरील सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

लहान मुलांच्या गोष्टी चांगल्या । Lahan Mulanchi Goshti In Marathi

लहान मुलांच्या गोष्टी मराठी :

लहान मुलांच्या गोष्टी मराठी या खासकरून लहान मुलांसाठी देण्यात आल्या आहेत. लहान मुलांना गोष्टी ऐकण्याची खूप आवड असते. ते सतत आपल्या पालकांकडे गोष्टी सांगण्याचा हट्ट करीत असतात.

अशा वेळी पालकांनी टाईमपास वेळी आपल्या मुलांना छान छान गोष्टी सांगून त्यांना बोध देऊ शकतात. बोधकथांतून मुलांचे मनोरंजन होते त्यासोबत त्यांना एक चांगली शिकवण सुद्धा मिळते.

या गोष्टी ऐकून मुलांच्या विचार क्षमतेमध्ये वाढ होऊन त्यांची कल्पनाशक्ती वाढण्यास मदत होईल. तर चला लहान मुलांच्या गोष्टींना सुरुवात करू…..

1) कबूतर आणि मुंगी :

कबूतर आणि मुंगी हे दोघेही खूप जिवलग मित्र असतात.

एकदा मुंगी एका तलावाच्या कडून जात असतो तेव्हा जोराचा वारा येतो आणि त्या तलावातील पाणी किनार्‍याकडे येऊन त्या मुंगीला ओढून घेऊन जाते. मुंगी भलामोठा तलावाच्या पात्रांमध्ये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असते.

तलावाशेजारी एक झाड असते त्या झाडावर कबूतर बसलेले असते.

तेवढ्यात त्या कबुतराचे पाण्यात पडलेल्या मुंगी कडे लक्ष जाते. मुंगी ला वाचवण्यासाठी कबूतर झाडाचे एक पान आपल्या चोचीने तोडून पाण्यामध्ये टाकते.

मुंगी हळूवारपणे त्या पानावर चढते आणि ते पान हळूहळू किनार्‍यालगत येते. पान किनाऱ्याला पोहोचताच मुंगी पानावरून खाली उतरून जमिनीवर येते.

अशाप्रकारे कबूतर मुंगी चे प्राण वाचवतो.

एकदा एक शिकारी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी येतो तेव्हा त्याला झाडावर बसलेले एक कबुतर दिसते. हे कबूतर तेच असते ज्याने मुंगीचे प्राण वाचवले असते.

शिकारी त्या कबुतरावर नेम धरतो. तेवढ्यात तिकडे मुंगी शिकाऱ्याला कबुतराला धरलेला नेम पाहते. व मुंगी शिकाऱ्याच्या पायाला येऊन जोरात चावते तेवढ्यात शिकारी ओरडतो व शिकाऱ्याचा नेम चुकतो बंदुकीचा आवाज ऐकून कबूतर उडून जाते.

अशाप्रकारे मुंगी कबुतराचे प्राण वाचवते.

तात्पर्य: संकट काळात जे एकमेकांची मदत करतात तेच खरे मित्र!

2) ससा आणि कासव :

एका जंगलामध्ये ससा आणि कासव राहत असतात. ससाला आपल्या सुंदर दिसण्यावर आणि वेगवान गतीवर खूप गर्व असतो. कासवाची गतिमंद असते परंतु ते खूप चपळ असते.

एकदा काय होतं ससा आपल्या वेगवान गती च्या जोरावर कासवा सोबत पैज लावायचं ठरवितो. कासव आणि ससा सोबत शर्यत लावायला तयार होते. ठरल्या प्रमाणे दुसर्या दिवशी ससा आणि कासव एका ठिकाणी येतात.

ठराविक अंतरावर एक झाड असते या दोघांना त्या झाडापर्यंत पोहोचायचे असे जो कोणी पहिल्यांदा झाडापर्यंत पोहचतो तो विजयी होणार असतो.

ससा आणि कासवाची शर्यत सुरू होतो. ससा आपल्या वेगवान गतीने  कासवाला मागे सोडून पुढे निघून जातो. खुप अंतर पुढे गेल्यानंतर असा मागे वळून पाहतो तर त्याला कासव कुठेही दिसत नाही.

कासव मागे राहिले या विचाराने तो अजून पुढे पळतो. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर तेथे गाजराची शेती असते आणि आपण सर्वांना तर माहितीच आहे की, सश्याला गाजर किती आवडते. ससा शेतीतील गाजर खातो.

आणि पुन्हा मागे वळून पाहतो त्याला कासव दिसत नाही. कासव खूप मागे राहिले या विचाराने तो जरा वेळ विश्रांती करायचा विचार करतो.

एका झाडाखाली ससा विश्रांती करण्यासाठी बसतो. ससाला गाढ झोप येते आणि सहसा जागीच झोपी जातो. कासव आपल्या मंदगतीने हळुवारपणे शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत असतो.

कासव हळूहळू ससा पर्यंत येतो त्याला ससा झोपलेला अवस्थेमध्ये दिसतो. कासव तसेच हळूहळू करत शर्यत जिंकतो. तेवढ्यात सश्याला जाग येते आणि ससा इकडे तिकडे पाहत होतो त्याला कासव कुठे दिसत नाही तो  शर्यती जिंकण्याचा  पुन्हा धाव  घेतो.

शर्यत जिंकण्याच्या ठिकाणापर्यंत ससा पोहोचतो तोपर्यंत कासवाने शर्यत जिंकलेली असते. अशाप्रकारे कासवाने आपल्या प्रयत्नातून यशाची पायरी गाठली.

 तात्पर्य: धीर न सोडून प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच प्राप्त होते.

3) गाढवाचा गैरसमज – मराठी बोधकथा :

रामपुर नावाचे गाव असते. हे गाव जंगल आणि डोंगर असलेल्या परिसरात वसलेले होते. गावात सदाशिव नावाचा एक पाथरवट राहात असे. तो पाथरवट देवाच्या अतिशय सुंदर मूर्ती बनवत.

त्याच्या या मूर्ती बनवण्याची कलेमुळे गावांमध्ये तर  प्रसिद्ध झालात त्या सोबत त्याच्या या मूर्ती न बनवण्याच्या  कलेच्या चर्चा शहरात सुद्धा होत होत्या. त्यामुळे शहरी भागातून त्याच्याकडे मूर्ती बनविण्यासाठी खूप मागण्या येऊ लागल्या.

एकदा काय झाले सदाशिव पाथरवटाला  शहरी भागातून देवाच्या मूर्ती बनवण्यासाठी मागणी आली. ठरल्याप्रमाणे त्यांनी ती मागणी थोड्यावेळातच पूर्ण केली आणि बनवलेल्या मुर्त्या शहरी भागामध्ये पोहोचवण्यासाठी त्याने सर्व मुर्त्या एका गाढवाच्या अंगावर लादल्या  आणि त्यो शहराच्या दिशेने निघाला.

दगडात कोरलेल्या त्या देवांच्या सुंदर मूर्ती पाहून रस्तावर येणारे-जाणारे लोक सहजच मूर्तीला हात जोडून नमस्कार करीत होते.

दगडाच्या मुर्त्या एका गाढवाच्या अंगावर लागल्या होत्या. लोक मूर्ती ला नमस्कार करत होते परंतु त्या गाढवाला वाटले की, सर्व लोक मलाच नमस्कार करत आहेत.

सर्वजण मलाच नमस्कार करत आहेत हे पाहून गाढवाला स्वतःवर खूप गर्व झाला त्यामुळे त्यांनी स्वतःला कोणीतरी मोठा समजून गाढव पुढे चालण्यासाठी तयार झाले नाही. अचानक गाढव रस्त्यात थांबली पुढे एक पाऊल पुढे टाकायला तयार नाही.

गाढव अचानक का थांबले आहे सदाशिव पाथरवटच्या लक्षात येण्यासाठी बराच वेळ लागला. गाढव का अडलंय? हे सदाशिव पाथरवटाच्या लक्षात येताच त्यो हातातल्या काठीने गाढवाला मारत म्हणाला, ” प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतो आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतंय. पण मुर्खा, सर्व लोक तुला नमस्कार न करता तुझ्यावर लागलेल्या तेव्हाच्या सुंदर मोती ना नमस्कार करताहेत.”

आता चल! नाहीतर आणखी मार खाशील.

असे म्हणत पाथरवटाने दोन फटके गाढवाला मारले  व गाढव चालू लागले.

 तात्पर्य: खोटा अहंकार पाळलेले पाहिजे किती वेळ येते.

4) लाख मोलाचा देह – मराठी बोधकथा

एका गावात खूप  श्रीमंत व्यापारी राहत होता.  व्यापारी खूपच श्रीमंत असल्याने त्याच्याजवळ धनसंपत्तीची काहीच कमी नव्हती. तो व्यापारी गरीब लोकांचे मदत सुद्धा करीत असे.

त्याला आपल्या संपत्तीवर जराही अहंकार नव्हता. जे लोक आजाराने ग्रासले आहेत त्यामुळे त्यांना काम करता येत नाही अशा लोकांना व्यापारी नेहमी मदत करत.

एके दिवशी एक भिकारी भीक मागता मागता त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरासमोर येऊन उभा राहून भीक मागू लागला. व्यापाराचा मोठा वाडा, सेवक, धन-दौलत पाहून भिकाऱ्याला वाटले की, व्यापारी भीक मध्ये खूप पैसे देईल.

भिकारी भिक मागताना पाहून व्यापार्‍याने सेवकाला त्या भिकाऱ्याला आत मध्ये बोलवण्यास सांगितले. सेवक आपल्याला आत मध्ये बोलवायला हे पाहून भिकाऱ्याला खूप आनंद झाला.

त्याच्या मनात आशा निर्माण झाली की,  व्यापाराने घरामध्ये बोलवले म्हणजे तो नक्कीच आपल्याला बराच काही वस्तू देणार.

व्यापाराने बोलल्याप्रमाणे भिकारी घरामध्ये गेला. तेव्हा व्यापारी भिकाऱ्याला म्हणाला, ” हे बघ,  तुला मी पाचशे रुपये देतो पण त्या बदल्यात मला तुझे डोळे दे.”

त्यावर भिकारी म्हणाला, छे!  छे! हे कसं शक्य आहे?  मी माझे डोळे दिले तर मी काहीही बघू शकणार नाही.”

त्यावर व्यापारी म्हणाला, ” बरं, मग असं कर तुझ्या हात तरी दे?”

हात देण्यासाठी सुद्धा भिकाऱ्याने नकार दिला. अशाप्रकारे व्यापारी भिकाराच्या प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत गेला परंतु भिकारी आपल्या शरीराचा एकही अवयव द्यायला तयार झाला नाही.

शेवटी व्यापारी भिकाऱ्याला म्हणाला,” हे बघ! तुझ्या प्रत्येक आववयाची किंमत पाचशे-पाचशे रुपये म्हटले तरी, तुझ्या संपूर्ण देहाची किंमती लाख रुपयांपेक्षा जास्त झाली.”

मग तु एवढा मोठा लाख मोलाचा धडधाकट देह असताना भीक का मागतोस?

नीट कष्ट कर आणि पैसा मिळव.

व्यापाराचे हे बोलणे ऐकून भिकाऱ्याचे डोळे उघडले व तो कष्ट करण्यासाठी तयार झाला.

 तात्पर्य:  योग्य परिश्रम  करून मिळवलेला पैसा हा कधीही उत्तम असतो.

तर मित्रांनो ! हे ” Lahan Mulanchi Goshti In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

या गोष्टी ” Lahan Mulanchi Goshti In Marathi “ मध्ये आमच्या कडून काही पॉइंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment