सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास | Sindhudurg Fort History in Marathi

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास | Sindhudurg Fort History in Marathi

महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक किल्ले आहेत. त्यातील सिंधुदुर्ग हा किल्ला खूप महत्त्वाचा समजला जातो. कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे.

आज आपण याच सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्या बद्दल ची बरीचशी माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि माहिती.

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास | Sindhudurg Fort History in Marathi

सिंधुदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात वसलेला आहे. हा किल्ला ” छत्रपती शिवाजी महाराजांनी ” बांधलेला एक जलदुर्ग आहे.

25 नोव्हेंबर इ.स. 1664 साली या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. भारत सरकारने सिंधुदुर्ग या किल्ल्याला 21 जून 2010 मध्ये ” महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक” म्हणून घोषित केलेले आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास :

सिंधुदुर्ग हा किल्ला अतिशय मजबूत, बुलंद आहे. या किल्ल्याचा इतिहास हा छत्रपतीन काळातील आहे. ह्या किल्ल्याची उंची सुमारे 200 फूट येवढी आहे आणि हा किल्ला जलदुर्ग ह्या प्रकारा मध्ये मोडतो.

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहासा बद्दल सांगायचे म्हणजे हा किल्ला शिवकालीन काळातला असून स्वतः शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची बांधणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणजे मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्लाच होय. पश्चिमेस अरबी समुद्रात वसलेला हा किल्ला परदेशी व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावा विरुद्ध लढा देणे, जंजिरा सिद्धी चा उद्य थांबवणे आणि सागरी मार्गावरील शत्रुंची लढा देणे हे या किल्ल्याचे मुख्य उद्दिष्टे होती.

हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली 1664 साली हा किल्ला बांधण्यात आला. समुद्री क्षेत्र 48 एकरांवर पसरलेला हा किल्ला असून त्यात 3 कि. मी. येवढी तटबंदी आहे, आणि 30 फूट उंची आणि 12 फूट जाड भिंती आहेत.

काळा कभिन्न खडकाच्या बेटावर वसलेला ह्या किल्ल्याची जागा आज मोरयाचा दगड म्हणून ओळखली जाते. असे म्हणतात की, सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची झाले.

आणि किल्ला संपूर्ण बांधणी साठी तीन वर्षाचा कालावधी लागला. ऐतिहासिक दृष्ट्या सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या खडकावर तीन शतके झाली उभा आहे. तो खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे.

किल्ल्याच्या तटास ठिकठिकाणी भक्कम अशी 22 बुरुज आहेत. किल्ल्याच्या पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पश्चिमे कडील आणि दक्षिणे कडील तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले व या तटाच्या बांधकामास 80 हजार होऊन खर्च झाला.

सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व :

शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला आरमारात खूप महत्त्वाचे स्थान होते. ह्या किल्ल्याचे क्षेत्र हे कुरटे बेटावर 48 एकरावर पसरलेले होते. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड पाण्याचा दगडी विहीर आहेत. त्यांची नावे ही दुध विहीर, साखर विहीर, आणि दही विहीर अशी आहेत.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयाची निर्मिती केलेली आपणास पाहायला मिळेल. तसेच किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील भव्य मंदिर असल्याचे दिसेल.

असे म्हणतात की, या मंदिराची स्थापना सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी केले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेश द्वार आहे पूर्व दिशेला आहे. परंतु दुरने पाहिले असता ते प्रवेश द्वार असल्याचे कोणाला वाटणार नाही.

पाण्यातून तटाजवळ गेले की आपणास तेथे उत्तराभिखु असलेली एक खिंड दिसते. या खिंडीतून जेव्हा आपण आत मध्ये जाऊ तेव्हाच आपल्याला ह्या किल्ल्याचे प्रवेश द्वार असल्याचे लक्षात येईल.

प्रवेश द्वाराचा दरवाजा हा भक्कम, मजबूत असल्याचा दिसेल कारण उंबराच्या झाडाच्या लाकडापासून बनविलेला आहे. उंबराचे लाकूड हे मजबूत असते व दीर्घकाळ टिकते. दरवाज्यात आत गेल्यास आपल्याला मारुतीचे एक छोटेसे मंदिर दिसेल व मंदिराच्या शेजारी बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाण :

चारही बाजूने समुद्र किनारा लाभलेला हा सिंधुदुर्ग किल्ला हा ऐतिहासिक दृष्ट्या सौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या आत मध्ये पर्यटकांना बघण्यासाठी अनेक ऐतिहासिक दृश्य आहेत. मुख्यता ह्या किल्ल्याची बांधणी बघण्यासारखी आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेश द्वार हे आपण सहज बघायला गेलो तर कुठेही दिसणार नाही परंतु पाण्यात उतरून तटाजवळ गेल्यास किल्ल्याला प्रवेश द्वार असल्याचे लक्षात येईल. प्रवेश द्वाराचा दरवाजा भक्कम उंबराच्या लाकडाचा असल्याचे दिसेल.

मुख्य द्वारातून आत गेल्यास मारुतीचे छोटेसे मंदिर दिसेल. हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याने हे मंदिर पर्यटकांना बघण्यासारखे आहे.

मंदिराच्या शेजारून बुरुजावर जाण्याचा मार्ग आहे. या बुरुजावर सिंधुदुर्ग किल्ल्याचा आसपासचा 15 मैल अंतराचा प्रवेश दिसतो आणि हा नजारा बघण्या सारखा आहे.

किल्ल्याच्या पश्चिम दिशेला जरिमरीचे देऊळ लागते. या देवळाच्या परिसरात आज ही लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर दिसते.

सिंधुदुर्ग किल्ल्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेला मराठ्यांचा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट येवढा उंच होता. हा ध्वज इ.स. 1812 पर्यंत किल्ल्यावर फडकत होता.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश किल्ल्यातील ठिकठिकाणातून दाखविला आहे.

विशेष म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. 1961 साली तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी किल्ल्याच्या तटा ची दुरुस्ती केली.

विशेष म्हणजे या किल्ल्यामध्ये एक नारळाच्या झाडाला दोन फांद्या वाय ( Y ) आकाराच्या होत्या. पण अलीकडे त्यातील एक फांदी वीज पडल्याने मोडल्याचे दिसेल.

हे सारे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील दृश्य बघण्या सारखे आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :

सिंधुदुर्ग किल्ला हा गोव्याच्या उत्तरेस व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. मुंबई पासून 450 किलोमीटर दक्षिण दिशेला आहे.

कोकण रेल्वे हे सिंधुदुर्ग जिल्ह्या मधील एक रेल्वे स्थानक आहे, परंतु येथे फक्त काहीच रेल्वे थांबतात. कुंडल, कनकवली आणि सावंतवाडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.

रत्नागिरी, मुंबई, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि गोवा राज्य सरकार पेन्नेम ते सिंधुदुर्ग मार्गावर चालणाऱ्या वास्को, पणजी, मडगाव आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या बसेस च्या साह्याने आपण सिंधुदुर्ग किल्ल्या पर्यंत जाऊ शकतो.

स्वतःचे वैयक्तिक दुचाकी किंवा चार चाकी हा प्रवास अतिशय सुलभ होईल.

तसेच सिंधुदुर्ग किल्ल्या पासून अगदी जवळ म्हणजे 90 किलो मीटरच्या अंतरावर वसलेले सावंतवाडी शहर हे सुद्धा पर्यटकांना बघण्यासाठी मोठे आकर्षण आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment