तोरणा किल्ला माहिती मराठी | Torna Fort Information In Marathi Language

तोरणा किल्ला माहिती मराठी | Torna Fort Information In Marathi Language

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईट वर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” तोरणा किल्ला माहिती मराठी | Torna Fort Information In Marathi Language “ घेऊन आलोत.

या वेबसाईट वर तुम्हाला महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची माहिती दिलेली आहे.

तोरणा किल्ला माहिती मराठी | Torna Fort Information In Marathi Language

तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे. तोरणा या किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हणतात. तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल गड म्हणून प्रसिद्ध आहे.

तोरणा किल्ल्याची रचना आणि स्थान :

तोरणा किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटी पासून साधारणता 4604 फूट येवढी आहे. तर हा तोरणा किल्ला गिरीदुर्ग प्रकाराच्या किल्ल्यां मध्ये मोडतो. तोरणा किल्ल्याची चढाई ही मध्यम प्रकारची आहे. तर ह्या तोरणा किल्ल्याची सध्याची स्थिती ही बर्‍यापैकी चांगली आहे.

पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रि पर्वताच्या रांगेतून दोन पदर निघुन पुर्वेला पसरत गेले आहेत त्यांपैकी एका पदरावर तोरणा किल्ला आणि राजगड आहे तर दुसर्‍या पदराला भुलेश्वर रंग म्हणून ओळखले जाते. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वत रांगेमधील 18.276 उत्तर अक्षांश व 73.613 पूर्व रेखांशावर हा तोरणा किल्ला आहे.

या किल्ल्याच्या दक्षिण दिशेला वेळवंडी नदी आहे तर उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.

तोरणा किल्ला चा इतिहास :

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना म्हणजे इ.स. 1647 मध्ये त्यांना जिंकून घेतलेला पहिला किल्ला म्हणजेच हा ” तोरणा किल्ला “ होय.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव ” तोरणा किल्ला ” असे ठेवण्यात आले.

तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार असल्यामुळे गडाची बांधणी करताना त्यांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून ” प्रचंडगड ” असे ठेवले. या तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.

तोरणा किल्ल्याची बांधणी कोणी केली हे आजवर कळाले नाही पण या किल्ल्याची स्थापना ही इ.स. 1470 ते इ.स. 1486 च्या सुमारास झाली असावी.

येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन असा अनुमान काढला की, हा तोरणा किल्ला पूर्वी शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. 1470 ते इ.स. 1486 व्या दरम्यान बहामनी राजवटीचा राजा मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला.

त्यानंतर पुढे हा तोरणा किल्ला निजामशाहीत गेला. व पुढे शिवाजी महाराजांनी जिंकून या किल्ल्याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या.

जेव्हा शिवाजी महाराज आग्राहुन परतले तेव्हा त्यांनी अनेक किल्ल्यांची डागडुजीचे काम केले. त्यात त्यांनी 5 हजार होन इतका खर्च तोरणा किल्ल्यासाठी केला. पुढे संभाजी महाराजांच्या हत्तेनंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.

शंकराजी नारायण सचिवांनी तोरणा पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इ.स. 1704 मध्ये औरंगजेबाने तोरणा किल्ल्याला वेढा घातला व लढाई करुन तो किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला. व तोरणा किल्ल्याचे नाव फुतुउल्गेब म्हणजेच दैवी विजय असे ठेवले.

पुढे चार वर्षे हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात होता त्यानंतर सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर मावळे चढवून पुन्हा हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला व त्यानंतर तोरणा किल्ला कायमचा स्वराज्यातच राहिला.

पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा किल्ल्याचा समावेश नव्हता हा तोरणा किल्ला शिवाजी महाराजांकडे राहिला होता.

तोरणा किल्ल्याची विशेषता म्हणजेच औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला हा तोरणा केला होता.

तोरणा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

तोरणा किल्ल्यावर पर्यटकांना पाहण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत त्यांपैकी काही खालील प्रमाणे :

1. तोरणजाई देवी मंदिर :

तोरणा किल्ल्यावरील कोठी दरवाज्या समोरच्या दगडी चिरेबंदी तटामध्ये एक छोटे मंदिर आहे. त्यामध्ये तोरणजाई देवीची मूर्ती आहे. याच ठिकाणी खोदाई करत असताना मराठी मावळ्यांना मोहरांचे हंडे सापडले होते.

2. मेंगाई देवी मंदिर :

तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. रात्री मुक्कामी येणारे दुर्गप्रेमी याच मंदिरात राहतात. तसेच नवरात्र उत्सव काळात, वेल्हे गावातील लोक गडावरती देवीचा उत्सव साजरा करतात.

मेंगाई देवीच्या मंदिरापासून झुंजार माचीकडे जाताना हनुमान बुरुज, भेल बुरुज, सफेली बुरुज, माळेचा बुरुज, फुटका बुरुज आणि लक्कडखाना आहे.

3. झुंजार माची :

मेंगाई देवीच्या मंदिराकडून हनुमान बुरुजाकडे आल्यानंतर बुरुजांच्या तटावरुन खाली उतरल्याने दिंडीच्या दाराने झुंजार माचीकडे जाता येते. झुंजार माचीकडे जाणारी वाट ही खूप कठीण आहे.

4. तोरणेश्वर महादेव मंदिर :

झुंजार माचीकडे जाणाऱ्या रस्त्यात तोरणेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धुके असते.

5. बुधला माची :

गडाच्या पश्चिम दिशेला बुधलामाची आहे. बुधला माचीच्या टोकाला चित्ता दरवाजा आहे. बुधला माचीकडून किल्ल्याकडे येत असताना कोकण दरवाजा, टकमक बुरुज, शिवगंगा, पातळगंगा टाके दिसतात.

6. बालेकिल्ला :

बालेकिल्ला म्हणजे तोरणा किल्ल्यावरील सर्वात उंचावरची जागा आहे. मेंगाई देवीच्या मंदिराकडे या बालेकिल्ला चे अवशेष बघायला मिळतात.

तोरणा किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :

पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे गाव तोरणाच्या पायथ्याशी आहे. पुणे- वेल्हे हे अंतर 60 किलो मीटर आहे. पुणे – नसरापुर – वेल्हे, पुणे – नसरापूर – वेल्हे आणि पुणे – खानापूर – पाबे – वेल्हे अशा मार्गांनी आपण तोरणा किल्ल्यावर जाता येते.

तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे- वेग्रे हा आळीमार्गे पाऊलवाटे ते दीड- दोन तासात आपण बिनी दरवाजातून तोरणा किल्ल्यावर जातो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment