माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी | My Favourite Animal Cat Essay in Marathi

माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी | My Favourite Animal Cat Essay in Marathi

प्राणी म्हणजे कोणाला आवडत नाही. आपल्या अवतीभवती अनेक लहान – मोठे प्राणी असतात. बहुतेक जण प्राण्यांना पाळतात सुद्धा. मलाही प्राणी पाळायला खूप आवडते त्यातल्यात्यात मांजर हा माझा आवडता प्राणी आहे.

मांजर पाहिले की मला खूपच आनंद होतो. मांजर माझ्या समोर आले की मी लगेच मांजरा जवळ जातो आणि तिला माझ्या जवळ घेतो.

माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी | My Favourite Animal Cat Essay in Marathi

मांजराच्या अंगावरील केसांवरून हात फिरवायला मला अधिकच आवडते. आणि हेच कारण आहे ज्यामुळे मला मांजर हा प्राणी खूप आवडतो. मी माझ्या घरी एक मांजर सुद्धा संभाळली आहे.

मांजरीनी या दिसायला खूपच सुंदर आणि नाजूक असतात. मांजर दिसायला वेगवेगळ्या रंगाचे असते. पांढरा, काळा, तांबडा आणि भुऱ्या राखाडी या रंगाच्या मांजरीने विशेषता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

माझ्याजवळ असलेल्या मांजराचा रंग हा पांढऱ्या रंगाचा असून त्यावर कळ्या रंगाचे ठिपके आहेत. मांजराचे डोळे खूप सुंदर असतात आणि अंधाराच्या वेळी मांजराचे डोळे चमकू लागतात. मांजराची नजर ही खूप तीक्ष्ण असते त्यामुळे रात्रीच्या काळोख्या अंधारामध्ये देखील मांजर अतिशय स्पष्टपणे बघू शकते.

डोळ्यां प्रमाने मांजराचे कान देखील अतिशय तीक्ष्ण असतात. मांजराचे कान नेहमी उभे असतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीची बारीकच चाहूल जरी आली तरी मांजरा लगेच सावध होते.

मांजराचे नाक देखील खूप तीक्ष्ण असते. मांजरीच्या आवडीच्या वस्तूचा वास मुळेच कळते व ती त्या वस्तूला शोधत येते. त्यामुळे मांजर ही खूप चंचल आणि चपळ प्राणी आहे.

माझ्याजवळ असलेल्या मांजराला मी मांजर ना म्हणता “माऊ” असे नाव ठेवले आहे व मी तिला माऊ याच नावाने बोलवतो. माझी मांजर ही खूप लहान होती तेव्हा मी तिला घरी घेऊन आलो. तेव्हापासूनच मी तिचा सांभाळ केला.

आता आमची माऊ ही दोन वर्षाची झाली असावी. या दोन वर्षामध्ये माझ्या आणि माझ्या मांजरी मध्ये खूप पक्की मैत्री झाली आहे. ती सतत माझ्या अवतीभवती फिरत असते. त्यामुळे तिला मी बोलावले सुद्धा कळते ती माझा आवाज देखील ओळखते.

घरातील सर्वांनाच माझी मांजर खूप आवडते. माझ्या मांजरीचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. म्हणून ती घरातील सर्वांवर खूप प्रेम करते ती आमच्या घरातील कुठल्याही सदस्याला चावत नाही.

मी लहानपणापासूनच माझ्या मांजराला शाकाहारी जेवण दिले आहे. त्यामुळे माझी मांजर आता पूर्णतः शाकाहारी आहे. मी माझ्या मांजरीला रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी दूध चपाती किंवा दूध पाव खायला देतो.

माझ्या मांजरीला भूक लागली की, ती माझ्या अवतीभवती फिरते. त्यामुळे मला चटकन कळते की माझ्या बाजरीला भूक लागलेली असावी.

मी आज पर्यंत माझ्या मांजरीला बांधून ठेवले नाही कारण तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती बाहेर जाऊन येते. परंतु बाहेर लोकांनी कोणीही तिला काही खायला दिले तर ती खात नाही.

माझी मांजर ही आमच्या घरातील एक सदस्य प्रमाणेच आहे. तुम्हाला माहितीच असेल की, मांजर दोन ते तीन महिन्यात पिलांना जन्म देते. त्याप्रमाणे माझी मांजर सुद्धा छान छान पिलांना जन्म देते.

मी माझ्या मांजर सोबत तिच्या पिलांची देखील काळजी घेतो. मांजरीला स्वच्छ धुणे तिला वेळो वेळ जेवायला देणे या सर्व गोष्टींची मी काळजी घेतो. माझ्या मांजरीचे पिल्ले खूप सुंदर असतात.

मांजर हा असा प्राणी आहे जो साधारण तर सर्वच ठिकाणी आढळतो. जास्त कोरूध गल्ली बोळांमध्ये तसेच ज्या ठिकाणी घरे मोठ्या संख्येने पाहायला मिळतात अशा ठिकाणी मांजर पाहायला मिळतेच.

आजकाल तर मांजर पाळायला सर्वांनाच आवडते. चित्रपटांमधील सेलिब्रेटी देखील आपल्या घरांमध्ये मांजर पाळताना दिसत आहेत. असे म्हटले जाते की, मांजराला कितीही उंचावरून खाली फेकले तरी ती आपल्या पायांवर उभा राहू शकते व तिला कुठल्याही प्रकारचा इजा होत नाहीत.

मांजरीचे आवडते भोजन म्हणजे उंदीर खाणे हे आहे. आणि हा निसर्गाचा नियम सुद्धा आहे. अशी ही माझी मांजर मला खूप आवडते व ती मला खूप प्रिय आहे. म्हणून माझा आवडता प्राणी मांजर आहे.

तर मित्रांनो ! ” माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी | My Favourite Animal Cat Essay in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

2 thoughts on “माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी | My Favourite Animal Cat Essay in Marathi”

Leave a Comment