माझा आवडता अभिनेता / कलाकार मराठी निबंध | Maza Avadta Abhineta / Kalakar Nibandh in Marathi

माझा आवडता अभिनेता / कलाकार मराठी निबंध | Maza avadta Abhineta / kalakar nibandh in Marathi

भारतीय चित्रपटसृष्टीने अतोनात प्रगती केलेली आहे. यातील हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक अभिनेता आणि अभिनेत्री आपली दिग्गज भूमिका बजावत असतात.

विविध चित्रपटातून लोकांच्या मनावर राज्य करीत असतात. प्रत्येक अभिनेता व अभिनेत्री ची स्वतःची अशी विशेषता असते ज्यामुळे ते खूप प्रसिद्ध होतात व त्यांना लोकांकडून खूप लोकप्रियता प्राप्त होते.

माझा आवडता अभिनेता / कलाकार मराठी निबंध | Maza Avadta Abhineta / Kalakar Nibandh in Marathi

भारताचा चित्रपट व्यवसाय हा हाॅलिवूड नंतरचा जगातील सर्वात मोठा व्यवसाय समजला जातो. म्हणूनच भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील लोक मुंबई येथे येऊन अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे स्वप्न बाळगत असतात. टीव्ही चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला अभिनेता हा आवडतच असतो. त्याप्रमाणे माझा आवडता अभिनेता किंवा कलाकार म्हणजे अभिताभ बच्चन हे आहेत.

अमिताभ बच्चन भारतीय चित्रपट सृष्टीतील एक विख्यात सुपरस्टार आहेत. म्हणून अभिताभ बच्चन ला चित्रपटसृष्टीचा शहिंशाह म्हणून देखील ओळखले जाते. अमिताभ बच्चन हे माझे आवडते अभिनेता आहेत.

अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीतील सर्वांना ओळखली जाणारी अशी प्रतिमा आहे. माझ्या मते सर्वाधिक चाहते है अमिताभ बच्चन यांचेच असावे कारण अमिताभ बच्चन हे खूप जुन्या काळापासून चित्रपट सृष्टी मध्ये काम करतात आणि त्यांची प्रत्येक भूमिका ही खूपच सरस आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारी व लोकप्रियता मिळवणारी असते.

अमिताभ बच्चन प्रत्येक भूमिका खूपच अस्सलतेने निभावतात मग ती कॉमेडी असो, ट्रॅजेडी असो किंवा खूप भाविक ते प्रत्येक भूमिका खूप सरळतेणे पार पाडतात.

अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीला अनेक धमाकेदार व खूप गाजलेले चित्रपट दिलेले आहेत. आज अमिताभ बच्चन 78 वर्षापेक्षा अधिक असले तरी त्यांचा आवाज आणि डोळ्यातली चमक की हे अद्यापही तशीच आहे जशी सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते.

90 च्या शतकामध्ये अनेक नवनवीन अभिनेता चित्रपटसृष्टीमध्ये उतरले परंतु या सर्व अभिनेत्रींना मागे टाकून अभिताभ बच्चन अव्वल दर्जाचे अभिनेता बनले व सर्वांच्या मनावर राज्य करणारे व सर्वाधिक लोकप्रियता प्राप्त करणारे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

अमिताभ बच्चन है हरिवंशराय बच्चन यांचे सुपुत्र आहेत. अमिताभ बच्चन पेशाने जरी अभिनेता असले तरी त्यांचे वडील एक लेखक होते. त्यांच्या वडिलांमुळे अभिताभ बच्चन देखील या साहित्यिक वातावरणामध्ये लहानाचे मोठे झाले.

त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपला प्रवेश केला. सुरुवातीला अमिताभ बच्चन याने ख्वाजा अहमद अब्बास यांचा चित्रपट ” सात हिंदुस्तानी “ या मध्ये काम केले.

या चित्रपटानंतर अभिताभ बच्चन यांनी खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आपला प्रवेश केला. व त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर त्यांना आगळी वेगळी अशी ओळख मिळाली.

पहचान यांच्या जीवनाला टर्निंग पॉइंट देणारा त्यांचा “आनंद” हा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर चहा त्यांच्या मनावर एक वेगळीच थासू म्हटली व अभिनेता अमिताभ बच्चन यांना खूप लोकप्रियता प्राप्त झाली.

यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक असे नवनवीन आणि प्रसिद्ध चित्रपटां मध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर अमिताभ बच्चन आणि जंजीर, मुकंदर का सिकंदर, कुली, अमर अकबर अँथनी, इन्कलाब, शराबी शोले, शहिंशाह, सूर्यवंशम असे अनेक हिट चित्रपट दिले.

या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांना संपूर्ण देशभरामध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. अभिताभ बच्चन यांना त्यांच्या चहात्यांन कडून लोकप्रियता यशाच्या शिखरापर्यंत मिळाली.

अमिताभ बच्चन यांचे आजचे वय अष्टयात्तर ( 78 ) वर्षापेक्षा अधिक असले तरीही ते न थकता आजही हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावू लोकांचे मनोरंजन करून लोकप्रियता प्राप्त करीत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जीवन काळामध्ये केलेल्या महत्त्वाच्या भूमिकांमुळे त्यांना वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारांमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, नॅशनल फिल्मफेअर अशा पुरस्कारांचा समावेश होतो. अशा अनेक कारणांमुळे अभिताभ बच्चन हे माझ्या आवडते अभिनेता व कलाकार आहेत.

तर मित्रांनो ! हे निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “माझा आवडता अभिनेता / कलाकार मराठी निबंध | Maza Avadta Abhineta / Kalakar Nibandh in Marathi”

Leave a Comment