माझे बालपण निबंध मराठी । Maze Balpan Nibandh In Marathi

माझे बालपण निबंध मराठी । Maze Balpan Nibandh In Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर आणि निर्मळ आठवण म्हणजेच ” बालपण “ होय. बालपणीची आठवण आली की प्रत्येक व्यक्ती हा आपल्या भूतकाळ मध्ये जातो आणि बालपणीच्या सर्व आठवणीचे एक एक करुन डोंगर पोखरू लागतो.

मग बालपण हे श्रीमंती मध्ये गेलेले असो किंवा गरिबी मध्ये बालपणीच्या आठवणी ह्या अप्रतिम असतात.

मुलगा असो किंवा मुलगी कडू- गोड, चांगल्या- वाईट आठवणींनी भरलेले असते ते म्हणजे प्रत्येकाचे बालपणच.

माझे बालपण निबंध मराठी । Maze Balpan Nibandh In Marathi

बालपणीची दिवस खूप मनाला आनंद देणारे असतात. जगातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे बालपण हे आठवतेच या सृष्टीवर अशी कोणतीही व्यक्ती बघायला मिळणार नाही की, त्या व्यक्तीला आपले बालपण आठवत नसेल.

संपूर्ण जीवनामध्ये बालपण हे एकदाच मिळते. म्हणून सर्वजण आपापल्या पद्धतीने बालपणीच्या आठवणी जपून ठेवत असतात. त्याच प्रमाणे मी ही माझ्या बालपणीच्या खूप साऱ्या आठवणी जपून ठेवल्यात बालपणीची आठवण आली की, बालपण पुन्हा हावे हावेसे वाटते. म्हणून म्हणतात की, प्रत्येकाच्या जीवनातील सुंदर क्षण असतात ते बालपणीच असतात.

माझे बालपण :

मी एका छोट्याश्या खेडेगावात राहत असल्याचे माझे संपूर्ण बालपण हे गावातच गेले. सर्वसाधारणा प्रमाणेच मी ही माझ्या बालपणीच्या बर्‍याचश्या आठवणी आजही जपून ठेवल्यात.

लहानपणी मी आणि गावातील मित्र- मैत्रिणी आम्ही सर्व मुले मिळून खूप मजा करायचो. तसेच घरामध्ये ही मी सर्वांपेक्षा लहान असल्याने घरातील सर्व म्हणजेच आजी, आजोबा, आई- बाबा, मामा- मामी, काका- काकू, आत्या- मामा सर्व जण माझा खूप लाड करत होते. खरोखरच बालपणातील दिवस खूपच गोड आठवणींनी भरलेले असतात.

लहानपणी मी खूप खोडकर आणि चंचल असल्याने नेहमी काही ना काही खोडकर काम करत होतो त्यामुळे कधी कधी बाबा मला रागवत आणि मारत सुद्धा होते पण मला त्यांनी मारले यामुळे कधीच दुःख झाले नाही कारण घरात मला तेवढच प्रेम आणि आपुलकी मिळत होती.

मित्र- मैत्रिणींचा सहवास :

बालपणी आम्ही गावातील सर्व मित्र- मैत्रिणी मिळून अनेक खेळ खेळायचो. जसे की कबड्डी, लंगडी, पळा- पळी, दोरीच्या उड्या असे अनेक खेळ खेळायचो.

मित्र -मैत्रिणींच्या सहवासात खेळताना कधी संध्याकाळ व्हायची याचे भानच आम्हाला राहत नव्हते. त्यामुळे आई मला रोज रागवत होती आणि म्हणत की ” जेवण तर वेळेवर करत जा “. पण खेळताना तहान आणि भूक याचे भान राहत नव्हते.

गावाच्या शेजारी नदी वाहते तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आम्ही सर्व मुले मिळून नदीवर जात होतो आणि नदीच्या किनाऱ्यावर बसून फक्त पाय नदीच्या पात्रात घालून पोहण्याची मजा घेत होतो.

शेतीची माहिती :

बालपणी मी कधी- कधी माझ्या बाबांसोबत शेतामध्ये फिरायला जात होतो. काही कळत नसताना ही बाबांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या कडून शेतीची माहिती घेत होतो.

शेतातील शांत वातावरण आणि मध्येच येणारी वारेची आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे निसर्ग मयी वातावरणाची आठवण झाली की पुन्हा बालपणात जावेसे वाटते.

पावसाळा ऋतु मध्ये मी पावसाच्या पाण्यामध्ये भिजायचो. आणि पावसाच्या पाण्याने खड्डे, लहान तळे भरली की त्यामध्ये उड्या मारायचो असे करताना मला खूप मजा वाटायचे.

विविध प्राणी, पक्ष्यांच्या सहवास :

खेडेगाव म्हणजे शेती, प्राणी आणि पक्षी आलेच. बालपणी आमच्या घरामध्ये गाय, म्हैस आणि बकरी- शेळ्या असायच्या. या प्राण्यांसोबत मी खूप खेळायचो. तसे आमच्या घरामध्ये एक मोत्या नावाचा कुत्रा होता.

मी त्या कुत्र्या वर खूप प्रेम करत आणि मोत्या सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करत होता. मी कुठेही गेलो तरी मोत्या माझ्या सोबतच यायचा. मी रोज रात्री मोत्याला आजोबांन सोबत मिळून दूध आणि चपाती खाण्यासाठी देत होतो.

आजी- आजोबांचा सहवास :

बालपणी मी रोज रात्री आजी- आजोबांसोबत झोपत होतो. आजी- आजोबा दोघे मिळून मला त्यांच्या काळातील कथा सांगत तसेच देवांच्या कहाणी सांगत होते. मला आजी- आजोबांन सोबत राहायला खूप आवडायचे.

आजोबा रोज सकाळी मला बागेत घेऊन जात होते व येताना मारुती मंदिरा मध्ये दर्शनासाठी नेत होते. आणि मला आजी-आजोबांच्या सहवासात राहिले खूप आवडायचे.

आनंदाचे दिवस :

बालपणातील सर्वात आनंदाचे दिवस म्हणजे मी माझ्या सर्व कुटुंबांसोबत आमच्या मामाच्या गावाला जायचो. मला आमच्या मामाच्या गावाला जायला खूप आवडत होता त्यामुळे मी दरवर्षी दिवाळी मध्ये मामाच्या गावाला जाण्यासाठी हट्ट धरत होतो. त्यामुळे आई- बाबा मला मामांच्या गावाला घेऊन जात होते व मी मामाच्या गावाला खूप मजा करत होतो.

निष्कर्ष :

माझे बालपण ही आजी- आजोबा आणि आई- बाबा यांच्या सहवासामध्ये अगदी मजेत गेले. मी माझ्या बालपणीच्या सर्व गोड आठवणी आजही माझ्या मनात कायम ठेवल्या आहेत. त्या आठवणी आल्या की मला पुन्हा पुन्हा माझं बालपण मिळावा असं वाटतं आणि मी पुन्हा माझं बालपण जगाव अशी माझी इच्छा होतो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

4 thoughts on “माझे बालपण निबंध मराठी । Maze Balpan Nibandh In Marathi”

Leave a Comment