कबूतर वर मराठी निबंध | Essay on pigeon in Marathi

कबूतर वर मराठी निबंध | Essay on pigeon in Marathi

आपल्या सभोवताली अनेक लहान मोठ्या आकाराचे पक्षी पाहायला मिळतात. काही पक्षी दिसायला अतिशय सुंदर असतात तर काही पक्षी हे विचित्र स्वरूपाचे असतात.

काही पक्षांना त्यांच्या दिसण्यामुळे आकारामुळे किंवा रंगामुळे अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जाते. तर काही पक्षी हे दिसायला विचित्र असल्याने त्यांच्याकडे कोणी डोकावून हे पाहत नाही.

असाच आपल्या सभोवताली सतत दिसणारा, दिसायला अतिशय सुंदर असणारा पक्षी म्हणजे कबूतर होय. सर्वसाधारणता सर्वत्रच पहायला मिळाला कबूतर एक सर्वसामान्य पक्षी आहे त्याला सर्व जण ओळखतात.

कबूतर वर मराठी निबंध | Essay on pigeon in Marathi

कबुतराची ” कबूतर आणि मुंगीची “ ही गोष्ट सर्वांनाच परिचयाचे असावी. लहान मुलांना तर कबूतर हा पक्षी या गोष्टींमुळे परिचयाचा होत असावा.

पूर्वीच्या काळामध्ये संदेश वाहनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने कबुतरांचा वापर संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी करत होते त्यामुळे कबुतराला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान होते.

कबूतर पक्षाची शरीररचना :

कबूतर हा एक खूप सुंदर पक्षी आहे. संपूर्ण जगामध्ये कबुतर हा पक्षी पाहायला मिळतो. कबूतर या पक्षाला सर्वसाधारणपणे पारवा या नावाने देखील ओळखले जाते.

कबूतर पक्षाचा आकार सर्वसाधारणपणे 30 सेंटिमीटर एवढा असतो. तसेच कबुतराला एक आखूड आणि करड्या रंगाची चोच असते आणि दोन पंख असतात. या पंखांच्या बळावरच कबुतर पक्षी आकाशामध्ये कोणचा अंतरावर देखील उडू शकतो.

कबूतर पक्षाचा रंग साधारणता राखाडी आणि निळा रंगाचा असतो काही भागांमध्ये पूर्णता पांढरा रंगाचे कबूतर देखील पहायला मिळते. कबुतराच्या पंखावर दोन काळ्या रंगाचे पट्टे असतात.

तर कबुतराच्या शेपटीच्या भागावर काळा रंग असतो. त्याच्या मानेवर आणि गळ्यावर हिरव्या व जांभळ्या रंगाचे चमकदार ठिपके असतात यामुळे कबुतर पक्षी अधिकच आकर्षित दिसतो.

कबूतर पक्षाचे डोळे लाल रंगाचे असतात तर त्याचे पाय बुटके, आखूड आणि लालसर रंगाचे असतात. कबूतर पक्षाचे नर आणि मादी हे दिसायला सारखेच असतात. कबूतर पक्षाचा आवाज गुटुर SS गु, गुटुर SS गु आसा असतो.

कबुतरा चे निवास स्थान :

कबूतर हा पक्षी साधारणता सर्वच ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु कबूतर पक्षाचे मूळ निवास स्थान हे युरोप, आफ्रिका, आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

तसेच कबूतर हा पक्षी आकारमानाने लहान असल्याने तो शेतीच्या प्रदेशांमध्ये, झाडाझुडपांनी मध्ये, शहरांमध्ये मुख्य प्राधान्य असलेल्या भागांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, धान्य कोठारी, रेल्वे स्टेशन आणि जुनी घरे किंवा किल्ल्यांमध्ये कबूतर हा पक्षी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि अशा भागांमध्ये कबूतर पक्षांची निवासस्थान असते.

कबुतराच्या अन्न :

कबूतर हा एक पाळीव पक्षी म्हणून देखील सांभाळला जातो. त्यामुळे हा पक्षी समाजप्रिय पक्षी आहे तो साधारणता मानवी वस्ती असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. त्यामुळे हा पक्षी धान्य खातो, त्यासोबतच पिकांवरील किडे, आळ्या, ज्वारी, हरभरे, शेंगदाणे, गहू इत्यादी अन्नसुद्धा खातो.

कबुतरा चे घरटे :

हा पक्षी मुख्यतः मानवी वस्ती असलेल्या ठिकाणी व अन्नधान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ठिकाणी पाहायला मिळतो. तसेच कबुतराची घरटी हे झाडावर उंच भागावर पाहायला मिळतात. तो मिळेल त्या वस्तू म्हणजेच गवताची काड्या, कापूस, दोरा इत्यादी वस्तूंपासून आपले घरटे बांधतो.

तसेच जुन्या घराच्या कपाटामध्ये देखील कबुतर राहतात. उंच इमारती मधील एखाद्या छतावरील देखील कबुतर पाहायला मिळतात. इतर पक्षांनी सोडून दिलेले घरटे हे पक्षी स्वतःचे घरटे म्हणून वापरतात.

कबूतर पक्षाचा प्रजनन काळ साधारणता वर्षभर असतो. मादी बांधलेल्या घरटा मध्येच अंडी घालते व त्यातून पिल्लांना उगवते. नर व मादी आपल्या पिलांचे संगोपन करतात.

कबुतराच्या प्रजाती :

जगभरामध्ये कबुतराच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. कबुतरांच्या सर्व प्रजातींपैकी कोलंबा येथील लिव्हिया डोमेस्टिक ही सर्वात जास्त समाजप्रिय किंवा माणसाच्या सहवासामध्ये राहणारी आहे.

कबुतराच्या या प्रजातीचा वापर पाळीव पक्षी म्हणून देखील करतात. म्हणून या प्रजातीवर जगभरामध्ये अनेक कविता कथा देखील पाहायला मिळतात. तसेच कबूतर एकनिष्ठ पक्षी असल्याने कबुतरावर आधारित अनेक कथा देखील प्रचलित आहेत.

कुकुट पालन च्या प्रकारे केले जाते तसेच काही बागांमध्ये कबुतरा चे पालन देखील केले जाते त्याला कबूतरखाना असे म्हणतात या कबुतरखाना मध्ये खूप मोठ्या संख्येने पक्षी ठेवले जातात व त्यांना तेथेच अन्न देखील उपलब्ध करून दिले जाते.

कबुतरा चे महत्व :

पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये पाहायला जाणाऱ्या प्रत्येक प्राण्याचे किंवा पक्षाचे काही महत्त्वाचे असे विशेष स्थान असते. त्याप्रमाणे कबुतराचे देखील आपल्या निसर्गासाठी महत्त्वाचे स्थान आहे.

पूर्वीच्या काळामध्ये संदेशवहनासाठी कबुतराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. परंतु अलीकडे निघालेल्या नवनवीन साधनांमुळे आज कबूतर संदेशवहनासाठी वापरले जात नाही. तरीसुद्धा काही भागांमध्ये कबूतर पाळले जाते व त्यांचे संगोपन देखील केले जाते.

कबुतर हा पक्षी खूप शांत स्वभावाचा आहे त्यामुळे कबुतराला ” शांतीचे प्रतीक “ म्हणून सुद्धा ओळखले जाते.

तर मित्रांनो ! ” कबूतर वर मराठी निबंध | Essay on pigeon in marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment