सिंहगड किल्ल्याचा इतिहास । Sinhagad Fort History in Marathi

सिंहगड किल्ल्याचा इतिहास । Sinhagad Fort History in Marathi

महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आपली वेगळीच छापा उमटविणारा सिंहगड ह्या किल्ल्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे. शिवकालीन काळातील हा किल्ल्याने खूप महत्त्वाचा इतिहास रचला आहे.

आज आपण याच ” सिंहगड किल्ल्याचा इतिहास ” व बरीचशी माहिती बघणार आहोत. चला तर मग बघुया काय आहे.

सिंहगड किल्ल्याचा इतिहास । Sinhagad Fort History in Marathi

पुण्याचे नैऋत्ये दिशेला असलेला हा किल्ला पुण्या पासून 25 किलो मीटरच्या अंतरावर आहे. सिंहगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून साधारणता 4400 फूट येवढी आहे.

सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा सिंहगड आहे. दोन पायऱ्या सारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे हा सिंहगड किल्ला पुण्यात कुठूनही दिसतो.

सिंहगड किल्ल्याचा इतिहास :

सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा आहे. काही स्थानिक महादेव कोळी लोकांच्या नुसार कौडण्य ऋषी यांनी या गडावर तपश्चर्या केली म्हणून या गडाच्या डोंगराचे नाव कोंढाणा असे पडले असावे.

इ.स. 1360 मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली. तेव्हा त्यांच्यात आणि कोळी राजा नागनायक यांच्या मध्ये युद्ध झाले. हे युद्ध 9 महिन्यांपेक्षा अधिक काळ चालले.

तेव्हा सुलतान किल्ला सोडून परत दिल्लीला गेला. व हा सिंहगड किल्ला परत निजामशाही पर्यंत किल्ला महादेव कोळी सामंताकडे गेला.

इ.स. 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा सुद्धा समावेश होता.

सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या सैनिकांनी हा किल्ला एक चढाई दरम्यान जिंकला होता.

त्या लढाईत तानाजी मालुसरे यांनी प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकला तेव्हा शिवाजी महाराजांनी ” गड आला पण सिंह गेला ” हे वाक्य उच्चारले.

असे म्हणतात की, तानाजी मालुसरे हा हजारी मावळ्यांचा होता. तो शिवाजी महाराजांचा एक बहादुर सरदार होताच पण बालमित्र सुद्धा होता. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा म्हणजेच हा सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची चिंता न करता हा किल्ला जिंकला.

सिंहगड किल्ल्याचे युद्ध :

सिंहगड किल्ला मिळवण्यासाठी व येथे आपली सत्ता स्थापित करण्यासाठी सिंहगडावर बरेच युद्ध झाले. पण त्यापैकी एक प्रसिद्ध युद्ध आहे ते म्हणजे मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे आणि नाईथ योद्धा तानाजी मालुसरे यांनी सिंहगड किल्ला मिळवण्यासाठी 1670 मध्ये केलेली लढाई आणि युद्ध होय.

या युद्धात तानाजी मालुसरे यांनी आपला जीव गमावला. तानाजी मालुसरे यांचा भाऊ ” सूर्याजी ” यांनी ” कोंढाणा ” किल्ला ताब्यात घेतला. आज सर्वत्र कोंढाणा या किल्ल्याला सिंहगड म्हणून ओळखले जाते.

या युद्धात तानाजीच्या योगदानाच्या स्मरणार्थ किल्ल्यात तानाजी मालुसरे यांच्या मूर्तीची स्थापना केली गेली. व तेव्हा पासून या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले.

सिंहगड किल्ल्यावरील पाहण्या सारखी ठिकाणे :

सिंहगड हा किल्ला पर्यटना साठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे या किल्ल्यावरील पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

1. दारूचे कोठार :

दारूचे कोठार या दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे एक दगडी इमारत दिसते त्यालाच दारूचे कोठार म्हणतात. परंतु 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली.

2. टिळक बंगला :

सिंहगड किल्ल्याच्या आत असलेला हा टिळक बंगला रामलाल नंदराम नाईक यांच्या कडून खरेदी केलेल्या जागेवर आहे. या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत म्हणून या बंगल्याला टिळक हे नाव दिले असावे.

3. कोंढाणेश्वर :

कोंढाणेश्वर हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते.

4. देवटाके :

तानाजी स्मारकाच्या मागून छोटा तलावाच्या बाजूला देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून आजही होतो.

5. कल्याण दरवाजा :

सिंहगडाच्या पश्चिम दिशेस हा कल्याण दरवाजा आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी कल्याण या गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो.

6. उदयभानचे स्मारक :

कल्याण दरवाजाच्या मागच्या बाजूने वर असलेल्या टेकडीवर गेल्यास तेथे चौकोनी आकाराचा दगड आहे. आणि तेच उदयभानचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते.

7. राजाराम स्मारक :

राजस्थानी पद्धती सारखे दिसणारे रंगीत देवळा सारखी जी घुमट दिसते तेच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे.

8. सुभेदार तानाजीचे स्मारक :

अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यास आपल्याला सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते. ‘ सुभेदार तानाजी स्मारक ‘ समितीच्या वतीने ह्या स्मारकाची बांधणी झाली.

सिंहगड किल्ला हा पुण्याच्या अनेक रहिवाशांसाठी लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. लष्करी, काली मंदिर, हनुमान पुतळा हे ऐतिहासिक स्थळे पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहेत. सिंहगड किल्ला पासून आपल्याला डोंगराळ खोऱ्याचे भव्य दृश्य पाहू शकतो.

सिंहगड हा किल्ला खडकवासला येथील राष्ट्रीय सुरक्षा अकादमी येथे प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे.

सिंहगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :

सिंहगड हा किल्ला प्राचीन काळापासून एक पर्यटनाचे स्थळ बनले आहे. दरवर्षी प्रचंड संख्येने अनेक पर्यटक येथे किल्ला बघण्यासाठी जातात.

सिंहगड हा किल्ला पुण्या पासून सुमारे 20 किलो मीटर अंतरावर आहे. स्वारगेट बस स्थानकापासून सारसबाग किंवा नेहरु क्रीडांगणापासून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड 35 किलो मीटर अंतरावर आहे.

स्वारगेट पुणे- आनंदनगर- वडगाव- खडकवासला- सिंहगड या मार्गाने आपण सिंहगडावर जाऊ शकतो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment