रात्र नसती तर मराठी निबंध । Ratra Zali Naste Tar Marathi Nibandh

रात्र नसती तर मराठी निबंध । Ratra Zali Naste Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” रात्र नसती तर मराठी निबंध “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

रात्र नसती तर मराठी निबंध । Ratra Zali Naste Tar Marathi Nibandh

रात्र म्हणजे विश्रांतीची वेळ. संपूर्ण जग या रात्रीच्या वेळी झोपेत हरवलेले असते. दिवसभराचा थकवा ; चिंता यांपासून वंचित आपण गाढ झोपी जातो.

रात्रीच्या झोपीत असे वाटते की, आपण एका नवीन दुनियेत जणू प्रवेश घेतला. रात्रीची शांतता मनाला एक विशेष प्रकारचा आनंद देते. मग ही संतुष्टाची रात्र नसती तर… ?

रात्र नसती तर माणूस कोठे विश्रांती घेईल ? रात्रीच्या काळोखात सर्व काही काळोख्यात झाकून टाकणारी रात्र होते, ज्यामुळे रात्रीच्या शांततेत सर्व जण गाढ झोपण्याचा आनंद घेतात. सर्व गोष्टींची चिंता, निराशा सोडून रात्र घालवतात.

जर रात्र नसती तर सर्वत्र, सूर्याचे साम्राज्य झाले असते. अरे, हा दुपारचा सूर्य ! आकाशातून बरसणारी भीषण उष्णता ज्यामुळे सर्व पृथ्वी गरम झाली असती.

जर रात्र आपली शीतलता आणि शांतता दान करण्यासाठी येत नसेल तर या गरम सूर्याचे अग्निबाणासारख्या पडणाऱ्या उन्हामुळे आपल्यावर काय परिणाम होतील त्यामुळे सर्व सृष्टीचे सौंदर्य नष्ट होतील. सर्व पृथ्वीचे रूपांतर उन्हाच्या वाळवंटा मध्ये होईल.

जर रात्र नसती तर त्यामुळे आपल्याला थोडा फायदा झाला असता तो म्हणजे रात्रीच्या अंधारात चोरी करणाऱ्या चोरांची संधी गमावली असती व सर्व चोरींचे प्रकार बंद झाले असते.

रात्रीच्या वेळी कडाक्याच्या थंडीमुळे गरिबांची जी दुर्दशा होते ती झाली नसती. बँकेचे अथवा घराचे पहारेकरी आपली झोप खराब करून पहारा देतात त्यांचा त्रास कमी झाला असता.

रात्रीच्या वेळी लागणाऱ्या विजेचा खर्च वाचला असता. विद्यार्थ्यांना रात्रभर जागून अभ्यास करावा लागला नसता. जर ही रात्र नसती तर अशा प्रकारे फायदे झाले असते परंतु रात्र नसती तर रात्री दिसणाऱ्या ताऱ्यांची मौजे घेता आली नसती.

शुक्रतारिकेच्या तेजस्वी सौंदर्याचे दर्शन कसे झाले असते ? आणि रूपराजा आपला चंदामामा यांचे मोहक दृश्य आपण कसे पाहिले असते ? त्यामुळे आपल्याला चंद्राचे आहे चांदण्याचे नाव सुद्धा माहिती राहिले नसते.

दिवसभर काम करून थकलेली मंडळी विश्राम कधी करणार ? दिवसा झोप लागते पण ती झोप रात्री प्रमाणे शांत आणि गाढ नसते. त्यामुळे सर्वांचा स्वभाव हा चिडचिडा बनतो.

घरातील बायकांना दिवस भर स्वयंपाक घरातून सुट्टी मिळाली नसती. रात्रीच्या अंधारामध्ये दिवे लावून दिवाळी साजरा करण्याची मज्जा ही वेगळीच असते. मग रात्र झाली नाही तर आपण रोषनाईचा आनंद कसे घेणार. त्यामुळे रात्री झाली नाही तर आपले आयुष्य अपूर्ण राहिले असते.

रात्रीचे सुख मिळाल्याशिवाय आपले रोजचे आयुष्य निस्तेज झाले असते ! त्यामुळे रात्र होणे ही गरजेची बाब आहे.

तर मित्रांनो ! ” रात्र नसती तर मराठी निबंध ” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” रात्र नसती तर मराठी निबंध “ यामध्ये एक आमच्या कडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment