वर्तमान पत्र बंद झाली तर | Vartman Patra Band Zali Tar Essay In Marathi

वर्तमान पत्र बंद झाली तर | Vartman Patra Band Zali Tar Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही वर्तमान पत्रे बंद झाली तर… “ या विषयावर निबंध बघणार आहोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

वर्तमान पत्र बंद झाली तर | Vartman Patra Band Zali Tar Essay In Marathi

रोजच्या प्रमाणे आजही सकाळी उठल्या नंतर वर्तमान पत्र वाचण्यासाठी माझी आणि दादांची नेहमी प्रमाणे भांडण झाली. आणि आमचा गोंधळ ऐकून आई रागाने आम्हा दोघांना ओरडली आणि म्हणाली की, ” ही वर्तमानपत्रे कायमची बंद झाली तर बरे होईल ! ”

आईने म्हटल्या प्रमाणे, वर्तमान पत्रे बंद झाली तर ? तर काय होईल ?

मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र हे बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलते. आणि या वर्तमान पत्राचे नाव ” दर्पण ” असे ठेवले. दर्पण या शब्दाचा अर्थ ‘ आरसा ‘ असा होतो. आणि खरोखरंच वर्तमानपत्रे ही समाजाचा चालता-बोलता आरसाच आहे.

ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालणाऱ्या या जगात आज वर्तमानपत्रांना महत्त्वाचे स्थान आहे. वर्तमानपत्रे जगातील प्रत्येक कोपऱ्याला एकमेकांशी जोडण्याचे काम करतात. आणि अशा या वर्तमान पत्रांच्या आरशात आपण क्षणा- क्षणात बदलत असलेल्या जगाचे प्रतिबिंब पाहतो. म्हणून वर्तमान पत्रे आज सर्वसामान्यांची गरज बनली आहे.

आजच्या काळात वर्तमानपत्रे काही लोकांसाठी तर व्यसन बनले आहेत. सकाळी उठल्या बरोबर वर्तमान पत्रातील बातम्या वाचणे हा काही जणांचा छंद बनला आहे. मग हे ” वर्तमान पत्रे बंद झाली तर ? ”

सर्वांना जगामध्ये काय चालू आहे. यांच्या बातम्या मिळाल्या नसत्या. वर्तमान पत्राचे व्यसन असलेले असे हे वर्तमानपत्र प्रेमी कुठे गेले असते ?

वर्तमानपत्र नसते तर घरी बसून जगातील ताज्या घटनांविषयी आपल्याला कसे कळले असते ? जगाच्या घडामोडी तर लांबच तर देश आणि आपण राहतो त्या शहरातील हालचालीं पासूनही आपण वंचित राहिलो असतो ?

जगाच्या कुठल्या कोपऱ्यात युद्ध चालू आहे, कुठल्या भागात नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत, देशात कुठे कोणत्या पक्ष्याची सत्ता चालली आहे या सर्वां पासून आपण आज्ञान राहिलो असतो.

वर्तमान पत्रांमध्ये आपल्याला घरी बसल्या जगातील सर्व ठिकाणांची माहिती आपल्या पर्यंत पोहोचते. कोणता कार्यक्रम कुठे होणार आहे, याविषयी आपल्याला वर्तमान पत्रांशिवाय हे कसे कळले असते ?

तसे वर्तमान पत्रांतील जाहिरातीं मधून आपल्या कधी कुठला सिनेमा प्रदर्शित होणार आहे याची माहिती मिळते. व्यवसाय, नोकरी, जमीन आणि विविध उत्पादनां विषयी माहिती मिळते. मग ही वर्तमान पत्रे बंद झाली तर व्यवसाया बद्दलची माहिती आपल्याला कशी मिळणार.

वर्तमानपत्रे बंद झाल्याचा परिणाम :

आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची असणारी ही वर्तमान पत्रे बंद झाली तर त्याचा परिणाम आपल्या वरच होईल. वर्तमान पत्र बंद झाल्याने ज्या लोकांचा उदरनिर्वाह या वर्तमान पत्रांवर चालत आहे ते लोक निकामी होतील. त्यांना पोट भरविण्यासाठी दुसरा व्यवसाय शोधावा लागेल.

त्या घरोघरी जाऊन वर्तमान पत्र वाटप करणाऱ्या व्यक्ती पासून ते वर्तमान तयार करणाऱ्या कंपनीतल्या पत्रकार, संपादक, लेखक इत्यादी सर्वांचा समावेश यामध्ये होतो.

त्यामुळे वर्तमान पत्र बंद झाल्याने खूप लोक बेरोजगार होतील त्यामुळे आपल्या देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल करेल. आणि याचाच परिणाम महागाई वाढीवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. शाळेत जाणारी मुलं ज्यांना वर्तमानपत्र वाचल्यामुळे वाचनाचा छंद लागण्यास मदत होते ते कुठेतरी नाहीसा होईल.

जगभरातील माहिती पोचविण्याचे एक साधन नष्ट होईल. वर्तमानपत्र बंद झाली तर चालू घडामोडी साठी फक्त टीव्ही आणि इंटरनेट वरच अवलंबून रहावे लागेल.

मग जास्त वेळ टीव्ही आणि मोबाईल बघितले तर डोळ्यांचे आजार, कंबर दुखी यांसारखे आजारांना बळी जावे लागेल. तसेच वर्तमानपत्र आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर ठरते. पाच रुपयांत येणारे वर्तमानपत्र बंद झाले तर टीव्ही आणि मोबाईला महाग रिचार्ज करावा लागेल.

वृत्तमानपत्रे बंद झाली तर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. थोडक्यात सांगायचे म्हणजे, जगभरातील घडामोडींची माहिती देणारे महत्त्वाचे साधन म्हणजे वर्तमानपत्र !

वर्तमानपत्र हे करमणुकी बरोबर लोकशिक्षणाचे ही माध्यम आहे. या वर्तपत्रांमुळे जग लहान झाले आहे. त्यामुळे ही वर्तमानपत्रे बंद होणे म्हणजे आपल्या सर्वांसाठी खुप नुकसानदायक आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment