माझी लढाई मराठी निबंध । Essay On Mazi Ladhai Marathi Nibandh

माझी लढाई मराठी निबंध । Essay On Mazi Ladhai Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझी लढाई मराठी निबंध ” या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाइट वरील सर्वच निबंध आणि माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझी लढाई मराठी निबंध । Essay On Mazi Ladhai Marathi Nibandh

” माझी लढाई मराठी निबंध ” या निबंधामध्ये आम्ही एक प्रसंग घेऊन आलोत. ज्या मध्ये स्वतःला स्वतःशीच लढाई करून ती लढाई जिंकायची सुद्धा आहे.

संध्याकाळी 7 वाजणारच होते, तेवढ्याच मी डोळे उघडले आणि पाहतो तर काय माझ्या आजूबाजूला मला माझे घर न दिसता औषधे, सलाईन, इंजेक्शन, डॉक्टरस् आणि नर्सेस दिसत होते. आणि मी एक बेडवर निपचीप पडलेलो होतो.

सुरुवातीला मला कळलेच नाही की, नक्की माझ्यासोबतच झाले तरी काय ? थोड्या वेळातच डॉक्टरांना बाबांना चंद्रकांत म्हणून आवाज दिली. आणि डॉक्टर बाबांना म्हणाले की, ” चंद्रकांत तुमचा मुलगा शुद्धीवर आलायं हा “!

डॉक्टरांचे ते वाक्य ऐकून बाबा पळतच माझ्या खोलीत आले. बाबांसोबत आईही आली. आई- बाबांच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर आनंदाचे हास्य होते. आई माझ्या जवळ येऊन म्हणाली, ” बाळ, ओळखतोस ना मला ? मी कोण आहे ?

सुरुवातीला माझ्या लक्षात आलेच नाही की आई मला असे का विचारत आहे. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या डाव्या पायाकडे आणि हाताकडे गेले. माझ्या डाव्या पायाला आणि हाताला प्लास्टर केलेले होते.

त्यानंतर मला आठवले की, हॉकी खेळताना माझे राज्य ( State ) पातळीमध्ये सिलेक्शन ( Selecetion ) झाले होते. येणारे आठ महिन्यामध्ये माझी राज्य पातळीवर हॉकी खेळाचा स्पर्धा होणार आहे.

त्यासाठी मी प्रॅक्टिस ( Practice ) करण्यासाठी मैदानावर खेळत होतो. खेळत असताना माझा पाय मित्राच्या पायात अडकला व मी मैदानावर पडलो होतो. व माझ्या अंगावर माझा मित्र पडला होता.

तेव्हा मला हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत दाखल केले होते. तेव्हापासून आज मला शुद्ध आली यामध्ये पाच दिवसाचा काळ ओलांडला होता.

या परिस्थितीमध्ये डाव्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले होते. म्हणून माझ्या डाव्या पायाला आणि हाताला प्लास्टर आहे.

तेवढ्यात डॉक्टर मला म्हणाले की, ” तुझ्या पायाला प्लास्टर असल्याने तुला पुढील सहा महिने मैदानावर खेळता येणार नाही “. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन निसटली कारण पुढील सहा महिन्यात माझी हॉकी ची स्पर्धा होणार होती.

पण तेव्हा मी कोणाला काही न म्हणता शांत होतो. आणि मी मनाशी ठरवलं की, आता मला या परिस्थितीशी लढायचे आहे आणि जिंकायचे सुद्धा कारण आता ही लढाई स्वतःची स्वतःची होती. आणि मी ठाम निर्णय घेतला की मला माझी लढाई जिंकायची आहे. आई- बाबा मला काही समजून घडण्यापूर्वीच मी स्वतःला समजावले होते. त्यामुळे आई- बाबांनाही समाधान वाटले.

हॉस्पिटल मधून घरी आल्यावर मला कॉलेजमधले दिवसं, मित्र मैत्रिणी यांची आठवण येऊ लागली. आणि हॉकी स्पर्धेची चिंता वाटू लागली. हॉकीचे स्पर्धा जिंकणे हे माझं स्वप्न होता.

मी घरी आल्याची बातमी माझ्या मित्र- मैत्रिणीला कळताच सर्वजण मला भेटायला घरी आले. कॉलेज मधल्या गप्पा, अभ्यास, जोक्स यांमध्ये माझे मन रमण्याचा प्रयत्नही ते करत होते. हळूहळू मी चालण्यास सुरुवात केली. तीन महिन्यानंतर मी माझे पहिले पाऊल उचलले ते ही कोणाचा आधार न घेता.

हळूहळू चालण्यास सुरूवात केली. आणि मी चालत हॉकी मैदानावर जाऊन इतर मुलांना खेळताना बघत होतो. आणि हॉकी खेळाचे प्रशिक्षक सादवे सर्वांशी गप्पा मारत त्यांच्याशी बोलण्याने माझे मनोबल वाढायचे यामध्ये सहा महिने कसे गेले कळलेच नाही. आणि माझ्या पायामध्ये ही बराचसा फरक जाणवत आहे. आणि मी मैदानावर पुन्हा हॉकी खेळताना उतरण्यासाठी समक्ष झालो असे मला वाटले.

राहिलेल्या दोन- महिन्यात मी हॉकीची उत्तम तयारी केली व या स्पर्धा सुद्धा जिंकली. त्या बरोबरच मी ” माझी लढाई ” ही जिंकली. स्वतःची स्वतःशीच लागलेली ही लढाई मी कुठल्याही परिस्थितीला न घाबरता जिंकली आणि हॉकीचे माझे स्वप्न सुद्धा पूर्ण झाले.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment