खेड्याकडे चला निबंध मराठी | Khedyakade Chala Nibandh Marathi

खेड्याकडे चला निबंध मराठी | Khedyakade Chala Nibandh Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” खेड्याकडे चला ” या विषयावर निबंध लिहून आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईटवरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

खेड्याकडे चला निबंध मराठी | Khedyakade Chala Nibandh Marathi

आपल्याला माहिती आहे की, आपला भारत देश हा अनेक खेड्यांनी मिळून बनला आहे. म्हणून आपल्या देशांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ही ‘ खेड्याकडे चला ‘ असा नारा त्यावेळी दिला होता.

त्यांच्या मते भारतातील खेड्यांचा विकास झाला तर भारताचा विकास आपोआपच होईल. त्यामुळे खेड्यांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे खेड्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

भारत कृषिप्रधान देश :

सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या भारताचे राष्ट्रपती महात्मा गांधी यांनी नारा केला होता की, ‘ खेड्याकडे चला ‘ तेव्हा त्यांनी संपूर्ण भारताची यात्रा केली असता त्यांना दिसून आले की भारत हा खेड्यांचा देश आहे.\

खेडी सुधारली, या खेड्यांचा विकास झाला तरच आपल्या देशाचा विकास होईल म्हणून त्यांनी तरुण पिढीला आवाहन केले की ‘ खेड्यांकडे चला ‘.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतात 90% शेती ही ग्रामीण भागांमध्ये होते. म्हणजेच खेड्यांमध्ये होते. जेव्हा खेड्यातील शेतकरी आपल्या शेतीमध्ये पीक पिकवतात तेव्हा ते धान्य संपूर्ण देशाला पुरवले जाते.

किंबहुना बाहेरच्या देशात सुद्धा पाठविले जाते. यावरूनच कळते ही भारताला कृषिप्रधान देश बनण्यामागे मोठा हात आहे तो म्हणजे या खेड्यांचाच त्यामुळे खेड्यांचा विकास होणे गरजेचे आहे.

खेड्यातील शांत व निरामय जीवन :

खेड्यातील लोकांच आयुष्यकाळ हा खूप मोठा असतो. हे आपण अनुभवले कारण शहरी जीवनापेक्षा खेड्यांतील जीवन हे शांत आणि निरामय असते. खूप पूर्वीपासूनच भारतीय संस्कृती मध्ये गावाकडची संस्कृती ही आरोग्यदायी संस्कृती म्हणून ओळखली जात होती.

परंतु आत्ताच्या एकविसाव्या शतकामध्ये खेड्यांपर्यंत सर्व तंत्रज्ञान झपाट्याने पोहोचू लागल आहे.

खेड्यांचा जीवन म्हणजे आनंदी आणि निसर्गमय वातावरणामध्ये कष्ट करून स्वतःला सुरक्षितता प्रदान करणारे जीवन आहे.

आज शहरीकरणामध्ये झालेल्या झपाट्याच्या वाढीमुळे शहर हे गर्दीचे ठिकाण, गाड्यांचे ठिकाण आणि प्रदूषणाचे केंद्र बनत आहेत. याउलट खेड्यांमध्ये कमी प्रमाणात वस्ती, झाडांचे प्रमाण जास्त, शांतता वातावरण यांमुळे खेड्यातील जीवन हे शांत आणि आरामदायी जीवन आहे.

खेड्यांचे आजचे स्वरूप :

खेड्यांमध्ये शेती व्यवसाय सोडून इतर व्यवसायाची सोय नसल्याने खेड्यांतील लोक आज शहरांकडे धाव घेताना दिसत आहे. खेड्यांमध्ये पुरेशा सोयी, व्यवस्था नसल्याने खेड्यातील लोक अन्नाच्या शोधात निघून जातात.

खेड्यांमध्ये शुद्ध वातावरण आणि शांतता आहे पण जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सोईंचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे खेड्यातील लोक गावातील जीवनाचा त्याग करून शहरातील धक्का- बुक्कीच्या जीवनात फक्त उद्योग धंद्यासाठी कामासाठी जात आहेत. व खेड्याचे स्वरूप बदलत जात आहे.

आजही भारतात काही अशी खेडी आहेत. की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी उपलब्ध नाहीत. वीज पुरवठा नाही ना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. मुलांना शिकवण्यासाठी शिक्षणाची ही सुविधा नाही.

त्यामुळे त्या खेड्यातील लोक अज्ञानी राहत आहेत. तर काही लोक सुख- सुविधांच्या शोधात शहरांकडे धावत आहेत. अश्या खेड्यांचे स्वरूप बदलणे आज गरजेची गोष्ट झाली आहे.

कारण आपल्या भारतातील लोकसंख्येच्या निम्मी लोक हे खेड्यात राहतात. मग या खेड्यांचा विकास व्हायला नकोय का ?

आपल्या देशातील खेड्यांचा विकास व्हायलाच पाहिजे. जेव्हा या खेड्यातील प्रत्येक नागरिकाची प्रगती होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला देश प्रगती करेल. खेड्यातील लोकांनाही शहराप्रमाणे सर्व सुविधा मिळायला हव्यात.

शिक्षणाची सोय व्हायला हवी. इथल्या लोकांना योग्य तो औषधोपचार, विजेची सोय, रस्ते, घरे मिळाली पाहिजेत.

शहराप्रमाणे येथील लोकांनाही उद्योग- धंदा, काम यांच्या मध्ये मदत झाली पाहिजे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तंत्रज्ञानाचे ज्ञान देऊन त्यांच्याकडून उत्तम शेती करून घेतली पाहिजे. संपूर्ण देशाला अन्न पुरवणाऱ्या या खेड्यांतील लोकांच्या विकासाचा विचार व्हायला हवा.

ज्या दिवशी भारतातील सर्व खेड्यांचा विकास होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या भारताचा विकास होईल. आणि महात्मा गांधीजींनी केलेला नारा ” खेड्याकडे चला ” याची पूर्तता होईल.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment