माझे घर निबंध मराठी । My Home Essay In Marathi

माझे घर निबंध मराठी । My Home Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध बघायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” माझे घर निबंध मराठी My Home Essay In Marathi या विषयावर निबंध घेऊन आलोत.

या वेबसाईटवरील सर्वच पोस्ट वाचून आपणास नक्कीच आनंद होईल.

माझे घर निबंध मराठी । My Home Essay In Marathi

मी माझ्या आई- बाबांन सोबत मिळून माधवनगर या गावामध्ये राहतो. आणि याच गावांमध्ये ” माझे घर ” आहे. माझ्या घराचे नाव “आनंदसदन ” आहे.

नावा प्रमाणेच माझ्या घरात नेहमी आनंदमयी वातावरण असतो. घराची लक्ष्मी म्हणजे माझी आई आमच्या घराला नेहमी निर्मळ आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. माझ्या घरात 3 रूम, एक स्वयंपाक घर, एक छोटेसे देवघर आणि बाथरूम आहेत.

अशा माझ्या लहानश्या घरामध्ये आम्ही पाच जण राहतो. मी माझे आई- बाबा आणि आजी- आजोबा अशा हा आमचा छोटासा परिवार आमच्या घरा मध्ये राहतो.

माझे घर हे आकाराने जरी मोठी नसले तरी या घरात राहणारी माणसे मात्र मनाने खूप मोठी आहेत. त्यामुळे माझ्या घरात नेहमी सर्व जण आनंदात असतात म्हणून मला माझ्या या छोट्याशा परिवारा सोबत घरातच राहावेसे असे वाटते, कारण घरामध्ये खूप शांतता असते.

माझ्या घराच्या तीन रूमपैकी एक रूम माझं आहे. या खोलीत मी माझे स्टडी टेबल ठेवला आहे. त्या टेबल वरच मी माझा सर्व अभ्यास करतो, वाचन करतो. या टेबलाच्या जवळच माझे कपाट आहे त्यामध्ये माझ्या गरजेच्या सर्व वस्तू मी व्यवस्थित ठेवल्या आहेत.

माझ्या घरातील प्रत्येक खोलीला मोठ्या खिडक्या आहेत. ज्यामुळे घरात मोकळी हवा येते. व घर थंड राहून घरातील वातावरण निर्मळ राहते. त्यामुळे माझ्या घरात जास्त गरम होत नाही.

माझ्या घराच्या वर गच्ची आहे. गच्चीवर आम्ही सर्व मित्र मिळून खेळत असतो. संध्याकाळच्या वेळी पतंग उडवतो आणि खूप मजा करतो. कवयित्री विमल लियमे म्हणतात की,

घर असावे घरासारखे ! नकोत नुसत्या भिंती ।

प्रेम, जिव्हाळा लाभो तेथे । नकोत नुसती नाती ।।

त्याप्रमाणेच माझ्या घरा मध्ये नेहमी माझे मित्र, बाबांचे मित्र, आईंच्या मैत्रिणी, आजी- आजोबांच्या जुन्या काळातील नागरिक आणि आमुचे पाहुणे नेहमी येत असतात. ज्यामुळे माझे घर नेहमी भरलेले असते. आई रोज सकाळी देवपूजा करून आरती करते त्यामुळे घराला घरपण येते.

माझ्या घराच्या समोर एक फुलबाग आहे. बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. त्यामुळे विविध पक्षी रोज सकाळी झाडावर येतात. त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. मी रोज दुपारच्या वेळी या बगीचा मध्ये जाऊन बसतो.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आम्ही सर्वजण मिळून कॅरम असे खेळ खेळतो. आई आम्हाला नव- नवीन पदार्थ खायला करून देते. माझ्या या ” आनंदसदन ” घराची रक्षा करण्यासाठी आम्ही एक कुत्रा पाळला आहे. माझ्या आजोबांनी या कुत्र्याचे नाव ” शेरू ” असे ठेवले आहे.

मी आणि आजोबा रोज शेरूला संध्याकाळी दूध आणि चपाती जेवायला देतो. आम्ही कधी सुट्ट्यांमध्ये गावाला गेलो तर शेरू हा इमानदारीने आमच्या घराचे रक्षण करीत असतो. म्हणून आम्ही शेरुल कुत्रा न समजता आमच्या घराचा एक सदस्य समजूनच शेरूची काळजी घेतो. गावातील सर्व लोक शेरूला घाबरतात.

अश्या प्रकारे समृद्धीने आणि समाधानाने परिपूर्ण असलेले आमचे हे ” आनंदसदन ” घर आहे. मला घरात राहायला कधीही कंटाळा येत नाही उलट मला माझ्या घरात राहायला खूप खूप आवडते. मी कधी बाहेर गेलो तरी मला माझ्या घराची खूप आठवण येते.

माझे घर मला खूप खूप आवडते. माझे घर हे खूप सुंदर आहे. मी माझ्या घरावर खूप खूप प्रेम करतो.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment