माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध | My Favourite Bird Peacock Essay in Marathi

 माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध | My Favourite Bird Peacock Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो! आपले …….या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचयला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध । My Favourite Bird Peacock Essay in Marathi “ घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की,या वेबसाईटवरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

 माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध | My Favourite Bird Peacock Essay in Marathi

निसर्गामध्ये विविध पक्षी बघायला मिळतात त्यातील काही पक्षी दिसायला अतिशय कुरूप तर काही पक्षी आहे खूप सुंदर असतात. विविध रंगाच्या आणि विविध आकाराचे हे पक्षी निसर्गाची शोभा वाढवित असतात. मला रंग खूप आवडतात. सर्वच रंग एकत्र पहायचेयचा असेल तर एक इंद्रधनुष्य पाहावा आणि दुसरा म्हणजे मोर.

विविध रंगांच्या पिसांनी सौंदर्यपूर्ण असलेला हा मोर पक्षी माझा आवडता पक्षी आहे. मोराच्या सुंदर ते मुळे माझा आवडता पक्षी मोर आहे.

मोराला इंग्रजीत पिकॉक ( Peacock ) म्हणतेत. तर शास्त्रीय भाषेत पावो क्रिस्टेटस (Pavo cristatus) असे म्हणतात.

मोर पाहताच माझे मन अगदी आनंदित होते.आणि लहानपणीची ती बाल कविता “नाच रे मोरा” मला आठवायला लागते. मोराचा तो हिरव्या निळ्या रंगाचा पिसारा आणि डोक्यावर असलेला तुरा सार्वांनाच मोराच्या प्रेमात पाडतो. मोर हा पक्षी घनदाट जंगलाच्या ठिकाणी आणि शेतीच्या आजूबाजूच्या परिसरात आढळतो.

मोराची लांबी साधारणता ‌200 ते 250सेंटीमीटर असते. तर मोराचे वजन हे पाच ते सहा किलोपर्यंत भरते. मोर पक्षाच्या मादीला लांडोर असे म्हणतात. मोराला पाऊस खूप आवडतो म्हणून रिमझिम पावसाच्या वेळी मोर नेहमी नसताना दिसतो.

आणि पावसाच्या वेळी मोर आपला पूर्णता पिसारा फुलवून नाचतो. यावेळी मोराचे सौंदर्य बघण्यासारखे असते. मोर आपला पिसारा फुलवून लांडोर पक्षाला आपल्याकडे आकर्षित करतो.

मोर पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. सोबतच ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ, भूतान, ब्बंगलादेश अशा देशात सुद्धा आढळतात. मोर दिसायला जेवढा सुंदर आहे तितकाच त्याचा आवाज सुद्धा सुंदर आहे. मोर म्याव ssम्यावss अश्या आवाजात ओरडतो . मोराच्या सुंदर दिसण्या मुळे काहीजण मोराला पाळण्याचा विचार करतात. परंतु भारतात मोराला पाळणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे.

मोर किडे ,साप, उंदीर ,आळ्या यांना खाद्य म्हणून खातो. म्हणून मोराला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. त्यासोबतच मोर धान्य,बिया, शिजवलेले अन्न हेसुद्धा खातात. विविध फळेसुद्धा मोर खातात.

मोर नेहमी झाडावर समूहाने राहतात, मोरला जास्त उंचावर उडता येत नाही. त्यामुळे मोर नेहमी झाडावर किंवा जमिनीवर आढळतात. मोर ला प्राचीन काळापासूनच खूप महत्त्वाचे स्थान आहे कारण मोर माता सरस्वती चे आणि कार्तिक देवाचे वाहन आहे .

तसचं मोराच पिस हे भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावरती पहायला मिळते. त्यामुळे काहीजण मोराची देव समजून पूजा सुद्धा करतात. मोराचे सुंदर रूप आणि रंग पाहून मोराला पैठणी या मराठी महावस्त्रावर स्थान देण्यात आले आहे. प्राचीन काळात सुद्धा मोराची काही छायाचित्रे आढळली आहेत.

या सर्व कारणांमुळे मोराला भारत देशाचा ” राष्ट्रीय पक्षी ” म्हणून मान मिळाला आहे.

तसेच सम्राट अशोक यांच्या नानांवर मोरा चे छायाचित्र आढळले. पूर्वीचे राजा महाराजे यांच्या राजवाड्यात मोर पाहायला मिळत. पूर्वीचे राजे हे मोराचे छायाचित्रास असलेल्या सिंहासनावर बसत.

आजच्या काळातील सिनेमांमध्ये मोर वरती  काही गाणे काढण्यात आलेली आहेत. मोराला नेहमीच बहुरंगी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृती मध्ये मोराला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

मोराचे मोरपीस हे सर्वांनाच आवडते. त्यामुळे मोरा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता पक्षी आहे. चित्रकारांचे पहिले चित्र हे मोराचे च असते. कारण मोराचे रूप पाहून सगळेजण मोहित  होतात.

अशाप्रकारे सर्व दृष्टीने सुंदर असणारा हा मोर माझा आवडता पक्षी आहे. परंतु अलीकडे होणाऱ्या मोराचा शिकारी मुळे मोरांची संख्या कमी होत आहे. आदिवासी लोक मोरांची शिकार करून त्यांचे मांस खातात. तसंच आणि कडे वाढते प्रदूषण आणि वृक्षतोड यामुळे मोराच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आलेत.

मोर नेहमी झाडावरच राहतो मग झाडांची संख्या कमी झाल्यानंतर मोराने राहायचे कुठे?

मोर हा  सगळ्या पक्षांची शान आणि आपल्या देशाचे सुद्धा शान आहे. त्यामुळे मोराच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सामान्यता सर्वांनाच मोर हा पक्षी आवडतो.करण मोराचे रूप हे सर्वांनाच आकर्षित करते.

त्यामुळे माझा आवडता पक्षी मोर आहे.

तर मित्रांनो! ” माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध । My Favourite Bird Peacock Eaasy in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्वांनी जाणे आवश्यक शेअर करा.

 ” माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध । My Favourite Bird Peacock Eaasy in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असेल तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment