पोलीस मराठी निबंध | Police Maza Abhiman Nibandh in Marathi

पोलीस मराठी निबंध | Police Maza Abhiman Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले… या वेबसाईटवर स्वागत आहे .या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” पोलीस मराठी निबंध । Police Maza Abhiman Nibandh in Marathi “ घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

पोलीस मराठी निबंध | Police Maza Abhiman Nibandh in Marathi

पुलिस आपला देशाचा एक कर्मचारी आहे जो मनाने आणि देशभक्ती मनात ठेवून आपल्या देशाची सेवा करीत असतो . आज पोलिस आपल्या देशाची सेवा करतात म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहतो.

म्हणून आपल्या जीवनात पोलिसांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. देशाची आणि समाजाची सुरक्षा आणि देशाच्या शांततेसाठी पोलिसांची सेवा खूप आवश्यक आहे.

पोलीस म्हणजे काय?

” पोलिस हा सरकारचा एक कर्मचारी असतो. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे तसेच मालमत्तेची रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर सोपवलेली असते. ” जसे सैनिक सीमेवर राहून विदेशी शत्रूपासून आपल्या देशाचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे पोलिस राष्ट्रातील सर्व अडचणी सोडवण्यात आपली मदत करतात.

देशात कुठेही भांडण-तंटा झाला तर पोलीस तत्पर उभे राहतात. पोलिस 24 तास आपल्या देशाची सेवा करण्यात मग्न असतात. त्यामुळे पोलीस आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे.माला माझ्या देशातील पोलिसांवर अभिमान आहे.

पोलिसांचे कार्य:

पोलिस मानो भावाने आपल्या देशाची सेवा करतात, देशातील सर्व अडचणी सोडवण्यात पोलीस सक्षम असतात. पुलिस रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित ठेवतात. पोलिसांच्या एका संकेता वरून रस्यावरून जाणारे सर्व वाहने थांबतात, जर कुटल्या वाहना मध्ये अनैतिक किव्हा गैरकणूनी मालमत्ता मिळाली तर त्यावर योग्य त्यो निर्णय घेतात.

पोलिसांच्या योग्य व्यवस्थापनामुळे सर्वजण व्यवस्थित आणि सुरक्षित रस्ता ओलांडू शकतात आणि अपघातातून वाचतात. पोलीस नसते तर मोठ्या शहरांमध्य दिवसभरात कित्येक अपघात झालेल्या दुर्घटना ऐकायला आल्या असत्या.

वाहतुकीचे नियंत्रण पोलिसांमार्फत योग्य ते होतेच, त्यासोबतच लोकांच्या जीवनाचे आणि संपत्तीचे संरक्षण पोलीस करतात. आज-काल चोर, दरोडेखोर , व्यसन करणारे आणि जुगारी यांसारख्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशा लोकांन पासून समाज संकटाना सुटका देण्याचे काम पोलीस करतात. देशाच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिस पकडतात.

प्रत्येक देशाचे कायदेकानून ठरलेले असतात. सामान्य नागरिकांनी त्यांचे पालन करावे अशी सरकारची अपेक्षा असते. त्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक कायदे पालन करीत असतातही. परंतु समाजात असेही काही वाईट लोक असतात जे कायदे तोडून गुन्हे करतात.

हे समाजकंटक चोरीमारी, खून, अमली पदार्थांची तस्करी, लहान मुलांचे आणि मुलींचे अपहरण, खंडणी उकळणे, जुगार, गावठी दारू इत्यादी गैरउद्योगात गुंतलेले असतात. अशा उद्योगांपासून त्यांना रोखणे आणि सामान्य नागरिकांना त्यांचे जीवन सुरळीतपणे जगता यावे म्हणून मदत करणे हे पोलिसांचे मुख्य कार्य असते.

जर देशाचे रक्षण करण्यासाठी हे पोलीस नसते तर सर्वत्र चोरांचे साम्राज्य पसरले असते. पोलिसांच्या गैरहजरी मुळे दरोडेखोर रोज बँका ,घर, दुकाने दिवस रात्र लुटत राहिले असते. पोलिसांच्या एवढा कडक बंदोबस्त असून सुद्धा आपल्या येथे अनेक दरोडेखोरी च्या घटना घडताना दिसतात. परंतु अशा प्रत्येक परिस्थितीला पोलिस तत्पर तेने तोंड देण्यास उभे असतात.

देशात असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांचे काम खूप कठीण असते. समाजामध्ये कानून आणि व्यवस्था कायम ठेवणे, समाजातील सर्व नागरिकांची रक्षा करणे अशी अनेक कार्य पोलिस करत असतात.

शांतता व आनंदाचा अभाव:

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक आनंदाचे आणि उत्साहाचे मोठं मोठे मोठे उत्सव होत असतात. अशा या उत्सवाच्या वेळी जातिभेद ,धर्मभेद त्यामुळे अनेक भांडणे ,तंटे होताना दिसतात. त्यामुळे विशेषतः अशा मोठ्या उत्सवाच्या, मिरवणुकीच्या, मेळाव्याचा वेळेस पोलिसांचे आवश्यकता व सेवा खूप गरजेचे ठरते.

अपघाताचे परिस्थिती सुद्धा पोलीस लोकांना खूप मदत करतात. भांडण लहान असो वा मोठे या ठिकाणी पोलिसांची आवश्यकता असते प्रत्येक प्रकारचे भांडणे पोलिस सोडतात.

पोलिसांच्या अशा सेवा मुळे आपले जीवन अधिक शांत आणि सुरक्षित होते. पोलीस नसते तर समाजाला क्षणभर ही सुरक्षेची भावना आली नसती. पोलिसांच्या भीतीमुळे आज-काल चोर चोरी करण्यासाठी घाबरु लागले आहेत.

व पोलिसांच्या कडक नियमांमुळे चोरीचे प्रमाण कमी झाले आहे. पोलिसांमुळे असुरक्षिततेची भावना नष्ट होऊन सर्वजण मनसोक्तपणे वावरू लागले आहेत. पोलिसांमुळे सर्व वातावरण शांत आणि आनंदी झाले आहे.

पोलीस माझा अभिमान:

” पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे. ” त्यांच्यामुळे देशातील सर्व संपत्ती आणि जनता सुरक्षित आहे. कितीही कठीण परिस्थितीमध्ये पोलीसा धैर्याने सामोरे जातात. आज याच पोलिस मुळे आपल्य देशावर दहशतवादी हल्ला करण्या साठी घाबरत आहेत.

देशातील पोलिसांना अनेक मोठे मोठे पराक्रम केले त्यामुळे देशातील सर्व जनतेला पोलिसांवर खूप विश्वास आहे. त्यामुळे माझ्या देशातील ” पोलिस हा माझा अभिमान आहे. ”

पोलीस पद:

पोलीस महासंचालक

पोलीस आयुक्त

विशेष पोलीस महासंचालक

पोलीस आयुक्त

अतिरिक्त पोलीस महासंचालक

विशेष पोलीस आयुक्त

पोलीस महानिरीक्षक

सह पोलीस आयुक्त

पोलीस उपमहानिरीक्षक

अतिरिक्त पोलीस आयुक्त

वरिष्ठ पोलीस अधीक्षक

पोलीस उपायुक्त

पोलीस अधीक्षक

तर मित्रांनो ! ” पोलीस मराठी निबंध । Police Maza Abhiman Nibandh in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” पोलीस मराठी निबंध । Police Maza Abhiman Nibandh in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही points राहाले असेल तर , कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment