मी वैज्ञानिक झालो तर मराठी निबंध । If I Were A Scientist Essay In Marathi

मी वैज्ञानिक झालो तर मराठी निबंध । If I Were A Scientist Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” मी वैज्ञानिक झालो तर ” या विषयावर मराठी निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी वैज्ञानिक झालो तर मराठी निबंध । If I Were A Scientist Essay In Marathi

आजचे जग हे विज्ञानाचे युग आहे आजच्या आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचे खूप मोठे वर्चस्व आहे.

जेव्हा मी आजूबाजूला असणाऱ्या विज्ञानाच्या नव- नवीन गोष्टींना बघतो तेव्हा मला ही वाटते की, मी सुद्धा एक वैज्ञानिक झालो तर देशाला अजून नव- नवीन विज्ञानातील प्रयोगांचा उपयोग करून देईन.

तथापि, मी वैज्ञानिक झालो तर माझ्याजवळ असलेल्या विज्ञानाच्या ज्ञानाच्या जोरावर मी अनेक शोध लावले असते माझ्या ज्ञानाचा उपयोग हा फक्त शांततापूर्ण हेतूंसाठी केला जाईल.

आज विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे त्यामुळे आपले आयुष्य अधिकच विस्मयकारक, आरामदायक आणि आधुनिक बनले आहे.

परंतु या विज्ञानाचा काहीजण गैरवापर करून विनाशकारी आणि घातक कामे करत आहे. आणि ह्याच गोष्टींचा मला खूप दुःख वाटते की शास्त्रज्ञ आतोनात मेहनत करून नवीन शोध लावतात आणि सर्व साधारण मनुष्य त्याचा गैरवापर करतात.

जर मी एक वैज्ञानिक झालो तर जगाचा नाश करणाऱ्या शोधांऐवजी मनुष्याच्या हितासाठी योग्य असणाऱ्या गोष्टींचा शोध लावून आपल्या देशाचे नाव उंचावेल.

मी वैज्ञानिक झाल्यावर माझी स्वतःची एक प्रयोगशाळा काढेल आणि माझ्या या प्रयोगशाळेत आपल्या देशाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींवर मी संशोधन करेन.

आज इतर देशांच्या तुलनेत आपला देश आजूनही बऱ्याच गोष्टींमध्ये मागे आहे. म्हणून मी आपल्या देशासाठी आवश्यक असलेल्या स्वस्त आणि प्रभावी मशीन, औषधे, शेतीसाठी नवीन साधने इत्यादींची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन.

जर मी वैज्ञानिक झालो तर, माझा प्रयत्न असेल की देशातील सर्व गोष्टी देशातच तयार केल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्या देशातील पैसा हा आपल्याच देशात राहील व महागाई कमी होण्यास मदत होईल. व देशातील प्रत्येक नागरिक त्यांचा सहजपणे लाभ होऊ शकेल.

जर मी शास्त्रज्ञ झालो तर, एक शास्त्रज्ञ म्हणून मी समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी कसे तयार करावे याकडे लक्ष देईन. तसेच समुद्राच्या पाण्यापासून वीज कशी तयार करावी हे जाणून घेऊन त्यावर वेगवेगळे प्रयोग करेन.

आज आपल्या देशाला विविध आजार, महामारी यांनी ग्रासले आहे. त्यामुळे रोज जगभरात लाखो लोक मरत आहेत. एड्स सारख्या जीवघेण्या आजारांवर आजही उपचार उपलब्ध नाहीत.

जर मी वैज्ञानिक झालो तर या धोकादायक आजारांवर उपचार शोधण्या करिता प्रयत्न करेन. आजही आपल्या देशातील सर्व- सामान्यांना विज्ञान म्हणजे काय आणि विज्ञानाची समज नाही. म्हणून सर्वांना विज्ञानाची रुची वाढावी यासाठी आठवड्यातून एकदा तरी प्रदर्शन भरवेल. विज्ञानाच्या नव- नवीन प्रयोगांवर चर्चा करेन आणि बैठक आयोजित करेन.

मी विज्ञानाच्या अभ्यासाला प्रोत्साहित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी वैज्ञानिक झाल्याने विज्ञानाचा लोकांना वापरण्यासाठी व भरघोस यश मिळवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण वैज्ञानिक सूत्रांचा शोध घेईन.

अशा प्रकारे मी एक शास्त्रज्ञ म्हणून विज्ञानाच्या वाढीस लागणाऱ्या सर्व वस्तूंवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीन जे प्रभाव एकतर परिणामकारक असेलच आणि विध्वंसक नसतील.

जर माझ्या पंखांनी मला विज्ञानातील नव- नवीन शोधात सक्षम होण्यासाठी माझी मदत केली तर मला खात्री आहे की, मी एके दिवशी नक्कीच वैज्ञानिक होऊन आपल्या देशाचे नाव उंच करेन.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment