पाण्याचे आत्मकथन मराठी निबंध । Panyachi Atmakatha in Marathi

पाण्याचे आत्मकथन मराठी निबंध । Panyachi Atmakatha in Marathi

नमस्कार मित्रांनो ! मराठी मित्र आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” पाण्याचे आत्मकथन मराठी निबंध | Panyache Atmkathan Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

पाण्याचे आत्मकथन मराठी निबंध । Panyachi Atmakatha in Marathi

मित्रांनो! मी पाणी आहे. या सजीव सृष्टी व अधिक जीव जंतू आणि मनुष्य माझ्यामुळेच स्वतःची तहान भागवत आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांसाठी काही वेळ पाणी नाही मिळालं तर या पृथ्वी वरील प्रत्येक सजीव ताहने मुळे मरेल.

खूप आनंद वाटतो की, मी पृथ्वीवरील सजीवांच्या काही तरी कामासाठी उपयोगी पडतो. माझ्यामुळे संपूर्ण सृष्टी सुंदर आणि निसर्गरम्य बनली आहे. त्यामुळे मला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. माझ्या पाण्याचा प्रत्येक थेंब सर्वांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

मी आकाशातील ढगांच्या द्वारे जमिनीवर पडतो माझे पाणी नदी, नाले यांच्यामध्ये मिसळले जाते. तर काही पाणी जमिनीमध्ये मुरले जाते. जमिनीच्या आत मध्ये गेल्यानंतर माझे पाणी पिण्यायोग्य होते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माझी खूप अडचण होते. काही लोक मला मिळवण्यासाठी लांब-लांब रांगे मध्ये उभे राहतात. तर काही लोक माझ्यासाठी कित्येक किलोमीटर चालत जाऊन पाणी भरतात. काही लोक तर कित्येक पैसे खर्च करून मला मिळवितात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चार बाजूला माझ्यासाठी समस्याचे डोंगर पसरलेले असते. पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे काही लोक तर देवाला दोषी ठरवतात.

खरं तर मनुष्याने संपूर्ण वातावरणाला दूषित ठेवले आहे. त्यामुळे पर्यावरण चक्र संपूर्ण विस्कळीत झाले आहे आणि त्याचा परिणाम माझ्यावर होत आहे. आज आम्ही पाणी पावसाचा मार्फत काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पडतो, तर काही भागांमध्ये पडततच नाही. गावे शहरे पाण्यामध्ये वाहून जातात तर काही भागांतील लोक एक थेंब पाणी पाहण्यासाठी मरतात.

पृथ्वीवर माझ्या प्रमाण जास्त असते त्यावेळी संपूर्ण मनुष्यवस्ती माझ्या बाबतीमध्ये निष्काळजी वागतात कसा ही प्रकारे पाण्याचा वापर करतात‌. त्यामुळे मी मनुष्याकडे विनंती करत असतो की माझा सद वापर करा. मला व्यर्थ वाहु देऊ नका. चांगल्या ठिकाणी माझी साठवणूक करा.

जेवढे पाणी गरजेचे आहे तेवढाच पाण्याचा वापर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करा जेणेकरून भविष्यामध्ये पाण्याच्या बाबतीत काही अडचण आली तर तुम्ही माझा योग्य वापर करू शकता. आपल्यातील काही जण असे आहेत ज्यांना पाण्याचे जरा ही महत्व माहिती नाही असे लोक विनाकारण माझा दुरुपयोग करतात. असे लोक मला व्यर्थ वाहू देतात.

परंतु आपल्या पृथ्वीवरील अशा लोकांना पाण्याचे महत्व समजणे खूप गरजेचे आहे. पाण्याचा एक-एक थेंबा ची किंमत ही अनमोल आहे हे कळणे गरजेचे आहे.

आजची परिस्थिती आपल्याला माहितीच आहे शहरी भागांमध्ये पाणी म्हणजे आम्हाला विकत घेतले जात आहे. पण ही गोष्ट विचार करणारी आहे की पाण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच गेल्या तर एक दिवशी पृथ्वीवरील संपूर्ण पाणी संपेल अशा परिस्थितीमध्ये आपण आपली तहान भागवायची कशी? यासाठी सर्वांनी आत्तापासूनच सावध राहणे गरजेचे आहे.

परंतु आपल्या पृथ्वी वरील काही लोक एवढे चांगले आहेत की माझा वापर ते अतिशय काटकसरीने करतात जसे की, पावसाच्या रूपाने जमिनीवर पडत असून त्या वेळी मला एखाद्या भांड्यामध्ये साठवून त्याचा घरातील कामासाठी उपयोग करतात.

मी पाणी संपूर्ण सजीवांचे जीवन आहे. लोक सकाळ सकाळी एखाद्या भांड्यामध्ये मला साठवून ठेवतात आणि दिवसभर त्या पाण्याने स्वतःची तहान भागवतात. फक्त मनुष्याचे नसून सर्व प्राणी, पक्षी आणि इतर सजीव सुद्धा माझ्या आजपासून स्वतःची तहान भागवतात आणि जीवन जगतात. परंतु काही पशुपक्षी है माझ्याशिवाय मृत्युमुखी पडतात.

शेवटी मी तुम्हा सर्वांना एवढच म्हणणार आहे की, माझे महत्त्व समजून घ्या, मला विनाकारण वाहते सोडू नका कारण मी तुमच्या जीवनाची रक्षा करतो.  मी खूप‌ अनमोल आहे त्यामुळे काही लोक मला जलदेवता देखील म्हणतात. मी खूप महाड नदी आणि तलावांमध्ये  उपलब्ध असतो. मी तुमच्यासाठी  महत्व  पूर्ण आहे. त्यामुळे माझा सदुपयोग  तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

तर मित्रांनो ! पाण्याचे आत्मकथन मराठी निबंध । Panyachi Atmakatha in Marathi वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.

पाण्याचे आत्मकथन मराठी निबंध । Panyachi Atmakatha in Marathi यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

3 thoughts on “पाण्याचे आत्मकथन मराठी निबंध । Panyachi Atmakatha in Marathi”

Leave a Comment