माझा आवडता लेखक साने गुरुजी मराठी निबंध । Maza Avadta Lekhak Sane Guruji in Marathi
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.
आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता लेखक साने गुरुजी मराठी निबंध | Maza Avadta Lekhak Sane Guruji in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.
आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
माझा आवडता लेखक साने गुरुजी मराठी निबंध । Maza Avadta Lekhak Sane Guruji in Marathi
आपल्या देशामध्ये अनेक महान लेखक होऊन गेले. त्यातील एक लेखक म्हणजे साने गुरुजी. हे माझे आवडते लेखक आहेत. कारण सानेगुरुजींचे “श्यामची आई” हे पुस्तक मला खूप आवडते.
साने गुरुजी हे एक लेखक होते त्या सोबतच महान देशभक्त सुद्धा होते. साने गुरुजीनी मनापासून आपल्या भारत देशावर प्रेम केले.
साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव”पांडुरंग सदाशिव साने” असे होते.
साने गुरुजी एक प्रसिद्ध आणि प्रख्यात असे मराठी लेखक होते. त्यांनी लिहिलेले “श्यामची आई” हे सर्वात मोठी कथा चरित्रात्मक केली आहे. साने गुरुजी हे एक तत्वज्ञानाचा विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा प्रेमि, शक्तिशाली व्यक्ता आणि कविता आणी कथांचा याचे रचनाकार होते.
कोणतेही कवी किंवा लेखक हे बनवले जात नाहीत तर त्यांच्यामध्ये कवी आणि लेखकांचे गुनण पहिल्यापासूनच रुजलेली असतात. फक्त गरज असते ते म्हणजे त्या गुणांना ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची. साने गुरुजींच्या बाबतीतही असेच घडले.
साने गुरुजींचे वडील सदाशिव हे महाराष्ट्रातील कोकण भागातील पालघर या गावी राहत होते. सानेगुरुजींचे वडील गावाचा महसूल जिल्हाधिकारी म्हणून काम करीत असे. त्यामुळे सानेगुरुजींचे कुटुंब श्रीमंत होते. साने गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते.
लहानपणापासूनच साने गुरुजींवर त्यांच्या आईचे अपार प्रेम होते. साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकांमध्ये त्यांनी त्यांच्या आई बद्दल असलेल्या प्रेमाचा कथा सांगितल्या आहेत.
साने गुरुजींच्या आईने त्यांच्यावर मनात संस्कार केल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व घडण्यास मदत झाली. त्यांच्या आईने दिलेला संस्कारांमुळेच कदाचित सानेगुरुजी घडले असावेत. गुरुजींच्या आई त्यांना नेहमी शिकवत असे कि, “सर्वांनी नेहमीच सर्वांवर प्रेम केले पाहिजे.”
साने गुरुजींचे मन खूप भाविक आणि संवेदनशील होते. साने गुरूजी हे उत्कृष्ट लेखकही होते त्यासोबत परम देशभक्त सुद्धा होते. भारतीय स्वातंत्र्य युद्धात त्यांनी स्वतंत्र सेनानी म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली. व या सध्याचे आंदोलना मध्ये सुद्धा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
साने गुरुजींच्या राजनितिक कार्यामुळे त्यांना कारागृहात काढावे लागले. नाशिकच्या कारागृहात त्यांनी आपली श्यामची आई ही कादंबरी लिहिली. चार दिवसांमध्ये साने गुरुजींची श्यामची आई कादंबरी लिहिली. वाचलेल्या पुस्तकांपैकी हे माझे आवडते पुस्तक आहे आणि या पुस्तकांमुळे मला साने गुरुजी लेखक खूप आवडतात.
त्यानंतर साने गुरुजी जेव्हा धुळ्याच्या कारागृहात असताना गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेला “गीताई” हा ग्रंथ लिहिला. साने गुरुजींनी आपल्या जीवन काळामध्ये जवळपास 73 पुस्तके लिहिली साने गुरुजींना निसर्गावर खूप प्रेम होते त्यांच्या पुस्तकातून त्यांच्या निसर्गप्रेमी सुद्धा दिसून येते. या शिवाय साने गुरुजींनी मराठी भाषेमध्ये विपुल असे लेखन केलेले आहे.
अमोल गोष्टी, आपण सारे भाऊ, आस्तिक, इस्लामी संस्कृती, कर्तव्याची हाक कला आणि इतर निबंध, कला म्हणजे काय?, कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य, गुरुजींच्या गोष्टी (भाग 1 ते भाग 10) एखादी प्रसिद्ध विशेषता लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असलेली पुस्तके सानेगुरुजी लीहली.
महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक साने गुरुजींच्या आदर्श होते. अवघ्या 50 व्या वर्षी महात्मा गांधीजीच्या हत्येमुळे अस्वस्थ झाले ते साने गुरुजींनी निराश अवस्थेमध्ये अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या गोळ्या खाऊन आपले जीवन संपवले. परंतु आज मृत्यूचा सत्तर वर्षांनी सुद्धा साने गुरुजी आपल्या मध्ये जिवंत आहेत ते म्हणजे त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून.
असे हे महान देशभक्त आणि लेखक म्हणजे साने गुरुजी होय. म्हणून माझे आवडते लेखक साने गुरुजी आहे.
तर मित्रांनो ! ” माझा आवडता लेखक साने गुरुजी मराठी निबंध | Maza Avadta Lekhak Sane Guruji in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
” माझा आवडता लेखक साने गुरुजी मराठी निबंध | Maza Avadta Lekhak Sane Guruji in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- माझा आवडता विषय इतिहास मराठी निबंध
- पाण्याचे उद्दिष्टे मराठी निबंध
- स्वतःवर मराठी निबंध । Essay On Myself in Marathi
- आई संपावर गेली तर निबंध
- पाण्याचे आत्मकथन मराठी निबंध
धन्यवाद मित्रांनो !
Nice👍👍😊