{ निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi

{ निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” { निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

{ निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi

प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मी पुढच्या शिक्षणासाठी शहरांमध्ये गेलो. शहरा मध्येच शिकून मला तेथेच नोकरी मिळाली. पाच वर्षे झाले मी शहरांमध्येच स्थिर आहे. परंतु लवकरच मला सुट्टी मिळणार आहे. तेव्हा मला एकच गोष्टीचे ओढ लागली आहे ती म्हणजे माझ्या गावाला जाण्याची.

माझ्या गावाचे नाव ” नरसिंगपूर “ असे आहे. अगदी डोंगर माता च्या पायथ्याशी वसलेले माझे गाव निसर्गाने परिपूर्ण असे आहे. आजी आजोबांच्या कहाणी नुसार असे कळून येते की, माझा गाव हा गेल्या एक शतकापासून  या ठिकाणी स्थित आहे.

गावाला नरसिंगपूर हे नाव देण्यामागचे इतिहास म्हणजे गावामध्ये खूप पूर्वीच्या काळामध्ये केवळ एकमेव असे नरसिंह स्वामी चे मंदिर होते. त्यामुळे गावाला नरसिंगपूर असे नाव देण्यात आले परंतु हे मंदिर आज नामशेष झालेले आहे.

माझ्या गावातील डोंगर-दर्‍या, नदी-नाले, झाडेझुडपे या नेसर्गिक अलंकारा मुळे माझे गाव एकदम खुलून दिसते. अशा या गावांमध्ये मागे छोटेसे घर आहे माझ्या घरांमध्ये माझ्या आई-बाबांसोबत माझे आजी आजोबा राहतात.

गाव जरी शहरापेक्षा आकारमानाने लहान असले तरी माझ्या गावामध्ये आपुलकीची माणसे राहतात. हे एकमेकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी कुठलाही विचार न करता पुढे येतात..

माझ्या गावा बद्दल सांगायचं म्हणजे माझ्या गावाचे लोकसंख्याही 5000 एवढी आहे. डोंगर पायथ्याशी वसलेले माझे गाव निसर्गरम्य  आहेच सोबत माझ्या गावातून  एक नदी वाहते त्यामुळे गावाला आणखीनच जास्त सौंदर्य प्राप्त झालेले आहे.

शहरी भागातील लोकांना गाव म्हणजे एक समस्या ने भरलेले वाटते परंतु माझ्या गाव इतर गावं पेक्षा पूर्णता वेगळे आहे. माझ्या गावातील सरपंच गावाचा विकास देण्या कडे विशेष भर देतात. त्यामुळे या गावांमध्ये सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांमुळे माझे गाव हे एक शहराचा भागच आहे असे वाटते.

माझ्या गावातील लोक हे एकमेकांसोबत कुटुंबाप्रमाणेच राहतात.  कोणालाही कुठल्याही प्रकारची गरज भासल्यास एकमेकांची मदत करण्यासाठी तत्पर उभे असतात.

गावामध्ये घरो घरी पाण्याची सोय केलेली आहे, तसेच इंटरनेटची, 24 तास विजेची सेवा असते, गावातील रस्तेसुद्धा नवीन बांधलेले आहेत. तसेच गावामध्ये अंगणवाडी पासून दहावीपर्यंतचे शिक्षण आहेत परंतु आता बारावीपर्यंतचे सर्व शाखांचे शिक्षण सुविधा  उपलब्ध करून देण्याकडे भर दिला जात आहे.

तसेच गावामध्ये स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा पाणी जिरवा, झाडे लावा  जीवन वाचवा, मुली वाचवा मुली शिकवा या प्रकारचे  उपक्रम राबवून गावातील लोकांमध्ये जनजागृती केली जाते.

गावापासून तालुक्याचे शहर ते सुमारे 30 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे गावातील प्रौढ व्यक्तींनी गावामध्ये चे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे. त्यामुळे गावातील लोकांना ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार झाल्यास गावांमध्ये त्याची तपासणी केली जाते.

तसेच माझ्या गावांमध्ये लहान-मोठी दुकाने असून एक मोठे किराणा मालाचे दुकान आहे. हे दुकान आमच्यात पाहूण्यातील रामुकाकांचे आहे. या दुकानात ‌आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मिळतात.

तसेच गावामध्ये कपड्याचे दुकान, फळांची दुकान,  केक चे दुकान, मिठाई दुकान, आईस्क्रीम,दूध, दही ,लस्सी यांची दुकाने सुद्धा आहेत.

त्यामुळे कुठलीही वस्तू पाहिजे असले तरी गावामध्ये सर्व सुविधा उपलब्ध होतात. तसेच बुधवार हा माझ्या गावाचा सार्वजनिक बाजाराचा दिवस आहे, यादिवशी गावाच्या मधोमध बाजार भरला जातो या बाजारामध्ये सर्व प्रकारच्या भाजीपाला, फळभाज्या विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात.

तसेच गावामध्ये एक मारुतीचे,तुकाई देवीचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर आहे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये माहाशिवरात्रीला  महादेवाच्या मंदिरासमोर जत्रेचे आयोजन केले जाते. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुकाई देवीची यात्रा भरते. या यात्रेच्या वेळी गावातील स्थलांतर झालेले लोक हमखास गावांमध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

याबरोबरच गावाचा आणखी आणि विकास व्हावा या उद्देशाने गावातील सरपंच आणि इतर व्यक्ती दर महिन्याला ग्रामविकास बैठक  आयोजित करतात. या बैठकीमध्ये गावातील प्रत्येक कुटुंबात एक तरी व्यक्ती हजर व्हावा अशी अट आहे त्यामुळे गावातील सर्व व्यक्ती या बैठकीमध्ये हमखास उपस्थित असतात.

माझे गाव या अतिशय कष्टाळू आहे. माझ्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे व शेतीला पूरक असा जोड व्यवसाय म्हणून कोणी दुग्ध व्यवसाय, कोणी मत्स्य व्यवसाय, तर कोणी पशुपालनाचे व्यवसाय करतात. माझे गाव हे द्राक्ष उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. तसेच माझ्या गावातून ज्वारी मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. यासोबतच मका, तूर, भुईमूग, मूग यांसारखी पिके सुद्धा घेतली जातात.

रोज संध्याकाळच्या वेळी गावातील मंदिरांमध्ये भजन-कीर्तन यांसारखे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यामुळे वृद्ध महिला व पुरुष या कीर्तनाचा आणि भजनाचा आनंद लुटत असतात.

गावामध्ये प्रत्येक सण, उत्सव, जयंती सर्वजण मिळून साजरे करतात. माझ्या गावातील लोकांमध्ये जातिभेद,उच्चनीचता, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान दृष्टीने बघतात. त्यामुळे गावामध्ये सर्व जाती धर्माचे सण आणि उत्सव एकत्रित मिळून साजरे केले जातात.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा गांधी जयंती,शिवजयंती, गणपती उत्सव,  महाशिवरात्री, नवरात्री यांसारखे सण उत्सव सार्वजनिक मंडळामार्फत साजरे केले जातात.

गावाच्या शेजारी असलेला डोंगर माता हा पावसाळ्यामध्ये खूपच आकर्षक दिसतो. या डोंगरावरून वाहणारे धबधबे, रंगीबिरंगी फुले जणू पाचूचे  वैभव धारण करून मिरवतात असे दिसते. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या डोंगरांमध्ये मोर, माकड, विविध पक्षी पाहायला मिळतात.

पावसाळ्यामध्ये माझा दावा खूपच सुंदर दिसतो. माझ्या गावाचे पावसाळ्यातील सौंदर्य पाहण्यासाठी जवळच्या शहरातील अनेक पर्यटक‌ येतात.

येथे आलेल्या पर्यटकांना राहण्यासाठी माझ्या गावाने एक धर्मशाळा बांधलेली आहे जिथे राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने निसर्ग पाहण्यासाठी शहरी भागातील लोक माझ्या गावाला भेट देण्यासाठी येतात.

माझ्या गावाचा एवढा विकास पाहून गेल्यावर्षी माझ्या गावाला जिल्हास्तरीय आहे “आदर्श गावाचा” पुरस्कार मिळाला आहे.

गाव म्हणजे सर्वांना विविध समस्या, भांडणतंटे, जीवनावश्यक वस्तू न मिळणारे ठिकाण असे वाटते. परंतु माझा गाव हा यापेक्षा पूर्णतः वेगळा आहे. माझ्या गावातील एकोपा चे वातावरण आणि मनाला शांत करणारा निसर्ग पाहून कायम गावामध्येच राहावेसे वाटते.

गावामध्ये मी आणि माझे सर्व मित्र लहानपणी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदीकाठावर जाऊन मासे पकडायचो.  तसेच उन्हाळ्यामध्ये याच नदीमध्ये दुपारच्या वेळी आम्ही पोहात‌ होतो.

माझ्या गावामध्ये आजा लहानपणीच्या सर्व आठवणी आहेत. याच गावांमधून मला चांगल्या वाईट गोष्टीचे मार्गदर्शन मिळाले. थोडक्यात जीवन जगण्यासाठी आणि एक चांगले व्यक्तिमत्व घेऊन  समाजामध्ये वावरण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण मला माझा गावातूनच प्राप्त झाले आहे. कदाचित गावाने दिलेल्या संस्कारा मधूनच मी आज माझ्या जीवनामध्ये यशस्वी झालो आहे.

त्यामुळे माझ्या जीवनामध्ये मी माझ्या गावाला कधीही विसरणार नाही. माझ्या गाव हे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे आणि तो राहणार. त्यामुळे मला माझा गाव खूप खूप, खूप जास्त आवडतो.

तर मित्रांनो ! ” { निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” { निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment