माझी बहिण वर मराठी निबंध । My Sister Essay in Marathi

माझी बहिण वर मराठी निबंध । My Sister Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  ” माझी बहिण वर मराठी निबंध । My Sister Essay in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझी बहिण वर मराठी निबंध । My Sister Essay in Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अशी व्यक्ती असते जिला आपण आपली सर्व सुख, दुःख सांगत असतो. त्या प्रमाणेच माझ्या आयुष्यातील असे व्यक्ती म्हणजे ” माझी बहीण “. माझी बहिणी माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी असून मी तिला ताई असे म्हणते. माझी ताई ही माझ्या आईचे दुसरे रूप आहे. माझ्या जीवनातील माझ्या आई इतके महत्त्वाचे दुसरे कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे माझी बहीण आहे. माझ्या बहिणीचे नाव ” सरस्वती “ असे आहे. खरेच!  माझी ताई हे सरस्वतीचे स्वरूप आहे.

ताई आणि मी सख्ख्या बहिणीच परंतु माझ्या मध्ये आणि ताई मध्ये इतका फरक आहे की कोणाला वाटणार नाही की, मी आणि ताई या सख्ख्या बहिणी आहोत. कारण आम्हा दोघांन मध्ये बोलणे चालणे आणि राहणा मध्ये खूप फरक आहे.

माझी ताई हे खूपच साधी आणि अबोल आहे. माझ्या ताईचे अबोल राहण यामागचे कारण विचारले असता ताई म्हणते की, ” मला स्वतः बोलत राहण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकायला फार आवडते.” कदाचित त्यामुळेच माझी ताई कमी बोलत असावी. याउलट मी खूप बडबडी आहे.

माझी बहीण म्हणजे माझी ताई आणि ताई माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी सर्व काही आई बाबांन सांगता ताईंना सांगत असते. कारण माझी ताई खूप समजूतदार आहे मी कुठे चुकले असेल तर ते मला लगेच रागवते व ती चूक दुरुस्त करण्यासाठी प्रोत्साहित करते.

माझी ताई स्वभावाने प्रेमळ, शांत, दयाळू आणि मनमिळाऊ आहे. ताई कमी बोलत असली तरी ती जेवढे बोलते तेवढ्या मध्ये समोरच्या व्यक्तीचे मन जिंकते. मी माझ्या ताई पेक्षा चार वर्षांनी लहान असल्यामुळे लहानपणापासूनच मी ताईंच्या सहवासात राहिले आहे. ताई माझा खुप लाड पुरवते. त्यामुळे मी मला एखादी हवी असणारी गोष्ट आई बाबांना न मागता माझ्या ताईंकडे मागते.

ताई मला ती वस्तू लगेच घेऊन देते. माझ्या ताईचे शिक्षण बीए ग्रॅज्युएशन झाले आहे. माझी ताई एक शिक्षिका म्हणून काम सुद्धा करीत आहे‌.

माझ्या सर्व कुटुंबाची जबाबदारी आणि काळजी घेणे माझ्या ताईचे प्राथमिक कार्य आहे. माझी ताई सकाळी पहाटे उठते, व्यायाम वगैरे करून, आंघोळ करून देवाला नमस्कार करते.

स्वयंपाक घरामध्ये माझ्या आईला मदत करून, माझ्या शाळेला जाण्याची सर्व तयारी करून मला तयार करते, माझी वेणी घालते, डब्बा बांधते, बॉटल भरते व मला शाळेत नेऊन सोडून पुन्हा तिच्या कामासाठी जाते. हा माझ्या ताईचा रोजचा ठरलेला दिनक्रम आहे.

मी शाळेतून घरी परत येण्याअगोदर माझे ताई घरी आलेली असते. मी शाळेतून घरी आल्यानंतर  माझी ताई माझ्याकडून अभ्यास करून घेते. इंग्रजीचे शब्दार्थ पाठ करून घेणे, गणितातील अवघड गणिते, विज्ञानातील अवघड सूत्रे सामाजिक शास्त्रातील विविध माहिती ताई मला समजावून सांगते.

त्यानंतर माझ्या आईला स्वयंपाक घरामध्ये मदत करते. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ताई मलासुद्धा स्वयंपाक घरामध्ये विविध पदार्थ बनवण्यासाठी सांगते. बाबाने घरामध्ये आणलेला एखादा पदार्थ ताई तिच्या वाट्याचा पदार्थ सुद्धा मलाच देते. ताई माझी एवढी काळजी घेते की, ताई हीच माझी आई आहे असे मला वाटते.

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त माझी ताई आनंदी असते. ती वर्षभर माझ्या वाढदिवसाच्या आतुरतेने वाट पाहते. आणि माझा वाढदिवस जवळ येताच माझ्या वाढदिवसाच्या तयारीला लागते. वाढदिवसाच्या दिवशी मला नवीन कपडे,आइस्क्रीम, चॉकलेट  आणि माझ्या आवडीचा सर्व वस्तूंची  खरेदी सुद्धा करून देते.

मला आणि माझ्या ताईला भाऊ नाहीये.  या ऊणीव ताईला भासते परंतु हीच उणीव मला भासू नये म्हणून माझी ताई माझ्यापेक्षा मोठी असल्याने मला भावाचे व बहिणीचे दोघांचे प्रेम ताईंन कडून मिळते.

मी रोज रात्री माझ्यातही शेजारी झोपते झोपायच्या वेळी ताई मला रामायण-महाभारत, परीकथा यांसारख्या अनेक कथा सांगत झोपवते.

तसेच मी कधी उदास असेल तर ताई मला मनोरंजन जोक सांगून हसवण्याचा प्रयत्न करते. माझी ताई मला शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करते.

शाळेतील नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याकरिता ताई माझे मानसिक व शाररिक तयारी करुन घेते.

माझी ताई मला खूप आवडते. माझा आदर्श हा माझी ताईच आहे. माझ्या आई-बाबांना सुद्धा माझ्या ताई वर खूप अभिमान आहे. कारण एक मुलगी असेल माझी  ताई कुठल्याही क्षेत्रांमध्ये मागे नाही.

ती प्रत्येक गोष्टीसाठी परिपूर्ण अशी आहे. ती अडचणीवर धाडसाने मात करते. माझ्या संपूर्ण घराची जबाबदारी ही माझ्या ताईनेच घेतलेली आहे.

माझ्या ताईला पाळीव प्राणी खूप आवडतात. ताईंच्या सांगण्यावरून माझ्या बाबाने घरामध्ये एक लहानसे कुत्र्याचे पिल्लू आणले आहे. ताई रोज का पिल्याला जेवायला दूध चपाती देते आणि त्याचे वेळेवर काळजी घेते. प्रत्येक गोष्टीसाठी परिपूर्ण असलेली माझी ताई सर्वांसाठी एक आदर्श ठरली आहे. आमचे  सर्व पाहुणे सुद्धा ताईंचे खूपच कौतुक करतात.

मेहंदी काढणे, रांगोळी काढणे, देवाची पूजा करणे, तिच्या नोकरीचे सर्व काम आटोपून ने घरकामात आई-बाबांना मदत करणे अशा प्रकारचे विविध गोष्टींसाठी माझी ताई परफेक्ट आहे. काम कुठलीही असो माझी ताई ते काम मनापासून करते. ताईंच्या स्वभावामुळे आणि त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे तिच्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा खूप कौतुक केले जाते. माझी ताई खूप तर्कशुद्ध  बुद्धीची आहे. एखादी घडलेली एक गोष्ट ती कधीही विसरत नाही.

ताई एवढी शिकलेली असून सुद्धा तिला देवावर खूप श्रद्धा आहे. वर्षभरात येणारे सर्व सण घरांमध्ये साजरे करण्याचे काम हे माझी  ताईच करते. विशेषता माझ्या ताईला गणपती देवावर  खूप श्रद्धा आहे. त्यामुळे महिन्याला येणारी चतुर्थीचा उपवास माझी ताई मनोभावाने करते.

आणि गणेश चतुर्थी किंवा गणपती उत्सव यावेळेस आमच्या घरामध्ये दहा दिवसाचा गणपती बसवला जातो. या दहा दिवसांमध्ये गणपतीला विविध प्रकारचा नैवेद्य पूजा-आरती सर्वकाही माझी ताईच बघते. त्याशिवाय गुढीपाडवा, मकर संक्रात, दिवाळी असे विविध सण माझी ताई

मनापासून साजरे करते. माझ्या ताईला चित्र काढायला खूप आवडतात. रिकाम्या वेळेत किंवा सुट्टीच्या दिवशी चित्र काढत असते. दिवाळीमध्ये माझ्यातला सुट्टी असते तेव्हा माझी ताई आम्हा सर्वांना घेऊन बाहेर फिरायला जाते. विविध देवस्थाने, पर्यटन स्थळे माझ्या ताई मुळेच मी पाहिली आहेत.

मी भविष्यामध्ये माझ्या ताई प्रमाणे होण्यासाठी प्रयत्न करेल.  मला माझी ताई खूप खूप खूप आवडते त्यामुळे मी  ब्लाउजलहानपणापासून ते आज परत माझ्या आईने माझ्यावर जे संस्कार केले तर तास संस्काराची शिदोरी घेऊन मी माझ्या आयुष्यात पुढे जाईल. व ताईने जसे तिचे नाव उंच केले त्या प्रमाणात मीही माझं नाव उंच करेल.

तर मित्रांनो ! ” माझी बहिण वर मराठी निबंध । My Sister Essay in Marathi  “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” माझी बहिण वर मराठी निबंध । My Sister Essay in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment