माझे कुटुंब निबंध मराठी | Essay on My Family in Marathi

माझे कुटुंब निबंध मराठी | Essay on My Family in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझे कुटुंब निबंध मराठी | Essay on My Family in Marathi “  घेऊन आलो घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझे कुटुंब निबंध मराठी | Essay on My Family in Marathi

या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कुटुंब हे असतेच. व हे कुटुंब खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. जीवनातील सर्व सुख, दुःख, आशा-निराशा यामध्ये सोबतीला कोण असेल तर ते म्हणजे आपले कुटुंब असते.

कारण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकायला मिळते. तसेच कुटुंब हे आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे काळजी घेते आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असते.

कुटुंबाचा व्यक्तीला चांगले वाईट गोष्टीचे संस्कार घडत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप मला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

तसेच कुटुंब मिळून एक चांगला समाज तयार होतो आणि एका चांगल्या समाजातून देश घडत असतो. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कुटुंब हा आपल्या समाजाचा एक केंद्रबिंदू आहे.

कुटुंबा म्हणजे प्रेम करणारी आई ,सर्व गोष्टीची पूर्ती करणारे बाबा, कथा सांगून आपले लाड पुरवणारे आजी आजोबा, प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या सोबत उभे राहणारे भाऊ-बहीण यांचे चित्र डोळ्यासमोर उभा राहते. आणि या सर्वांच्या सहवासात मिळून राहणे म्हणजेच आनंदी कुटुंब होय.

 कुटुंब म्हणजे काय ?

कुटुंब म्हणजे आपल्या परिवारातील सर्व सदस्य एकत्रित राहणे ,एकमेकांची काळजी घेणे होय. प्रत्येक अडीअडचणी मिळून सोडवणारे एकमेकांच्या नात्यातील परस्पर संबंध म्हणजे ” कुटुंब” होय. एक लहान कुटुंब ज्यात दोन मुले आपल्या पालकांसह राहतात त्याला, लहान अणु परिवार असे म्हणतात.

ज्या परिवारात तीन किंवा तीन पेक्षा जास्त मुले आपल्या पालकांसोबत राहतात, त्या कुटुंबाला मोठा परमाणु कुटुंब असे म्हणतात. तर आपल्या पालकांसह पालकांचे अनेक नातेवाईक एकत्रित मिळून राहतात त्याला संयुक्त परिवार असे म्हणतात.

 माझे कुटुंब :

आपल्या आसपास आपण वेगवेगळ्या प्रकारचे कुटुंब बघतो.कोणाच्या कुटुंबामध्ये खूप सदस्य असतात तर ,कोणाच्या कुटुंबांमध्ये खूप कमी सदस्य असतात. त्याप्रमाणेच माझे कुटुंब हे भारतीय कुटुंब प्रमाणे छोटेसे आहे. माझे नाव सोनू पाटील असे आहे.व मी वसंतनगर या शहरामध्ये माझ्या कुटुंबासह राहतो.

माझ्या कुटुंबा मध्ये एकूण आठ सदस्य आहेत. त्यामध्ये मी माझे आई -बाबा, आजी-आजोबा, काका- काकू आणि त्यांची मुलगा शिव म्हणजे माझा लहान भाऊ असे सर्वजण मिळून एकत्रित राहतो.

आजी-आजोबा हे माझ्या कुटुंबातील सर्वात वृद्ध आणि मोठे आहेत, त्यामुळे माझ्या कुटुंबातील आम्ही सर्वजण आजी-आजोबांच्या प्रत्येक शब्दांचे पालन करतो. आजी आजोबा जे सांगतील त्याप्रमाणेच वागतो.

आजी आजोबा हे खूपच शिस्तबद्ध आणि प्रेमळ आहेत. आजोबा हे आम्हाला शिस्त ,परिश्रम ,स्वच्छता याचे मूल्य सांगत असतात. आजोबा जेवढे प्रेमळ आहेत तेवढे ते कठोर सुद्धा आहेत. आजही माझे आजोबा माझ्या बाबांन कडून आणि कांकडून काही चूक झाली असेल तर त्यांना रागवतात.

माझे बाबा एक शिक्षक आहेत, ते वसंतनगर शहरातीलच एका शाळेमध्ये शिकवतात. माझे काका हे एक कपड्याचे व्यापारी आहेत. तर माझी आई आणि काकू या गृहिणी आहेत.माझा छोटा भाऊ शिव हा आत्ता अंगणवाडीमध्ये शिकतो. घरातील प्रत्येक सदस्य त्यांची कामे प्रामाणिकपणे पार पाडतो.

माझी आजी हे खूप धार्मिक महिला आहे ती रोज सकाळी व संध्याकाळी घराजवळील मंदिरात जाऊन बसते. आजी मला रोज संध्याकाळी पौराणिक कथा चे ज्ञान देत असते.

माझे बाबा आहे खूप शिस्तप्रिय आहेत.बाबा त्यांची सर्व कामे वेळेवर करत असतात कारण ते नेहमी मला म्हणतात की, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. त्यामुळे बाबा त्यांची सर्व काम वेळेवर करणे पसंत करतात.माझे काका सुध्दा बाबांनप्रमाणेच प्रमाणेच शिस्तप्रिय आहेत.

माझी आई आणि काकू सकाळी लवकर उठून घरकाम करतात. आई आणि काकू मिळून आमच्या संपूर्ण परिवाराची काळजी घेतात. घर नीटनेटके ठेवणे ,स्वच्छ ठेवणे ,सर्वांना आवडीचे पदार्थ करून देणे हे काम त्यांनी मनपूर्वक करतात. आई आणि काकू घरच्या सर्व सदस्याची काळजी तर घेतात त्याप्रमाणे शेजारील गरजू व्यक्तींना मदत सुद्धा करतात.

दान-धर्म यामध्ये त्यांना खूप विश्वास आहे, त्यामुळे ते नेहमी अन्नदान, वस्त्रदान करत असतात. संध्याकाळचे जेवण आम्ही सर्वजण मिळून करतो कारण एकत्र मिळून जेवल्याने कुटुंबाचे प्रेम वाढते. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ सर्वजण दिवसभरातील गप्पा मारतात. बाबा त्यांच्या शाळेतील अनुभव सांगतात काका त्यांच्या दुकानातील गप्पा मारतात. त्यानंतर माझे आजी-आजोबा मला पुराणातील काही कथा सांगतात. मी माझा लहान भाऊ शिव सोबत खेळत असतो व त्याला खेळत असतो.

 अडीअडचणींवर मात :

कुटुंब हे असे माध्यम आहे ज्या ठिकाणाहून आपल्याला सर्व काही चांगले वाईट गोष्टींचे ज्ञान मिळते. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गुणांची प्राप्ती ही कुटुंबातूनच होतं.

कुटुंबातून भावी पिढीला योग्य मार्ग आणि सकारात्मक विचार मनात आणण्यासाठी मदत होते. तसेच कुटुंबे आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते एक प्रगतीपथावर पोहोचवते.

प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडीअडचणी समस्या असतातच, या समस्यांचे निवारण करण्यासाठी आपल्याला एकमेकांचे सहायता लागते आणि हे योग्य सहायता आपल्याला कुटुंबातूनच मिळते.

माझ्या कुटुंबात ही असंच आहे, कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही अडचणी, समस्या असतील तर, कुटुंबातील बाकीचे व्यक्ती एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात आणि आधार देतात.

कुटुंबातील एखादा व्यक्ती जरी आजारी पडला तर, बाकीचे सर्वजण मिळून त्याची उत्तम रित्या काळजी घेतात. सर्वजण एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना साथ आणि आधार देतात. माझ्या कुटुंबातील सर्वजण एकमेकांना सांभाळून घेतात. व आलेल्या समस्या ला किंवा अडचणीला तोंड देतात.

 माझ्या कुटुंबातील संस्कार :

माझ्या कुटुंबातील मला उत्तम रित्या सर्वांगीण गुणांचा विकास होईल असे सर्व संस्कार मिळाले आहेत. शिस्त, निटनेटकेपणा ,टापटीपपणा ,स्वच्छता हे तर आजोबांकडून माझ्या मध्ये आलेले संस्कार आहेतच. सोबत गरजूंना मदत करणे, दीनदुबळ्यांची सेवा करणे, चे पालन करणे, मोठ्यांचा आदर करणे, प्राणीमात्रांवर जीव लावणे,नेहमी खरे बोलणे

हे सुद्धा मला माझ्या कुटुंबातून शिकायला मिळाले. थोडक्यात सांगायचे म्हणजे जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व उत्तम गुणाची पुरती मला माझ्या कुटुंबातून झाली.

अशाप्रकारे माझ्या कुटुंबातून माझ्यावर चांगले ससंस्कार झाले. थोडक्यात सांगायचं झालं माझं कुटुंब आहे संस्कार क्षम असे कुटुंब आहे. या संस्कारा मध्ये आणखी भर घालण्यासाठी आजी आणि आजोबा सारखे दोन आधारस्तंभ माझ्या कुटुंबाला लाभलेले आहेत.

माझ्या कुटुंबाला चांगले संस्कार लाभल्याने कधीही कोणामध्ये वाद-विवाद होत नाही सर्व जण मिळून मिसळून आणि आनंदी राहतात. एकत्र राहताना पाळावे लागणारे सर्व नियम सर्व जण पाळतात. त्यामुळे आम्ही सर्वजण हसत खेळत जीवन जगतो.

 निष्कर्ष :

कुटुंब हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. थोडक्यात कुटुंबा हा प्रत्येक व्यक्तीचा जीवन स्तंभ आहे. कारण कुटुंबाशिवाय जीवन जगण्यामध्ये काहीही अर्थ नाही. आपण जन्माला येतो तेव्हापासूनच नकळत आपला संबंध कुटुंबाशी जोडला जातो.

आपल्या समाजामध्ये खूप लोक  आपल्या कुटुंबापासून दूर जातात किंवा आई वडिलांना न सांभाळता त्यांना आश्रमामध्ये सोडतात.असे वागणे हे खुप चुकीचे आहे.

कारण कुटुंब हा आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा हिस्सा आहे. याच कुटुंबातील सदस्यांनी मिळून आपल्याला लहानाचे मोठे केलेले असते. त्यामुळे आपण मोठे झाल्याने आपल्या कुटुंबातील लोक व आपले आई-वडील वृद्ध झाले असेल तर ,त्यांचा सांभाळ करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे.

हे कुटुंबातूनच मिळतात त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाला शेवट पर्यंत जपावे व सर्व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी हे आपले कर्तव्य आहे.

तर मित्रांनो ! ” माझे कुटुंब निबंध मराठी | Essay on My Family in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर ,तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.

” माझे कुटुंब निबंध मराठी | Essay on My Family in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असेल तर ,कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “माझे कुटुंब निबंध मराठी | Essay on My Family in Marathi”

  1. Ha Ha Ha, I could just laugh for hours reading your post which you’ve written with a really nice humorous tone! I tell you, it’s not that easy to write on such a serious topic with such humour. You’ve just nailed it! There’s a lot to learn from you and about how you’ve brought in the superb sense of comedy to a nice and useful blog post.

    Reply

Leave a Comment