निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi

निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi

या वातावरणामध्ये आपले जीवन सुखी समाधानाने जगत आहोत त्याला निसर्ग असे म्हणू शकतो. निसर्ग ही देवाने दिलेली खूप सुंदर देणगी आहे.कदाचित याच निसर्गामुळे सजीव सृष्टी या पृथ्वीतलावर निर्माण झाली असावी. जीवन आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला निसर्गातूनच होतो.

आजच्या आधुनिक जगाने केलेली प्रगती ही अविस्मरणीय आहे. बऱ्याचशा नवनवीन गोष्टींचा शोध हा मानवाने लावलेला आहे. परंतु, जे जे मानवनिर्मित नाही त्याला आपण निसर्ग म्हणू शकतो. आपल्या सभोवताली आढळणारे पाणी, हवा, आकाश,डोंगर-दर्या ही निसर्गाची तत्वे आहेत.

निसर्गाचे स्त्रोत हे वेगवेगळे आहेत. जसे की नद्या ,समुद्र, डोंगर, जमीन, सूर्य या वस्तू आपल्याला दिसतात परंतु याच निसर्गामध्ये काही अशा अदृश्य वस्तू आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत परंतु या सर्वांचा मिळून निसर्ग बनलेला असतो.

पृथ्वी वर्तुळाकार दिशेमध्ये स्वतः भोवती होते सूर्याभोवती फिरते यामुळेच दिवस आणि रात्र होतात. पृथ्वी ग्रहावर एक जीवनदायी वातावरण आहे त्यामुळे खूप सारे घटक पृथ्वीमध्ये समाविष्ट झालेले आहेत.

पृथ्वीवर असलेल्या घटकांमधील पाणी आणि हवा हे त्याचे मुख्य जीवनदायी घटक म्हणता येईल. आणि या घटकांची उपलब्धता ही निसर्गाच्या नियमांवर होत असाते. या पृथ्वीवर असलेले सर्व सजीव घटक एकमेकांशी निसर्गाच्या माध्यमातून जोडलेले असतात. पृथ्वीवरील सजीवांचे जीवन सुरळीत चालण्यासाठी निसर्ग महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

अन्न, पाणी, हवा यांसारख्या मूलभूत कारण गरजा पूर्ण करण्याची काम निसर्गातूनच होते. या व्यतिरिक्त अग्नी आणि आकाश ही तत्वे सुद्धा निसर्गातून आपल्याला मिळत आसले तरी आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

एकत्र जीवन आणि निसर्ग समजून घेणे खूप कठीण आहे तरी आपण आपल्या सभोवतालचे वातावरण म्हणजे निसर्ग असे समजतो. आणि आणि निसर्गाद्वारे आपले जीवन गतिमान आहे. मानवा पूर्णता निसर्गाचे जोडलेला आहे. निसर्गात वेगवेगळे ऋतू असतात. आणि या ऋतूनुसार आपल्या शेजारील वातावरण आणि हवामान सतत बदलत असते.

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतू नुसार होणारे बदल हे आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतात. तसेच पाण्याची गरज आणि हवा शुद्धीकरण यासाठी निसर्गचक्र आहे ज्याद्वारे पृथ्वीवर फिरून फिरून पाऊस असतो तसेच वातावरणात असलेल्या हवेचे थर ज्यामुळे आपल्याला आवश्यक असणारी हवा आपण श्वास म्हणून घेतो.

या निसर्गात असलेले झाडे, नद्या, नाले, समुद्र यांपासून आपली हवेची आणि पाण्याची गरज पूर्ण झाली. अग्नि ची गरज हे नंतर निर्माण झाली. याच अग्नि मुळे आपण अन्न कच्चे न खाता शिजवून खाऊ लागला.

अन्न निर्मितीसाठी आपण शेती व झाडां पासून मिळणाऱ्या फळांचा वापर करू लागलो परंतु ही झाडे किंवा शेती हा एक निसर्गाचाच भाग आहे.

निसर्गाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे झाडे आहेत. याच झाडापासून मानवाला जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजेच “ऑक्सिजन” मिळतो. तसेच पृथ्वी वर झाडे आहेत म्हणून बहुतांश पाऊस हा झाडा मुळे होतो. आणि अन्नाची गरज सुद्धा झाडांमुळेच सांगते. त्यामुळे झाडे ही निसर्गाचा अविभाज्य घटक आहे.

माणसाचा जन्म आणि मृत्यू हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे. किंबहुना मनुष्य सुद्धा याच निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. या सृष्टी वर आसलेले प्राणी, पक्षी, झाडे, झुडपे, नद्या-नाले, डोंगर सर्व काही निसर्गाचीच देणगी आहे. हा निसर्गातूनच मिळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून माणसाने आज प्रगती केलेली आहे.

निसर्गाचे झाडांच्या लाकडांचा वापर करून इमारती बांधल्या जाऊ लागल्या, तसेच झाडाच्या लाकडापासून विविध फर्निचरच्या वस्तू बनवण्यात जात आहेत. निसर्गातील औषधी वनस्पतींपासून माणूस औषधे निर्माण करून आपले आयुष्य वाढवू लागला. त्यामुळे मृत्यूदर कमी होऊन जीवन काळ वाढू लागला आहे. वयाचा परिणाम लोकसंख्या वाढ झालेली जाणवत आहे.

तसेच निसर्गातून मिळणाऱ्या अनेक वस्तू म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, खाण कामातून मिळणाऱ्या मौल्यवान वस्तू यांचा वापर करून माणूस आपल्या गरजा पूर्ण करू लागला.

अशाप्रकारे मनुष्य स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला नुकसान पोहोचत आहे. आजचा मनुष्य विसरून चालला आहे की आपले घरी आपली असते परंतु या संपूर्ण सृष्टी चे घर म्हणजे निसर्ग आहे.

मानवाने निसर्गात अनेक महत्त्वपूर्ण घटकांच्या आधारावर आपले उद्योगधंदे उभारले आहेत. निसर्गातील झाडांपासून रबर निर्मिती, औषधी निर्मिती, फर्निचर निर्मिती, इंधन म्हणून वापर, समुद्राच्या पाण्यापासून वीज निर्मिती, हवेवर चालणाऱ्या पवनचक्क्या, खान कामातून कोळसा, खनिज निर्मिती असे अनेक महत्त्वपूर्ण उद्योग माणसाने निसर्गातून मिळणाऱ्या कच्चा मालाच्या आधारावर स्थापित केलेले आहेत.

मासेमारी, पशुधन, पशूपालन, शेती, माती पासून विटा निर्मिती या गोष्टीसुद्धा निसर्गातील घटकांवर अवलंबून आहेत.

निसर्गात असलेली सुंदर दृश्य माणसाला निसर्गाकडे आकर्षित करतात. निसर्गातील सुंदर दृश्य यामुळे जगभरातील पर्यटन क्षेत्राचा विकास होऊन आर्थिक मदत होत आहे. भारतातील महाबळेश्वर, केरळ, कोकण, काश्मीर यांसारख्या निसर्गाने परिपूर्ण असलेल्या शहरांचा लाभ घेण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात.

जगभरात असलेल्या अनेक निसर्गनिर्मित आचार्यांना पाहण्यासाठी मानव जगभर प्रवास करून निसर्गातील गोष्टींचा आनंद घेत आहे. त्यातून त्या देशाच्या आर्थिक विकासाला सुद्धा मदत होत आहे. निसर्गातील हिरवळ, रंगीबिरंगी फुले, फळे, पक्षी, प्राणी, वेली, यांना बघितल्यास मानवाचा मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते. अशाप्रकारे निसर्ग मनुष्याला चारी बाजूंनी मदत करण्यास उपयोगी पडतो.

अलीकडे वाढलेल्या आधुनिक कारणामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. वृक्षतोड, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण हे सर्व निसर्गाला झालेल्या हनीतून होणारे परिणाम आहेत. मानवाने स्वतःच्या सुखासाठी, सोयीसाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला हानी पोहोचली आहे त्यामुळे निसर्गातील इतर जीव म्हणजेच प्राणी, पक्षी यांची जीवन संकटात आले आहे.

परंतु मानवाने निसर्गाला हानी न पोहोचवता निसर्ग आपला मित्र आहे, निसर्गामुळे आपली जीवन सुरळीत चालले आहे हे लक्षात घेऊन निसर्गाचे संरक्षण करणे याकडे लक्ष दिले पाहिजे.

मानवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पुरती ही निसर्गातूनच होते. जर निसर्गाला नुकसान पोहोचले किंवा हानी पोहोचली तर याचे परिणाम हे आपल्यालाच सोसावे लागतील. आपण निसर्गाला नष्ट केले तर निसर्ग आपल्याला नष्ट करू शकतो.

त्यामुळे आपले जीवन सुखकर आणि निरोगी ठेवण्यासाठी व पुढच्या पिढीसाठी आपण निसर्गाचे जतन केले पाहिजे. निसर्गातून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे. निसर्गातून मिळणाऱ्या साधन संपत्तीचा जपून वापर केला पाहिजे. वातावरणात वाढ आलेले  प्रदूषण, वृक्षतोड यांच्या प्रमाण कमी केले असता कदाचित निसर्गमुळे  होणाऱ्या हानी पासून आपण वाचू शकतो.

प्रत्येकाने निसर्ग हा आपला मित्र आहे असे समजून निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य समजले पाहिजे. आपल्या येणाऱ्या पिढीला निसर्गातील गोष्टींचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर आज आपण निसर्गाला हानी न पोहोचवता निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे.

कुठलाही मोबदला न घेता निसर्ग आपल्याला विविध गोष्टी पुरवितो. याची जाणीव ठेवून आपण निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवली पाहिजे.

खरंच ! निसर्ग आहे म्हणून या पृथ्वीतलावर संपूर्ण सजीव आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे आपल्या जीवनासाठी निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळालेचं असेल.

तर मित्रांनो ! ” निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही points राहिले  असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

2 thoughts on “निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nature in Marathi । Nisarg Essay In Marathi”

Leave a Comment