100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ । 100+ Vakprachar in Marathi With Meaning

100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ । 100+ Vakprachar in Marathi With Meaning

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” 100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | 100+ Vakprachar in Marathi With Meaning “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ । 100+ Vakprachar in Marathi With Meaning

आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही मराठी वाक्यप्रचारत्यांचे अर्थ घेऊन आलोत. सोबतच या वाक्यप्रचारांचा उपयोग कसा करावा यासाठी उदाहरणे सुद्धा दिलेली आहेत.

 वाक्यप्रचार म्हणजे काय ?

मित्रांनो ! सामान्यता सर्वजण मराठी भाषा बोलताना एखादे वाक्य पूर्ण बोलण्याच्या जागेवर वाक्यप्रचारांचा वापर करतात. त्यामुळे भाषेला आणखीनच गोडी प्राप्त होते.

वाक्यप्रचार हा शब्दश असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो. मराठी भाषेमध्ये शारीरिक अवयवांवर मोठ्या प्रमाणात वाक्यप्रचार उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात.

तसेच विद्यार्थ्यांना मराठी विषय यामध्येसुद्धा वाक्यप्रचार विचारले जातात. आज या ब्लॉगमध्ये आपण Marathi vakprachar arth, Marathi vakprachar with meaning मराठी वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग पाहणार आहोत.

आशा आहे की, हे वाक्य प्रचार तुम्हाला उपयोगी ठरतील.

100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | 100+ Vakprachar in Marathi With Meaning

  1. अंगात वीज संचारणे- अचानक बळ येते.

देशभक्ती वरील गाणे ऐकताना प्रत्येकाच्या अंगामध्ये विज संचारते.

  1. कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे.

द्राक्ष उत्पादनाच्या वेळ अवकाळी पाऊस पडतात शेतकरी कपाळाला हात लावतात.

  1. अंगाची लाही लाही होणे- अतिशय संताप येणे.

उन्हा मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या अंगाची लाही लाही होते.

  1. कंबर कसणे- एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने तयार होणे.

मराठा आरक्षणाच्या वेळी सर्व मराठी लोक कंबर कसून पुढे आले.

  1. कंठस्नान घालने – ठार मारणे.

युध्दामध्ये सर्वजण एकमेकांना कंठस्नान घालतात.

  1. केसाने गळा कापणे- विश्वासात घेऊन विश्वास घात करणे.

सीताच्या मामाने त्यांच्या घरात चोरी करून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा केसाने गळा कापला.

  1. कान फुंकणे- दुसऱ्याच्या मनात कल्शिक निर्माण करणे, चूगली करणे.

काही लोक असतात इतरांचे कान फु़ंकत तसतात.

8. अंग चोरून काम करणे – फारच थोडे काम करणे.

आळशी लोक नेहमी अंग चोरून काम करतात.

  1. अंगवळणी पडणे- सवाय होणे.

एखादे काम सतत केल्यास त्या कामाचे शरीराला अंगवळणी होते.

  1. कपाळमोक्ष पडणे- मृत्यू ओढवणे.

घाईत चमे करणारे व्यक्ती नेहमी कपाळमोक्ष पडतात.

  1. काढता पाय घेणे: गंभीर किंवा विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे.

बाबा ताईला ओळखताना पाहून छोट्या माधवने तिथून काढता पाय घेतला.

  1. कान टोचणे- चूक लक्षात आणून देणे.

अमोल असतात मोबाईलवर पब्जी खेळत असल्याने राधिकाने बाबांचे अमोल बद्दल कान टोचले.

  1. कान उपटणे- कडक शब्दांत समजावणे.

शाळेमध्ये सतत इतरांना मारणाऱ्या रमेशचे शिक्षकांनी चांगलेच कान उपटले.

  1. कानावर घालने- लक्षात आणून देणे.

रमेशला तोंडी परीक्षेमध्ये कमी मार्क पडल्याने शिक्षकांनी त्याची ही चूक त्याच्या पालकांच्या कानावर घातली.

  1. खांद्याला खांदा भिडवने: सहकार्याच्या भावनेने काम करणे, एकजुटीने काम करणे.

आज-काल स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात.

  1. गळ्यात गळा घालने- खोल प्रेमाचे भावना असणे, खूप पक्की मैत्री असणे.

राधिका आणि रश्मी यांची इतकी पक्की मैत्री आहे की ते कुठेही गळ्यात गळा घालून फिरतात.

  1. चेहरा खुलणे- चेहऱ्यावर आनंदाचा भाव येणे.

रेश्माला पहायला पाहुणे येणार हे बातमी ऐकताच तिचा चेहरा खुलला.

  1. चेहरा पडणे- एखाद्या गोष्टीची लाज वाटणे.

राजू दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झाला ही बातमी त्याच्या आईवडिलांना कळताच राजुचा चेहरा पडला.

  1. छातीत धडधडणे- खूप भीती वाटणे.

समोर वाग पाहताच अंजूच्या छातीत धडधडले.

  1. जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे.

काही लोक जिभेला हाड नसल्याप्रमाणे बोलतात.

  1. जीव की प्राण असणे- अत्यंत प्रिय असणे.

प्रत्येक आई वडिलांन साठी त्यांची मुले जीव की प्राण असतात.

  1. डोक्यावर खापर फोडणे- चूक नसतानाही एखाद्याला दोषी ठरवणे.

रामने चोरी केली परंतु त्याचे खापर शामच्या डोक्यावर फोडले.

  1. डोळा आसणे- नजर असणे.

राधाच्या प्रत्येक कृत्याकडे तिच्या आईबाबांचा डोळा असतो.

  1. डोळा लागणे- झोप लागणे.

कामावरून थकून आलेल्या बाबांचा चादरीवर पडल्या पडल्या डोळा लागला.

  1. डोळे उघडणे- अद्दल घडणे, अनुभवाने सावध होणे.

नीट अभ्यास कर असे सांगून ही दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या शामचा चांगलाच डोळा उघडला.

  1. डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.

प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या लहान-मोठा चुकांकडे डोळेझाक करतात.

  1. डोळे निवणे- समाधानी होणे.

पांडुरंगाच्या भेटीची ओढ असणार्‍या कित्येक वारकऱ्यांचे पांडुरंगाचे दर्शन होताच डोळे निवतात.

  1. डोळे पांढरे होणे- धक्कादायक प्रसंग निर्माण होणे, भीतीने खूप घाबरणे.

अचानक समोर भला मोठा वाघ आल्याने रीमाचे डोळे पांढरे झाले.

  1. डोळ्यात धूळ फेकणे- खोटे सांगून फसवणे.

सुमितच्या संपत्तीच्या लालसेपोटी प्रेमाने त्याच्या डोळ्यात धूळ फेकून लग्न केले.

  1. डोळे विस्फारणे- आश्चर्याने पाहणे.

आपल्या बाल मैत्रिणीला अचानक समोर पाहताच राधाची डोळे विस्फारले.

  1. डोळे मिटणे- मरण पावणे.

आपल्या दोन्ही मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहिलेले पाहून शांता काकूने आनंदाने डोळे मिटले.

  1. डोळे वटारणे- रागाने पाहणे.

सतत मोबाईलवर खेळताना पाहून बाबांनी रमेश कडे डोळे वटारले.

  1. तोंड देणे- सामना करणे.

सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक कुठल्याही परिस्थितीला सहजपणे तोंड देतात.

  1. तोंड भरून बोलणे- मनाने समाधान होईपर्यंत बोलणे.

सीता आणि गीता बालपणीच्या मैत्रिणी फार वर्षांनी भेटल्याने त्या दोघी तोंड भरून बोलल्या.

  1. तोंड काळे करणे- कायमचे निघून जाणे.

आपल्या पिदोड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून राधाने तोंड काळे केले.

  1. तोंडाचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे.

अचानक समोर भला मोठा साप पाहून आमच्या तोंडचे पाणी पळाले.

  1. तोंडघशी पडणे- विश्वास घात होणे.

आई-वडिलांनी शामचं खोटं पकडल्याने तो तोंडाशी पडला.

  1. तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापणे.

रमेश आणि सुरेशच्या भांडण यात रमेशने अपशब्द वापरल्याने सुरेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

  1. तोंडात बोट घालणे- आश्चर्य चकित होणे.

दहावीच्या परीक्षेमध्ये सीमा चा पहिला नंबर आला ही बातमी ऐकताच तिने तोंडात बोट घातले.

  1. तोंडाला तोंड देणे- भांडणे.

राधा काकू आणि लक्ष्मी काकू सकाळ सकाळी एकमेकीच्या तोंडाला तोंड देत होत्या.

  1. तोंडाला पाणी सुटणे- हाव निर्माण होणे.

आईने बिर्याणी भात केलेला पाहून सागर च्या तोंडाला पाणी सुटले.

  1. तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.

आई बाबाचे भांडणे पाहून सुरेशने तोंडाला कुलूप घातले.

  1. दात ओठ खाणे- चीड व्यक्त करणे.

गावकर्यांण समोर आपला अपमान होत असल्याचा पाहून सरपंच तेथून दात ओठ खाऊन निघून गेला.

  1. हात वीचकणे- निर्जल्लित होऊन हसणे.

शिक्षक सर्वांना रागवत असल्याचे पाहून सौरव लास्ट बाकावर बसून जात विचकत होता.

  1. नवल वाटणे- कौतूक वाटणे.

घरामध्ये बाबांनी स्मार्टफोन आणलेला पाहून आईला त्याचे नवल वाटले.

  1. नाक खुपसणे- नको तेथे सहभागी होणे.

काही लोकांना नको त्या ठिकाणी नाक खुपसण्याची सवय असते.

  1. नाक कापणे- अपमान करणे.

इतरांना तुच्छ समजणार्‍या  नीता काकूंचे आईने आज सर्वांसमोर नाक कापले.

  1. नाक मुरडणे- नापसंती दर्शवणे.

बाबांनी आणलेले खेळणे पसंत न आल्याने राजूने नाक मुरडले.

  1. नाकी नऊ येणे- फार दगदग होणे.

आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वांच्या गरजा पूर्ण करता करता बाबांना नाकी नऊ येते.

  1. नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे.

सरपंचाला अपशब्द वापरल्याने सरपंचने सदू काकाला सर्व गावकारण समोर नाक घासायला लावले.

  1. नजर चुकवणे- न दिसणारी हालचाल करणे.

काही मुले वर्ग शिक्षकांची नजर चुकवून वर्गामध्ये डब्बा खातात.

  1. पाठ दाखवणे- समोरून निघून जाणे.

प्रियाची सुधा काकू त्यांच्या घरासमोरून पाठ दाखवून  गेली.

  1. पदरात घेणे- स्वीकारणे.

सिंधू ताई सपकाळ यांनी अनाथ मुलांना पदरात घेतले.

  1. पाठीशी घालने – संरक्षण देणे.

देशातील जवान हे देशाच्या पाठीशी घालतात.

  1. पाणी पाजणे- पराभव करणे.

कुस्ती मध्ये एक खेळाडू दुसरा खेळाडू ला पाणी पाजतो.

  1. पोटात कावळे ओरडणे- खूप भूक लागणे.

आई बिर्याणी कळणार असे म्हणताच माझ्या पोटात कावळे ओरडतात.

  1. पाय मोकळे करणे- फिरायला जाणे.

लोक डाऊन समजतात सर्वजण पाय मोकळे करण्यासाठी निघाले.

  1. पायबंद घालणे- आळा घालणे.

ग्रामीण भागामधील लोक मुलींना कोणतेही कृत्य करण्यासाठी पायबंद घालतात.

  1. पोटात ठेवणे- गुपित किंवा सांभाळून ठेवणे.

रे्या दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झाली ही गोष्ट तिने सर्वांपासून पोटात ठेवली.

  1. पोटाला चिमटा देणे- अत्यंत काटकसरीने राहणे.

गरीब परिस्थिती असणारे लोक नेहमी पोटाला चिमटा देऊन राहतात.

  1. पोटाशी धरणे- माया करणे, खुशीत घेणे.

कांगारू आपल्या पिलाला नेहमी पोटाशी धरून असते.

  1. प्राणापेक्षा जास्त जपणे- एखादी गोष्ट स्वतःच्या जिवापेक्षा अधिक सांभाळणे.

बायका मौल्यवान वस्तू प्राणापेक्षा जास्त जपतात.

  1. बोटावर नाचवणे- हवेत असे वागून घेणे.

लहान मुले आपल्या आई-वडिलांना बोटावर नाचवतात.

  1. मांडीवर घेणे- दत्तक घेणे.

राधा काकूने अनाथ आश्रम मधील एका मुलाला मांडीवर घेतले.

  1. मुठीत असणे- ताब्यात असणे.

रामुकाकांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या मुठीत घेतले आहे.

  1. रक्त आटवणे- अति कष्ट करणे.

शेतकरी शेतात धान्य पिकवण्यासाठी स्वतःचे रक्त अटवतात.

  1. रक्ताचे पाणी करणे- अति श्रम करणे.

शेतकरी शेतात रक्ताचे पाणी करून पीक पिकवतात.

  1. हात आखडणे- देण्याची क्षमता असतानाही कमी देणे.

श्रीमंत लोक नेहमी दान देताना हात आखडतात.

  1. हात टेकणे- नाइलाजाने शरण येणे.

सावकाराचे कर्ज फेडत फेड शेतकऱ्याने शेवटी हात टेकले.

  1. हात देणे- मदत करणे.

श्रीमंत लोक नेहमी गरीब लोक आनंद आणि दान देऊन हात देतात.

  1. हात मारणे – ताव मारणे.

आईने केलेली पाव भाजी खूपच चविष्ट झाल्याने सर्वांनी त्यावर हात मारला.

  1. हातातोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खायला मिळणे.

रामूने डब्याला आणलेली शेव सर्वांना वाटता वाटता त्याच्या हातातोंडाशी गाठ पडली.

  1. हातापाय पडणे- लाचारीने विनवण्या करणे.

मुलीच्या बाजूची मंडळी ही मुलाच्या बाजूच्या मंडळीच्या हातापाय पडतात.

  1. हातावर तुरी देणे- डोळ्यादेखत फसवणूक करणे.

चोराने रामुकाका च्या हातावर तुरी देऊन चोरी केली.

  1. दोन हात करणे- सामना करणे, टक्कर देणें.

एखादा खेळातील उत्कृष्ट खेळाडू जर समोरासमोर आले तर दोन हात करतात.

  1. हृदय भरून येणे- गदगदून येणे.

चार वर्षानंतर आपल्या मुलीला पाहून आई वडिलांचे हृदय भरून आले.

  1. हात देणे- मार देणे.

घरातील लहान मुलांचा अवचीन पणा पाहून बाबांनी त्यांना हात दिला.

  1. हात घाई वर येणे- मार मारी ची वेळ निर्माण होणे.

खेळत खेळत त्यांच्यामध्ये हात घाई  वर येण्याची परिस्थिती निर्माण झाली.

तर मित्रांनो ! ” 100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ । 100+ Vakprachar in Marathi With Meaning “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवर शेअर करा.

या पोस्ट मध्ये ” 100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ । 100+ Vakprachar in Marathi With Meaning “ आमच्या कडून काही ( Points ) राहिले असतील तर, कमेंट ( Comment ) करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment