माझा आवडता सण मराठी निबंध | Maza Avadta San Essay in Marathi

माझा आवडता सण मराठी निबंध | Maza Avadta San Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता सण मराठी निबंध | Maza Avadta San Essay in Marathi ” घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता सण मराठी निबंध | Maza Avadta San Essay in Marathi

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अनेक सण आहेत. प्रत्येक सणाच्या आपले काही स्वतःचे विशिष्ट धार्मिक महत्त्व आणि पौराणिक का असतात. प्रत्येक सण साजरा करण्यामागे एक आनंद ,उत्सव आणि जल्लोष असतो.

भारतात विविध सण साजरे केले जातात परंतु या सर्व शाळांमध्ये माझा आवडता सण म्हणजे ” गुढी पाडवा.”

लहानपणापासूनच मला गुढीपाडवा हा सण खूप आवडतो. कारण दारोदारी नवीन वर्षाच्या लावलेले गुढी उभारलेले असते आणि साखरेचे हार लहान मुलांना खायला मिळतात.

गुढीपाडवा हा हे भारतीय सण असून, हा सण हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला  म्हणजेच वसंत ऋतू च्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. आपल्या येथील नवीन वर्ष हे 1 जानेवारीपासून सुरू होत असले तरी मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा या दिवसापासून चालू होते.

गुढीपाडवा हा शालिवाहन संवत्सराचा  पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या सडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढी पाडवा या दिवशी आहे.

गुढीपाडव्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे, व्यापार चालू करणे ,  सुवर्ण खरेदी करणे, उद्योग टाकणे असे कार्य करणे शुभ मानले जातात.

गुढीपाडव्या दिवशी दारोदारी गुढी उभारली जाते आणि  ही गुढी विजयाचे प्रतीक आहे. तसेच गुढीपाडव्यापासून रामचंद्र कार्यक्रमाला सुरुवात होते. प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही पौराणिक कथा असता,त्याप्रमाणेच गुढीपाडवा सण करण्यामागे हे काही पौराणिक कथा आहेत.

असे म्हणतात की, या दिवशी भगवान विष्णूंनी संपूर्ण विश्वाची निर्मिती केली होती.  म्हणून हा दिवस गुढीपाढवा च्या रूपात साजरा केला जातो.

तसेच दुसर्‍या कथेनुसार असे लक्षात येते की ,रामाने चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून दिवशी  आयोध्यात प्रवेश केला होता. रामाने रावणाचा वध केला होता विजय प्राप्त केला होता, विजयाचे प्रतीक म्हणून सर्वांनी घरोघरी गुढी उभारून रामाचे स्वागत केले होते, म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तसेच गुढीपाडवा या दिवसापासून रामाचे नवरात्र चालू होते, व राम नवमी या दिवशी संपते.

तसेच गुढीपाडव्याची तिसरी कथा म्हणजे, शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने च्या मुलाने शाकांचा वध करण्यासाठी मातीचे पुतळे बनवले, व या मातीचा पुतळा मध्ये  देवाने प्राण सोडले, या मातीच्या पुतळ्याच्या सणांचा वापर करून  शालिवाहन ने शाकांचा वध केला. त्यामुळे या दिवसापासून शालिवाहन कालगणना चालू असते व त्याला ‘शालिवाहन शक’ असे म्हणतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी गुढी उभारली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील लोक घरोघरी गुढी उभारतात. गुढी म्हणजेच,  उंच बांबूच्या काठीला नवीन वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, व  त्यावर कडू‌लि़बाच्या झाडाचे डाहाळे, कठीच्या वरच्या टोकाला पितळाच्या तांब्या लावतात,या  गुढीला फुलांचा हार व साखरेचा हार घालतात. व ही  गुढी न्सलेश जागेवर एक पाठ  ठेवून  त्या पाठाच्या कडेने रांगोळी काढतात.  काठीला हळद-कुंकू, अक्षदा वाहून पूजा केली जाते.

त्यानंतर पुरणपोळीचा किंवा एखादा गोड पदार्थ करून गुढीला नैवेद्य दाखवतात. प्रकारे विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेली गुढी घरोघरी उभारली जाते.

गुढीपाडवा हा दिवस  खूप शुभ मानला जातो.या दिसशी नवीन वर्षाची सुरवात होते, त्यामुळे प्रत्येक जण नवीन कार्याला सुरुवात करतात व या दिवशी घेतलेले सर्व कार्य यशस्वी होतत असे मानले जाते.

तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण एकत्र येतात, नवीन पोशाख घालतात, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. त्यामुळे एकमेकांचे प्रेम आणि सामाजिक बांधिलकी वाढली जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते, त्यामुळे सर्वजण दान करतात. त्यातून समाज कल्याण यांचे कार्य घडते. काही जण गरीब लोकांना अन्नदान ,वस्त्रदान करतात. त्यातून एक पुण्याचे  कार्य घडते.

गुढीपाडवा हा भारतातील विविध प्रांतांमध्ये विविध नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्र गुढीपाडवा म्हणतात तर, कर्नाटक मध्ये विजया दिन म्हणतात. तर सिंधी लोक गुढीपाडव्याला चेटीचंड म्हणतात.

अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारा हा गुढीपाडवा सण मला खूप खूप आवडतो. या दिवशी मी माझ्या आई-बाबांसोबत  गरीब लोकांना अन्नदान करतो. सर्व  नातेवाईकांना फोन करून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. हे माझ्या मित्रांसोबत   मिळून मंदिरात जातो. गुढीपाडव्याच्या सणाला  आपण  गुढीला साखरेचा हार घालतो, तो हार मला खूप आवडतो.

दरवर्षी मी माझ्या आई बाबा सोबत मिळून आमच्या दारासमोर गुढी उभारतो. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व वातावरण आनंदमयी आणि प्रसन्न असते. हिंदू धर्मात महत्त्वाचा असलेला हा गुढीपाडवा सण सर्वजण मिळून आनंदाने साजरा करतात. म्हणून मला गुढीपाडवा हा सण खूप खूप आवडतो.

तर मित्रांनो ! हे सुंदर निबंध वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करायला विसरू नका.

या निबंधा मध्ये आमच्या कडून काही ( Points ) राहिले असतील तर, कमेंट ( Comment ) करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment