माझा आवडता शास्त्रज्ञ मराठी निबंध | My Favourite Scientist Essay in Marathi
नमस्कार मित्रांनो आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.
आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता शास्त्रज्ञ मराठी निबंध । My Favourite Scientist Essay in Marathi “ घेऊन आलोत.
आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईटवरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
माझा आवडता शास्त्रज्ञ मराठी निबंध | My Favourite Scientist Essay in Marathi
Table of Contents
या जगात अनेक महान शास्त्रज्ञ होऊन गेले .प्रत्येकाने काही ना काही शोध लावला आणि त्या शोधांचा उपयोग आपण आजही आपल्याला जीवनामध्ये करतो.
मी अनेक शास्त्रज्ञांचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक शास्त्रज्ञाने काहीना काही शोध लावले , त्यांनी लावलेला प्रत्येक शोधांचा उपयोग मानवजातीला उपयुक्त ठरला. सर्वात शास्त्रज्ञाची कामगिरीही कौतुकास्पद आहे.
परंतु या सर्व शास्त्रज्ञान पैकी मला आवडलेले शास्त्रज्ञ ” न्यूटन “ आहेत. न्यूटन एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा ( Gravity ) शोध लावला. त्यांनी लावलेल्या शोधामुळे आज आपण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे जाणू शकतो. न्यूटन यांनी मुख्यता तिन क्रांतिकारी शोध लावले. त्यांच्या या शोधामध्ये प्रकाशाचे नियम, द्रव्य स्थिती आणि गुरुत्वाकर्षण या नियमांचा समावेश होतो.
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण च्या नियमामुळे असे लक्षात येते की, निसर्गातील सर्वच वस्तू गतिमान असतात. सूर्य ,चंद्र ,तारे आणि ग्रह या सर्वांना गुरुत्वाकर्षणामुळे गती प्राप्त होते. न्यूटन या शास्त्रज्ञ मुळे आपल्याला गुरुत्वाकर्षण सारख्या महत्त्वपूर्णगोष्टीची माहिती मिळाली. त्यामुळे माझा आवडता शास्त्रज्ञ न्यूटन आहेत.
न्यूटनचा जन्म:
न्यूटन हे एक जगातील एक महान शास्त्रज्ञ होते. न्युटनचा जन्म 25 डिसेंबर 1642 ला इंग्लंडमधील लिंकन शायर शहराजवळील वुलस्टरप येथे झाला. न्यूटनचे पूर्ण नाव आयझॅक न्यूटन असे होते.
न्यूटन जवान तीन महिन्याचं होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले, न्यूटनच्या आईने त्यांना त्यांच्या आजीकडे ठेवून दुसरे लग्न केले. न्यूटन जेव्हा बारा वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईच्या दुसऱ्या पतीचे निधन झाले व त्यांच्या आई न्यूटन जवळ आली.
न्यूटनचे बालपण:
न्यूटन बारा वर्षापर्यंत त्यांच्या आजीजवळ होते. या बारा वर्षात न्यूटन जेमतेम दोन वर्षात शाळेत गेले. न्यूटनला लहानपणापासूनच गणिताची आवड होती. न्यूटनचे आई न्यूटनला घेऊन लिंकन शायर या शहरात परत आली व न्यूटनला शाळेतून काढून शेती कामाला लावले.
एक दिवस शेतामध्ये काम करत असताना न्यूटन थकलेल्या अवस्थेत एका झाडाखाली बसले. तेव्हा मंद वारा वाहत होता. आयझॅक न्यूटन ची तर्कशुद्ध बुद्धि त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या मनात वाऱ्याचा वेग मोजण्याची कल्पना जागृत झाली.
त्यावेळी वाऱ्याचा वेग मोजण्याचे कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे न्यूटने बाराच्या दिशेने एक उडी मारली व त्या ठिकाणी एक दगड ठेवला, नंतर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने एक उडी मारली व त्या ठिकाणी दगड ठेवला. व या दोन दगडातील अंतर न्यूटन दोराच्या साह्याने मोजू लागले. त्यावेळी न्यूटनचे मामा विल्यम आयस्काॅफ त्या ठिकाणी आले.
विल्यम आयस्कॉफ हे केब्रिज मध्ये ट्रीनटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी हा न्यूटनचा वाऱ्याची गती मोजण्याचा प्रयत्न बघून त्यांना न्यूटनच्या बुद्धी बद्दल कल्पना आली व त्यांनी न्यूटनला ट्रिनिटी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिले.
न्यूटनचे कार्य:
न्यूटन यांनी 1665 मध्ये बीएची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1666 मध्ये न्यूटन यांनी बिनोमियल प्रमेय चा शोध लावला. परंतु याच दरम्यान संपूर्ण जगभरात प्लेगची साथ पसरली या कारणाने न्यूटनला आपले कॉलेज सोडून घरी परत यावे लागले.
एके दिवशी न्यूटन आपल्या बागेत बसून काहीतरी विचार करत होते त्या दरम्यान झाडावरून एक फळ थेट खाली पडले. त्या फळाला हातात धरून न्यूटन विचार करू लागले की, फळ खालीच का पडले? ते वर आकाशात का गेले नाही?
त्यांनी या गोष्टीबद्दल अनेक लोकांना विचारले. काही लोकांनी यावर सांगितले की आपल्या पृथ्वीवर अशी काही शक्ती आहे जी फळाला खाली खेचते. लोकांच्या या उत्तराने न्यूटनला समाधान झाले नाही. ते फळ खालीच का पडले याचा शोध घेऊ लागले.
दीर्घ काळानंतर न्यूटन ने सूर्याच्या चारही बाजूला फिरणाऱ्या ग्रहांच्या संबंधात गुरुत्वाकर्षणाचा नियम प्रतिपादित केला. न्यूटन ने सांगितले की, समुद्रात येणाऱ्या लाटा, पृथ्वीभोवती फिरणारे ग्रह, चंद्र ,सूर्य सर्व एका शक्तीच्या कार्याने काम करतात. न्यूटन या शक्तीला गुरुत्वाकर्षण असे नाव दिले.
यानंतर न्यूटने अनेक वर्ष या गोष्टीवर अभ्यास केला, शेवटी 1684 मध्ये त्यांनी गुरुत्वाकर्षण बला बद्दल आणि पुरावे उपलब्ध करून दिले. त्यांच्या या पुरावा ला लक्षात घेऊन 1705 मध्ये न्यूटन यांना सर ही पदवी देण्यात आली.
पुढे न्यूटन यांनी फिलॉसॉफी नेचुरल प्रिन्सिपिया मॅथेमॅटिक या नावाचे स्वतःचे एक पुस्तक काढले. त्यांचे हे पुस्तक अनेक भाषांमध्ये प्रसारित करण्यात आले. न्यूटन ने लावलेल्या गुरुत्वाकर्षण बला च्या शोधामुळे न्यूटन चे नाव संपूर्ण जगभरात प्रसारित झाले.
न्यूटनचे गतीविषयक नियम:
न्यूटन यांनी त्यांच्या शोधात गतीविषयक तीन नियम यांचा अभ्यास केला. त्यामुळे न्यूटनचे तीन नियम प्रसिद्ध आहे.
पहिला नियम ( Newton First Law ) :
न्यूटनचा पहिल्या नियमा वरून असे लक्षात येते की, कुठल्याही शरीरावर बाह्य अस्थिर बल जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत ते शरीर समान गतीत कार्यरत राहते. न्यूटनचा पहिला नियम आला “जडत्वाचा नियम” असे म्हणतात.
दुसरा नियम ( Newton Second Law ) :
न्यूटनचा दुसरा नियम असे सांगतो की, संवेगाचा परिवर्तन दर हा प्रयुक्त बलाशी समानुपती असून संवेगाचे परिवर्तन बदलाच्या दिशेने होते.
तिसरा नियम ( Newton Third Law ) :
न्यूटनचा तिसरा नियम हा गुरुत्वाकर्षण बला बद्दल सांगतो.
प्रकारे न्यूटन या शास्त्रज्ञाने आपल्या जगाला नवीन शोध प्राप्त करून दिले. त्यांच्या शोधानंतर सण 1727 मध्ये न्यूटन आजारी पडले. व 20 मार्च 1727 मध्ये आयझॅक न्यूटन चा मृत्यू झाला.
सर आयझॅक न्यूटन हे जरी आज आपल्यासोबत नसले, तरी त्यांचे सर्व शोध आजवर अजरामर आहेत. आयझॅक न्यूटन यांचे प्रकाश संबधित नियम, गुरुत्व आकर्षणाचे नियम आणि गणिती शोध या मुळे न्यूटन जगभरात ओळखले जातात.
आपल्या आयष्यातील सर्व वेळ हा शोधांसाठी लावणारे महान शास्त्रज्ञ न्यूटन यांना जगभरातील सर्व श्रेष्ठ शास्त्रज्ञान पैकी एक स्थान देण्यात आले आहे. असे हे सर्वव्यापी ठरलेले शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन हे माझे आवडते शास्त्रज्ञ आहेत.
तर मित्रांनो ! ” माझा आवडता शास्त्रज्ञ मराठी निबंध ( My Favourite Scientist Essay in Marathi )” वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
” माझा आवडता शास्त्रज्ञ मराठी निबंध । My Favourite Scientist Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिली असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- शब्द हरवले तर मराठी निबंध
- पोलीस मराठी निबंध
- माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध
- माझी सहल वर मराठी निबंध
- रात्र नसती तर मराठी निबंध
धन्यवाद मित्रांनो !