ममते शिवाय समता नाही मराठी निबंध । Mamte Shivay Samta Nahi Marathi Nibandh

ममते शिवाय समता नाही मराठी निबंध । Mamte Shivay Samta Nahi Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” ममते शिवाय समता नाही “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्वच निबंध अथवा माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

ममते शिवाय समता नाही मराठी निबंध । Mamte Shivay Samta Nahi Marathi Nibandh

” भारत माझा देश आहे, या देशातील सर्व नागरिक माझे बांधव आहेत “. या वाक्याने भारत देशाच्या प्रतिज्ञेनेला सुरुवात होते. आणि शाळे मध्ये रोज ही प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली जाते.

कारण विद्यार्थी मुले ही भविष्याची एक पिढी असून आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. या प्रतिज्ञेतून सर्वजण समान आहेत, सर्व जाती- धर्म एक आहेत असा संदेश मिळतो हे खरे. पण ही प्रतिज्ञेनुसार आपण कितपत वागतो याचा विचार करायला पाहिजे ? प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारले पाहिजे की, आपण जे वागतो ते योग्य का अयोग्य आहे ?

आपला भारत देश हा विविध धर्मांचा, जातींचा आणि पंथांचा मिळून बनलेला आहे. जेव्हा बाहेरच्या देशातील लोक आपल्या भारतीय संस्कृतीला नटतात तेव्हा आपल्याला भारताच्या विविधतेचा आणि संस्कृतीचा अभिमान वाटतो.

पण काही वेळेला आपण आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध वागतो, आपल्या देशाला लाजविणारे कृत्य करतो. माझी जात, धर्म श्रेष्ठ आहे, इतर लोक कनिष्ठ आसे काहींना वाटत असते.

तर आजच्या काळातील काही लोकांना इतरांचा स्पर्श, इतरांची सावलीही आपल्या अंगावर किंवा घरावर पडलेली आवडत नाही. आपण तर म्हणतो भारतातील सर्व नागरिक हे माझे बांधव आहेत. मग हे असे कृत्य का घडते ? यामागचे कारण काय असावे ?

खरे तर समाजामधील सर्व जीवन सुव्यवस्थित चालावे, म्हणून आपल्याच पूर्वजांनी कामांची विभागणी केली. कोण सुताराचे काम करू लागले तर कोण लोहार, कुंभार, शिंपी, कोळी अश्या प्रकारची कामे करू लागले आणि यावरून आपण वेगवेगळ्या जाती मानू लागलो.

पण जसजसा काळ ओलांडू लागला ह्या जाती- धर्माने भयंकर रूप धारण केले. मग त्यांतूनच समाजातील श्रेष्ठता- कनिष्ठता ठरू लागली. आणि हीच जाती व्यवस्था समाजातील विषमतेचे मूळ कारण आहे.

कामाची विभागणी ही आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली एक प्रकारची सोय आहे. मग काम करणारा प्रत्येक व्यक्ती समान असला पाहिजे. यामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. कोणतेही काम हे कधीच कमी दर्जाचे समजले जात नाही. कुठलेच काम हालक्या प्रतीचे मानले जात नाही. काम म्हणजे जीवन चालविण्याचे एक उपयुक्त साधन आहे.

मग असे काम करून, कष्ट करून आपल्या जीवनाला सुखी करण्याच्या मागे धडपडणाऱ्या लोकांना कनिष्ठ मानणे ही चूक आहे. आणि हे सर्व लक्षात घेऊन आपल्या संविधानाच्या घटनेने सर्वांना समान हक्क दिले आहेत.

देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या विकासाची समान संधी आहे. त्यामध्ये जाती- धर्म कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू शकत नाही.

आजही आपल्या समाजामध्ये जाती, धर्म, पंथ, वर्ग यांवरून समाजात अनेक विषमता केली जाते. त्याप्रमाणेच तशीच विषमता, तसाच भेदभाव काही वेळेला आर्थिक स्थितीवरूनही केला जातो.

समाजातील धनि लोक श्रीमंत लोक स्वतःला श्रेष्ठ आणि उच्च दर्जाचे समजतात. गरीब लोकांना गरीब समाजाला कनिष्ठ समजतात. त्यामुळे आपल्या समाजात गरिबी आणि श्रीमंती अशी विषमता निर्माण झाली आहे.

मालक नोकरांना तुच्छ लेखतात त्यांच्यावर गुलामा प्रमाणे आजही अत्याचार करतात. सावकार लोक शेतकऱ्यांना कर्ज देतात. कर्जाची परतफेड केली नसेल तर आत्महत्या करण्यासाठी भाग पाडतात. अशा प्रकारचे वर्तन समाजाची निकोप वाढ आणि समाजात होणाऱ्या अत्याचाराला वाढीव ठरतो.

त्याप्रमाणे आपल्या भारतीय संविधानाने स्त्री- पुरुषांना समान हक्क दिला आहे. तरी सुद्धा आपल्या समाजात स्त्री-पुरुष असा भेदभाव बघायला मिळतो.

स्त्रीला ” पायातली वाहण ” समजले जाते. हे बाब सुद्धा आपल्या समाजाला लाजिरावणी आहे. आणि ही स्त्री- पुरुष विषमता आपल्या समाजाला लागलेली एक प्रकारची कीड आहे.

त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही विषमता आपल्या समाज विकासाला घातक आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवून आपल्या समाजात परिवर्तन कसे घडून येईला याचा विचार केला पाहिजे.

आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा आपला भाऊ- बहीण. समजून त्यांच्या सोबत नीट समानतेची वागणूक दिली पाहिजे. आणि ” ममते शिवाय समता नाही “ हे वाक्य खरे करून दाखवने हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment