माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi

माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो! आपले…… या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi “ घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi

सहल म्हणजे की कोणाला आवडत नाही ?बाहेर फिरायला सुंदर ठिकाणं बघायला सर्वांनाच आवडते. लहान मुलांना तर सहज म्हटलं की खूप आनंद होतो. मलाही सहलीला जायला खूप आवडते.

दरवर्षी आमच्या शाळेसची सहल जाते. सहलीला जाण्यासाठी आम्ही सर्व मुले खूप उत्सुक असतो. कारण अभ्यास करून कंटाळा आलेल्या अवस्थे मध्ये सहल म्हटले की, मनामध्ये एक रोमांच निर्माण होतो.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही आमची सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीला जायच्या एक आठवडा अगोदर आमच्या शिक्षकांनी वर्गात येऊन सोडली बद्दल आम्हाला सांगितलं.

सहलीचा विषय ऐकताच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झाला. त्याबरोबरच सहलीला जायचे ठिकाण होते ,शिवछत्रपती महाराजांचे जन्मस्थान ” शिवनेरी किल्ला “. सहलीला जायचे ठिकाण शिवनेरी किल्ला ऐकताच आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता आमची सहल जाणार आहे सांगितल्या पासून

वर्गात सहलीची चर्चा चालू झाली. वर्गात सारांच्या शिकवण्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते सगळेजण फक्त सहीली ची चर्चा करीत होते.

सहलीला गेल्याने फक्त माज्ज्या करायची असे प्रत्येकाने ठरवले होते. त्याचप्रमाणे मी सुद्धा ठरवलं की, सहलीला जाऊन खूप खेळायचे, मज्जा करायची आणि तेथील निसर्गाचा आनंद घ्यायचा. व मी घरी जाऊन सहल जाणार आहे हे घरी अाई बाबांना सांगितले , आई बाबांनी सहलीला जायला परवानगी सुध्दा दिली.

सहलीला जाण्याची तारीख :

सहलीच्या चर्चेमध्ये आमचे एकामागून एक दिवस जाऊ लागले, आखेेर सहलीला जाण्याची तारीख ठरली व सरांनी वर्गात येऊन सर्वांना सूचना दिली. सरांच्यया सुुुुचने नुसार आम्हाला कळलं की सहलीला जाण्याची तारीख 23 जानेवारी ठरली आहे. सहलीला जायचे सर्व पूर्वतयारी मी करून ठेवली होती. शेवटी सहलीला जायाचा तो दिवस उजाडला.

शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे सर्व मुले आठ वाजता शाळेवर जमली. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. शाळेच्या आवारात दोन बसेस येऊन थांबल्या होत्या आणि पालकांची गर्दी सुद्धा होती. सर्व पालक आपल्या मुलांना सोडायला शाळेच्या आवारात उपस्थित होते. मला सोडायला माझे आई बाबा सुद्धा आले होते.

सूचना आणि नियम :

सर्व विद्यार्थी बस मध्ये बसायचे अगोदर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलवून, काही सूचना आणि नियम सांगितले. आमच्या शिक्षकांनी आम्हा सर्वांना शिस्तीचेचे पालन करायला सांगितलं होतं. तसचं आमच्या शाळेचे नाव खराब होणार नाही असं कुठले गैरवर्तन न करण्यास सांगितलं होतं. आमच्या सोबत शाळेचे दोन शिक्षक ,दोन शिपाई आणि दोन मॅडम पण आल्या होत्या.

ठीक नऊ वाजता आमची बस शिवनेरी किल्ल्या कडे जाण्यास रवाना झाली. आम्ही सर्व विद्यार्थ्यां “गणपती बाप्पा मोरया” म्हणत शिवनेरी किल्ल्या कडे रवाना झालो. सुमारे सहा तासाचा तो प्रवास करताना आम्ही बस मध्ये बसून गाणी, डांस , जोक्स असे कार्यक्रम करत निघालो.

शिवनेरी किल्ला :

सहा तासांच्या प्रवासानंतर अखेर आम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. पुण्याजवळील जुन्नर गावांमध्ये वसलेला हा शिवनेरी किल्ला मी पहिल्यांदाच पाहत होतो.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा किल्ला पाहून मला खूप आनंद झाला. मी “जय शिवाजी महाराज” अासे म्हणून किल्ला चढण्यास सुरुवात केली. शिवनेरी किल्ला ची समुद्र सपाटी पासूनची उंची सुमारे साडेतीन हजार किलोमीटर एवढी आहे.

या किल्ल्यावर आम्हाला शिवकालीन इतिहास कळणार होता या उत्सुकतेने आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. शिवनेरी किल्ला चढताना सात दरवाजातून प्रवेश करावा लागतो. शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंचा आणि शिवरायांचा पुतळा बघायला मिळाला. 19 फेब्रुवरी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म याच शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.

किल्ला फिरत असताना आम्हाला शिवाजी महाराज ज्या ठिकाणी जन्मले ती इमारत बघून खूप आनंद झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर पाहायला मिळाले. संपूर्ण किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही जुन्नर येथून 105 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे शहरा कडे गेलो.

राजीव गांधी पार्क( Rajiv Gandhi Zoological Park ) :

शिवनेरी किल्ला बगून झाल्यानंतर आम्ही पुणे येथील राजीव गांधी जूलॉजिकल पार्क याठिकाणी गेलो.

त्या प्राणिसंग्रहालयातील विविध प्राणी बघ बघून आम्हाला खूप आनंद झाला. कधी न पाहिलेले नवीन नवीन प्राणी पाहायला मिळाले. तसेच आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ बघायला मिळाला.

विविध पक्षांच्या सुंदर रूप पाहून मी मंत्रमुग्ध झालो. तसेच महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तेथे बघायला मिळाला. आमच्या शिक्षकांनी आम्हाला य प्राणिसंग्रहालयाची सर्व माहिती सांगितली.

संपूर्ण प्राणी संग्रहालय बघण्यासाठी आम्हाला चार तासाचा वेळ लागला. सगळे प्राणी बघून झाल्यानंतर व प्राणी संग्रहालय फिरवून झाल्यानंतर या प्राणी संग्रहालय मध्येच एका मोठ्या झाडाखाली आम्ही जेवण केले.

मला या प्राणी संग्रहालयामध्ये फिरायला खूप आवडले. मी सर्व प्राण्यांचे व पक्षाचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले. काही प्राण्यांना पक्षांना आम्ही खाण्यासाठी अन्न सुद्धा दिले.

माकडाच्या विविध प्रजाती मला प्राणीसंग्रालय मध्ये पाहायला मिळाल्या. प्राणिसंग्रहालयातील वातावरण हे अतिशय सुंदर आणि निसर्गदयी होते. मला प्राणीसंग्रालय आतून पुन्हा घरी येण्याची इच्छाच झाली नाही. प्राणीसंग्रालय मध्ये बसून सर्व प्राण्यांचे निरीक्षण करावे असे मला वारंवार वाटत होते.

शेवटी सरांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलून पुन्हा बस मध्ये बसण्यास सांगितले. संध्याकाळी चार वाजता च्या वेळी आम्ही पुन्हा गावाकडे निघालो. अशीही माझी दोन दिवसाची सहल अतिशय ऊल्हाददायक आणि मनाला प्रसन्न करणारी ठरली.

कारण या सहली तून शिवकालीन इतिबहसा सोबतच निसर्गातील सुंदर प्राणी आणि पक्षी सुद्धा बघायला मिळाले. प्राणी आणि पक्षी याचे ज्ञान मला या प्राणीसंग्रहालयात व या सहलीतून मिळाले. असंच नवनवीन गोष्टीचे ज्ञान मिळते म्हणून मला सहलीला जायला फार आवडते.

अशी ही ” माझी सहल “ माझ्या मनाला आनंददायी ठरली.

तर मित्रांनो ! ” माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi “वाचून आपण आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझी सहल वर मराठी निबंध | My Picnic Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉइंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

 

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment