शब्द हरवले तर मराठी निबंध | Shabd Harvale Tar Marathi Nibandh

शब्द हरवले तर मराठी निबंध | Shabd Harvale Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईट वर तुम्हाला विविध निबंध अथवा माहिती बघायला मिळेल.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” शब्द हरवले तर मराठी निबंध “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, वेबसाईट वरील सर्व निबंध आणि माहिती आपणास नक्कीच आवडेल.

शब्द हरवले तर मराठी निबंध | Shabd Harvale Tar Marathi Nibandh

आज माझा इयत्ता दहावीतला पहिला दिवस होता. नेहमी प्रमाणे मी शाळेला गेलो. शाळेचा पहिला तास सुरू झाला आणि सरांनी सर्वांना आपापला स्वतःचा परिचय देण्यास सांगितले.

त्यामध्ये सर्वांनी स्वतःचा परिचय दिला. पण आमच्या वर्गात एका अबोल मुलाने प्रवेश घेतला होता. तो हातवारे करून बोलण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याच्या त्या हातवाऱ्यांचा अर्थ लावणे आम्हा सगळ्यांना कठीण जात होते.

तेव्हा मला विचार आला की, खरंच ! ” हे शब्द हरवले तर… ? ” दिवसभर तोंडातून एक ही शब्द बाहेर न पडणे हे शिक्षाच म्हणायला हवी ! शब्दां शिवाय जगणे कठीण होते ना ?

जर हे शब्द हरवले तर आपले कसे होईल ? तेवढ्यात मी एकदम दचकून उभा झालो, पाहतो तर काय, सर्व शब्द माझ्या भोवती गोल- गोल फिरत होते. आणि मला म्हणत होते, आम्ही हरवलो तर तुमच्या मानव जातीचे कसे होणार ?

आपल्या सभोवताली असणारे पशु- पक्षी, इतर जीव जसे आम्हा शब्दां शिवाय गप्प आहेत त्याप्रमाणेच तुम्हा सर्व मनुष्यांना ही गप्पच राहावे लागेल. आम्ही सर्व शब्द हरवलो तर तुमच्या तोंडातून आवाज सुद्धा येणार नाही. आम्ही शब्द हरवल्यामुळे तुम्ही कोणी रडू शकणार नाही, ना कोणी ओरडू शकणार नाही.

कोणी कोणाच्या मनातल्या भावना एकमेकांना व्यक्त करू शकणार नाही. सगळे जण शांत राहणारा आवाज असणार म्हणजे तो फक्त वाहनांचाच सगळे रस्ते, बाजार, सभा इत्यादी ठिकाणांचा आवाज पूर्णता बंद होणार !

सगळे जण एकमेकांना फक्त खणाखुणाच करून बोलणार दूरदर्शन वर ही फक्त खणाखुणाच पाहाव्या लागतील. कविता, गायन, चित्रपट, नाटक हे सगळे पूर्णता मुके होऊन जातील. शब्दा शिवाय सारे जण गप्प होईल.

आजारी माणसांची, पाहुण्यांची विचारपूस करणे अवघड होईल. गप्पा मारणे, वाद घालणे सगळे थांबेल. आम्ही शब्द तुमच्या मनुष्य प्राण्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत आसतो. आम्हा शब्दांमुळे तुम्ही मानव जाती एकमेकांशी संवाद साधते. एकमेकांच्या आचार- विचारांची देवाण- घेवाण होते. शब्दांच्या साह्याने तुम्ही आपल्या भावना व्यक्त करू शकता.

तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्या पासून लांब असेल तर तुम्ही भ्रमणध्वनीच्या साह्याने आम्हा शब्दांचा वापर करून एकमेकांशी विचारपूस करता. मग जर शब्दच नसते तर आपण कसे बोललो असतो ?

हजार वर्षापूर्वीचा मानवाचा इतिहास हा शब्दांमुळे तर आज पर्यंत तसाच जिवंत राहिला आहे. शब्दांमुळे तर मानवाला आपल्या ज्ञानाचे, अनुभवाचे जतन करून ते ज्ञान पुढच्या पिढीला देणे शक्य झाले आहे.

इतर अनमोल रत्नांप्रमाणेच शब्द सुद्धा अनमोल रत्न आहे. लोकांची मने जिंकायची असतील, तर सभास्थानी मान मिळवायचा असेल, तर शब्दांची साथ- संगत हवीच हवी.

जगातील सर्व भाषांत लिहिल्या गेलेल्या थोर लेखक, कवींच्या साहित्यकृती आज या शब्दांमुळेच जिवंत आहेत. जर शब्द हरवले तर भगवद्गीता, रामायण, महाभारत असे महान ग्रंथांचा आस्वाद आपल्याला घेता आला नसता.

काही जण शब्दांचा वापर करून एकमेकांची मने दुखवतात. आम्हा शब्दांचा वापर करून नको ते बोलतात. घाणेरडे उच्चारण करून आमचा अपमान करतात.

त्यामुळे आम्हा शब्दांचा योग्य उपयोग करून घ्यावा. तुम्हाला वाटत असेल आम्ही शब्द हरवू नये तर आमचा छान उपयोग करा. आम्हा शब्दांचा वापर करून कुणाचीही मने दुखवू नका. तुम्ही असे वागलात तर आम्हांला तुमच्या सोबत राहायला नक्कीच आवडेल.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment