माझे आवडते फुल गुलाब मराठी निबंध । My Favourite Flower Rose Essay in Marathi

माझे आवडते फुल गुलाब मराठी निबंध । My Favourite Flower Rose Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडते फुल गुलाब मराठी निबंध | Maza Avadta photo Nibandh in Marathi ” या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझे आवडते फुल गुलाब मराठी निबंध । My Favourite Flower Rose Essay in Marathi

या संपूर्ण पृथ्वीवर मनाला मोहक करणारी आणि स्वतःकडे आकर्षित करणारी गोष्ट जी असेल ती म्हणजे फुल असते. त्यातल्या त्यात फुल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम गुलाब फुलाची प्रतिमा येते. कारण संपूर्ण पृथ्वीवर दिसायला सर्वात सुंदर, कोमल आणि रंगीबिरंगी सुंदर फुल जर कुठले असेल तर ते म्हणजे गुलाब!

My Favourite Flower Rose 

गुलाब फुल  दिसायला खूपच सुंदर असते. गुलाबाच्या रंगात आणि आकारामध्ये विविधता पाहायला मिळते. गुलाब फुलांचे सौंदर्य पाहून सर्वजण त्या फुलाकडे आकर्षित होतात म्हणूनच  या गुलाब फुलाला फुलांचा राजा म्हणून ओळखले जाते. हा फुलांचा राजा असलेले माझ्या आवडते फुल गुलाब आहे.

गुलाब फुलांचे विविध रंग पाहायला मिळतात परंतु त्यातील लाल कलरचा गूलाब मला खूप आवडतात. परंतु अलीकडे जैवविविधता मुळे गुलाबाला कलम करून त्याच्या रंगांमध्ये आणि आकारांमध्ये विभिन्नता केलेली दिसत आहे त्यामुळे गुलाबाचे विविध रंग पाहायला मिळतात. परंतु निसर्गीता गुलाबाला गुलाबी, लाल, पांढरा, पिवळा, केशरी असे रंग पाहायला मिळतात.

गुलाब हे खूप कोमल फुल आहे. गुलाबाला खूप पाकळ्या  असतात. गुलाबाचे फुल कळी अवस्थेमध्ये असताना गुलाबाच्या फुलाची सुंदरता एवढी दिसून येत नाही परंतु गुलाबाचे फुल जेव्हा खुलते  तेव्हा त्याची सुंदरता सर्वांना गुलाबाकडे आकर्षित करते. तसेच गुलाब फुलांचा सुगंध हासुद्धा मनमोहक असतो.

माझ्या घराशेजारी असलेल्या बगीच्यामध्ये केशरी, पांढरा, पिवळा, लाल, निळा, जांभळा अशा विविध रंगाची फुले पाहायला मिळतात. परंतु यातील लाल रंगाचा गुलाब हा मला खूपच आवडतो. मी रोज बागेतील काही गुलाबाचे फुले घरी आणतो आणि माझ्या वहीमध्ये त्यांच्या पाकळ्या साठवून ठेवतो.

गुलाबाच्या फुलाला एकमेकांच्या वर अशाप्रकारे जेमतेम दहा ते वीस पाकळ्या असतात. गुलाबाचे फुल जितके सुंदर असते तितके त्या झाडाला काटे सुद्धा असतात. त्यामुळे गुलाबाचे झाड काटेरी प्रकारामध्ये मोडते. गुलाबाच्या झाडाचे पाने हिरवी आणि टोकदार असतात.

गुलाबाचे झाड जर वारंवार कापले नाही तर गुलाबाचे झाड खूप उंच पर्यंत जाऊ शकते. जेवढे असेल तेवढे झाडाला फुले येतात. गुलाबाचे फुले आलेले झाड हे दिसायला खूपच सुंदर दिसते. असेच झाड मला नजरेस पडल्यास मी त्या झाडाला  एकटक पाहत बसतो कारण मला गुलाब फूल खूप आवडते व माझे आवडते फूल गुलाब आहे.

गुलाबाचे फुल दिसायला जेवढी सुंदर असते तेवढेच या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.  कुठलेही शुभ कार्य  किंवा लग्न समारंभ असेल तर गुलाब फूलाचा वापर केला जातो.  सजावटीच्या दृष्टीने गुलाब फुलाला खूपच मागणी आहे.

लग्नसमारंभात वर आणि वधू दोघांना हे गुलाबाच्या फुलांचे हार घातलेले असतात.  तसेच नवीन नवरा नवरी यांच्या हातामध्ये गुलाब गुच्छ दिलेला दिसतो. तसेच लग्नात सुगंधित वातावरण निर्मितीसाठी गुलाबजल  शिंपडडले जाते. तसेच आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देखील गुलाबाचेफुल आवडत असल्याचा उल्लेख आढळतो.

तसेच गुलाब फुलाला स्नेहाचे आणि प्रेमाचे प्रतीक समजले जाते. आदर सत्कार समारंभामध्ये गुलाब फूल देऊन  स्नेहभाव व्यक्त केला जातो.  स्त्रिया आणि मुली गुलाब फुलांचा वापर आपल्या केसांमध्ये लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात.

इतकेच नसून गुलाब फूलाचा वापर आयुर्वेदामध्ये देखील मोठ्या प्रमाणात केलेला पाहायला मिळतो. पंचकर्म करताना आणि विविध लेप बनवताना गुलाब जल चा वापर केला जातो. गुलाब हे अल्हाददायक आणि शीत असल्याने मानवी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी गुलाब उपयुक्त ठरते. बाजारपेठेमध्ये गुलाबाचे वाढती मागणी पाहून शेतकरी गुलाबाची शेती सुद्धा करत आहे.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये गुलाबाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. नैसर्गिक ला आली आणि गुलाबी प्राप्त करण्यासाठी बाजारपेठांमध्ये विविध क्रीम आणि पावडर मिळतात, त्यामध्ये गुलाबाचा हमखास वापर केलेला पाहायला मिळतो.

तसेच गुलाबाच्या पाकळ्या पासून बनवलेला गुलकंद हा खूप प्रसिद्ध आहे. बाजारामध्ये गुलकंद ला खूप मागणी आहे. तसेच गुलाब याचा वापर करून सरबतही बनविला जातो. काही ठिकाणी गुलाबांच्या  पाकळ्या चहामध्ये वापरल्या जातात. डोळ्यांचे विकार असल्यास गुलाब जल डोळ्याला लावल्यास आराम मिळतो. आसा  हा दिसायला सुंदर आणि उपयोगी असणारा माझे आवडते फूल गुलाब आहे.

तर मित्रांनो ! ” माझे आवडते फुल गुलाब मराठी निबंध । My Favourite Flower Rose Essay in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” माझा आवडता फूल गुलाब मराठी निबंध | Maza Avadte phool Nibandh in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment