माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध | Maza Avadta Chand Vachan Essay in Marathi

माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध | Maza Avadta Chand Vachan Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध | Maza Avadta Chand Vachan Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध | Maza Avadta Chand Vachan Essay in Marathi

जगभरामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींनी द्वारे वेगवेगळ्या छंदाची जोपासना केली जाते. प्रत्येकाचा आवडता छंद हा वेगवेगळा असू शकतो. त्याप्रमाणे माझा आवडता छंद म्हणजे वाचन आहे.

मला वाचायला खूप आवडते. वाचन हा माझा आवडता छंद आहे. वाचनाची आवड मला हे आत्तापासून असून नाही तर लहानपणापासूनच आहे. आजच्या जगात  ज्ञानाला सर्वात मोठी शक्ती समजली जाते.  म्हणूनच वाचनाचे महत्व देखील खुप आहे.  म्हणून मी‌ वाचनाची आवड जोपासली आहे. मला वाटते की, इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा वाचनातून ज्ञान मिळवीत असतो.

वाचन माणसाला कमी वेळेमध्ये  आणि कमी वयामध्ये खूप ज्ञान मिळवून देऊ शकते. नेहमीच वाचन केलेले बुद्धितीचा विकास हा खूप लवकर होतो. तसेच वाचनामुळे मानसिक विकास होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

आपल्या देशातील प्रत्येक महान आणि यशस्वी व्यक्तींचे चरित्र वाचले तर आपल्याला दिसून येईल की, या प्रत्येक व्यक्तीला वाचनाची खूप आवड होती. जर तुमचे वाचन अफाट असेल तर तुमच्याकडे सर्व प्रकारचे असू शकते. याच ज्ञानातून आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्यावर सहजपणे मात करू शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण असली तरी त्यावर उपाय शोधून त्यावर मात करण्याची ताकद वाचनातून मिळते.

मला लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड आहे तसेच माझ्या बाबांना देखील वाचनाची आवड आहे. कदाचित बाबांन मुळेच माझ्या मध्ये वाचण्याची आवड निर्माण झाली असावी.

ज्यावेळी बाबा वाचन करत असेल त्या वेळी मी बाबांच्या शेजारी जाऊन त्यांचे वाचन शांतपणे ऐकत होते. त्यातून मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळाले  व हळूहळू मीदेखील वाचनाला सुरुवात केली. आणि आज वाचन हा माझा आवडता छंद आहे.

माझ्यातील वाचनाची आवड माझ्या आई-बाबांना कळताच त्यांनी माझ्यासाठी नवनवीन पुस्तके, ग्रंथ, पेपर आणून दिले. तसेच गोष्टींची पुस्तके,‌ विविध महापुरुषांचे चरित्र हे देखील मी वाचायला सुरुवात केली आणि तेव्हापासून माझ्यामध्ये खऱ्या अर्थाने वाचनाची आवड निर्माण झाली.

प्रत्येक माणसामध्ये काही ना काही एक तरी असे वैशिष्ट्य असते आणि आपल्यातील हे वैशिष्ट्य  ओळखावे लागते. आणि प्रत्येक व्यक्ती मध्ये असा गुण असतो  तो आपल्याला खूप आवडत असतो त्याला आपण छंद म्हणू शकतो. साडी माझ्यातील असे वैशिष्ट्य किंवा छंद म्हणजे वाचन होय. मला वाचन करायला खूप आवडते.

लहानपणापासूनच मला विविध गोष्टी, कथा ऐकायला खूप आवडतात. माझी आजी मला रामायण, महाभारतातील कथा नेहमीच सांगत असे. त्यातून मला त्या गोष्टी अनेकदा वाचण्याची आवड निर्माण झाली. तसे पाहता मी सर्वच पुरातन काळातील ग्रंथ वाचले आहेत व अनेक पुस्तके सुद्धा वाचली आहेत.  मला फक्त कथा, गोष्टीच वाचायला आवडत नाही तर मला शाळेतील पुस्तके सुद्धा वाचायला खूप आवडतात.

शाळेत शिकवला जाणारा एखादा धडा मी अगोदरच वाचून ठेवीत असतो. तसेच मी नेहमी तेच पेपर देखिल वाचत असतो. पेपरातून मला खूप काही ज्ञान आणि नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. जगातील कोपऱ्यामध्ये काय चालू आहे हे मला पेपरातून कळते.

एवढे नसून जसे मी मोठे होत गेलो तसतसा माझ्यामध्ये वाचनाची आवड आणखी निर्माण झाली. त्यामुळे मी आमच्या घराशेजारी असलेल्या ग्रंथालयांमध्ये जाऊन तेथील ग्रंथ वाचू लागलो.

आतापर्यंत मी विविध कथा-कादंबऱ्या, इतिहासातील गोष्टी,  महान पुरुषांचे चरित्र, भूगोल, विज्ञान, कल्पनिक कथा, सत्य घटनेवर आधारित कथा, तेनालीरामाच्या कथा, बिरबल च्या कथा, रामायणातील कथा  वाचस्ल्या आहेत. आणि त्यातून मला जीवन जगण्यासाठी नवीन प्रेरणा देखील मिळाली आहे. त्यामुळे  मला वाटते की, वाचन हा छंद शतर छंदांन पेक्षा खूप चांगला आहे.

वाचनातून बुद्धीचा विकास लवकर होतो आणि आपल्याला विविध ज्ञान मिळते. एखाद्या क्षेत्रातील ज्ञान आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला त्या क्षेत्रातील पुस्तके वाचली पाहिजेत. त्यामुळे एखाद्या विषयावर तर तुम्हाला भरपूर ज्ञान असेल तर त्या क्षेत्रात तुमचे बाजारावरील कोणीही करू शकत नाही. परंतु असे भरमसाठ ज्ञान पाहिजे असेल तर आपणाला वाचनाची आवड असलीच पाहिजे.

वाचन आसा छंद आहे. जो कुठल्याही व्यक्तीला कुठल्या ही क्षेत्रांमध्ये कधीही मागे पढू  देऊ शकत नाही. त्यातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात तसेच वाचन ज्ञानाचा भांडार आहे त्यातून आपल्याला भविष्यात उपयोगी पडणाऱ्या सर्व गोष्टी मिळू शकतात.

वाचन‌ माणसाला विचार करायला लावते.वाचनातून  बुद्धीचा, मनाचा तसेच मानसिक विकास देखील होतो. वाचनामुळे चांगले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मदत होते. तसेच विविध समस्यांवर मात करण्याचे ज्ञान, धाडस  आपल्याला वाचनातून मिळते.

त्यामुळे मला वाटते की वाचन हा सर्व चंदन पेक्षा खूपच चांगला छंद आहे. व माझा आवडता छंद वाचन आहे. म्हणून इंग्रजी मध्ये एक म्हण आहे ” रिडींग मेक्स मॅन परफेक्ट ( Reading Makes Man Perfect )” त्यामुळे आपल्या जीवनामध्ये वाचनाला महत्त्वाचे स्थान आहे. या लोकांचा वाचनाचा छंद आहे त्यांनी तो जोपासलाच पाहिजे.

तर मित्रांनो ! ” माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध | Maza Avadta Chand in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध | Maza Avadta Chand in Marathi” त्यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट चालले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment