आरसा नसता तर मराठी निबंध | Arasa Nasta Tar Nibandh in Marathi
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.
आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” आरसा नसता तर मराठी निबंध | Arasa Nasta tr Nibandh in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.
आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
आरसा नसता तर मराठी निबंध | Aarsa Nasta Tar Nibandh in Marathi
आपल्या जीवनामध्ये आपण कित्येक अशा वस्तू वापरतो ज्या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. या सर्व गोष्टींमधील एक महत्त्वाच्या आणि अनिवार्य वस्तू म्हणजे ” आरसा “ होय.
घरातून बाहेर पडताना लहानापासून तेते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आरशात पहिल्या शिवाय बाहेर जात नाही. विशेषता आरशाचे आवड ही मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये पाहायला मिळते ऑफिसमध्ये कामाला जाणार कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली यांच्या पर्समध्ये आरसा हमखास पाहायला मिळतात.
रस्त्यावरून जाणारा एखादा युवक एखाद्या मोटारसायकलच्या अरसात डोकावून आपले केस व्यवस्थित करताना ब-याच वेळा पाहायला मिळतो. सांगण्याचा हेतु एवढाच की, प्रत्येकाला आपली छबी वारंवार पाहण्याची खूप हौस असते आणि हौस पुरवण्याचे काम आरसा करतो.
आरसा निर्माण झाला नसता तर मराठी निबंध
मग जर हा आरसा निर्माण झाला नसता तर…? आरसा नसता तर माणसाची मोठी गैरसोय झाली असती. माणूस स्वतःचे रंग रूप ओळखू शकला नसता. त्यामुळे आपण कसे दिसतो हे कोणालाही माहिती नसले असते. त्यामुळे स्वतःचे तोंड ओळख कोणालाही पटली नसती.
आपल्या चेहऱ्यावर कुठला भाव आहे याची ओळख आरसा करून देतो. एखाद्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले तर त्या विद्यार्थीच्या चेहऱ्यावर आनंदाचा असणारा भाव आरशात सांगतो. जर एखादा विद्यार्थी परीक्षा मध्ये नापास झाला असेल तर त्याच्या चेहऱ्यावरचा भाव हा आज त्याला दाखवून देतो.
आपल्या जवळच्या मित्राची काही वर्षानंतर झालेली भेट आरसा खुलतो आणि एखादा दुःखद प्रसंगी सगळ्यांच्या नजरा चुकवून आपल्या डोळ्यातून गळालेले अश्रु हे अरसाच टिपीत असतो.
त्यामुळे आरसा हा माणसाचा खूप जवळचा मित्र आहे. एवढेच नसून आरसा हा स्वतःला आपण काय आहे हे दर्शवतो.एखाद्या व्यक्तीला विचारल्यास एखादा व्यक्ती खोटे सांगू शकतो परंतु आजचा हा कधीही खोटे सांगत नाही आपण जे आहोत तेच प्रतिमा आपल्याला दाखवित असतो.
आरशाला संस्कृत मध्ये आदर्श असे म्हणतात. आपले रूप जे आहे तेच आरसा आपल्याला दिखवितो. आपण दिसायला सुंदर असेल तर आरसा आपल्याला सुंदर दाखवतो. जर आपण कुरूप असेल तर आरसा कुरूपच दाखवतो. म्हणजेच आरसा हा प्रामाणिक आदर्श आहे.
आरसा नसता तर सुंदर आणि कुरूप असा भेदभाव राहिलाच नसता. सर्वजण एकमेकांना सामानच समजले असते. एक प्रकारे आरसा नसता तर चांगले झाले असते परंतु नित्यनेमाने आपल्या चेहराचे दर्शन करून बाहेर पडणाऱ्या लोकांचे काय झाले असते?
आरसा नसता तर माणसाने आपली छबी कोठे पाहिले असती. एखादा मुलाखतीला जाताना, एखाद्या समारंभ जाताना, लग्न सण उत्सव अशा कार्यक्रमांमध्ये महिला, पुरुष नटतात व आपण कसे दिसत आहोत याची छबी आरसांमध्ये पाहत असतात.
जर आरसा नसता तर आपण कसे दिसत आहोत हे आपण कुठे पाहिले असते. एवढेच नसून आपण आपल्याला आपली छबी कशी आहे याची जाणीव देखील झाली नसती.
एवढेच नसून आरसा आहे केस कात्रालय, फोटो स्टुडिओ, एखादे मॉल अशा ठिकाणी महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. आरसा नसता तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम हे अपूर्णच राहिली असते. अनेक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये देखील आज त्याला महत्वाचे स्थान आहेत.
अनेक प्रयोग देखील आरसाच्या साह्याने केले जातात. आरसा नसेल तर मग हे प्रयोग अपूर्णच राहिले असते. अंतर्गोल भिंग आणि बाह्यगोल भिंग असलेले अरसे माणसांना हसवतात. गावातील जत्रांमध्ये अशा आरसांचे महत्त्वाचे स्थान असते. मग आरसा नसेल तर ही सारी गंमत हरवूनच जाईल. त्यामुळे असा बहुउपयोगी असलेला आरसा आपल्याला हवा हवा असाच आहे.
तर मित्रांनो ! ” आरसा नसता तर मराठी निबंध | Arasa Nasta tar Nibandh in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
” आरसा नसता तर मराठी निबंध | Arasa Nasta tar Nibandh in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
- मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
- मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी
- मी नगरपालिकेचा अध्यक्ष झालो तर मराठी निबंध
- पाऊस पडला नाही तर निबंध मराठी
धन्यवाद मित्रांनो !