मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध । Mi Pahilela Killa Essay in Marathi

मी पाहिलेला किल्ला  मराठी निबंध | Mi Pahilela Killa Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी पाहिलेला  किल्ला मराठी निबंध | Mi Pahilela Killa Essay in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मी पाहिलेला  किल्ला मराठी निबंध | Mi Pahilela Killa Essay in Marathi

आपल्या भारत देशामध्ये  कित्येक वर्षापासून इतिहासाची साक्ष देत उभे राहिलेले अनेक किल्ले पाहायला मिळतात. यांतील रायगड, सिंधुदुर्ग शिवनेरी, प्रतापगड राजगड हे किल्ले खूपच प्रसिद्ध आहेत.

प्रत्येक इतिहास सोबत शिवकालीन इतिहास जोडलेला आहे ते शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करण्यासाठी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवकालीन इतिहासाचा अभिमान मांडला जाणारा किल्ला म्हणजे रायगड किल्ला होय.

भारत देशामध्ये आणि किल्ले आहेत  परंतु त्यातही मी पाहिलेला महाराष्ट्र राज्यातील केला म्हणजे रायगड किल्ला होय. सुमारे तीनशे वर्षापूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला ओळखले जात होते. याच किल्ल्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले आणि येथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी एका वरिष्ठ शासकांची खाती मिळाली. कित्येक वर्षापासून उभा असणारा हा किल्ले खरोखरच एक अद्भुत आणि प्रख्यात किल्ला आहे.

मी महाराष्ट्र राज्यातील बरेच किल्ले पाहिले पण त्यातील मला अजूनही आठवण असलेला  किल्ला हा रायगड किल्लाच आहे. पर्यटकांसाठी हा किल्ला खूप प्रसिद्ध समजला जातो.

मी पाहिलेला किल्ला म्हणजे रायगड किल्ला हा मी शाळेमध्ये असताना एका सहली द्वारे पाहिला होता. आम्ही पुण्यावरून एसटी बस ने रायगड किल्ला गाठला. हा किल्ला म्हणजे निसर्गरम्य आणि डोंगराळ परिसर आहे.

रायगड किल्ल्याच्या चारही बाजूने पर्वते आहेत. किल्ल्याच्या जवळपास काही गावे सुद्धा बसलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या किल्ल्याचा आसपासचा परिसर बघण्यासारखा  होता. सगळीकडे हिरवळ होती.

हिरव्या घनदाट झाडांमुळे आम्ही जंगलामध्ये आल्यासारखे वाटले. मला छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व खूप आवडते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन काळातील महत्त्वपूर्ण भाग असणारा हा किल्ला पाहण्यासाठी मी अधिकच आतुर होतो.

जेव्हा मी रायगड किल्ल्यावर पोहोचलो तेव्हा माझ्या आनंदाची सीमा राहिली नाही‌. नजरेसमोर कळ्या दगडाने एक भव्य पण थोडी तुटलेली इमारत उभी दिसली.

महाराष्ट्र शासनाने काही वर्षापूर्वी रायगड किल्ल्याची दुरुस्ती केलेली होती त्यामुळे रायगड किल्ल्याचे दृश्य अद्यापही इतिहासाप्रमाणे चांगलेच आहे. एवढेच नसून गडांची देखरेख करण्यासाठी गडावर कायमस्वरूपी चे एक कार्यालय  होते.

आम्ही ज्यावेळी रायगड किल्ल्यावर गेलो होतो त्यावेळी तेथे अनेक परदेशी पर्यटक सुद्धा किल्ला पाहण्यासाठी आले होते. रायगड किल्ल्याचा गेटमधून मी आत गेलो गडामध्ये शिरताच समोर मला एक मोठा हाॅल दिसला. आमच्या मार्गदर्शकाने सांगितले की, इतिहासात हा हॉल शिवाजी महाराजांचे दरबार असायचे.

हॉल जवळ येत शेजारी तोफांचे घर होते यामध्ये विविध तोफा ठेवलेला होता. तसेच हॉलच्या आजूबाजूला मोठमोठ्या खोल्या सुद्धा होत्या. असे म्हटले जाते की, शिवाजी महाराजांच्या दरबारात काम करणारे सर्व मंत्री वगैरे या खोल्यांमध्ये राहत होते.

हाॅल बघून झाल्यानंतर पुढे पुढे चालत गेल्यानंतर  तेथे गवताचे मैदान दिसले.  शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मैदानामध्ये एक मोठी बाग होती असे समजले जाते. तेथे जवळ विविध खोल्या होत्या‌. या खोल्या शिवाजी महाराजांच्या महलाचा भाग समजला जातात.

रायगड किल्ल्याचे जुन्या दगडाने केलेले बांधकाम हे प्राचीन भव्य त्याचे दर्शन घडते. रायगड किल्ल्याचे दृश्य पाहून मला मी शिवाजी महाराजांच्या काळात पोहोचल्या सारखेच वाटले.

संपूर्ण रायगड किल्ला पाहायला मला दोन ते तीन तासाचा वेळ लागला.

रायगड किल्ला बऱ्याच उंचीवर स्थिर असा किल्ला आजही आपल्याला पाहायला मिळतो. रायगड किल्ल्याचे आजही ऐतिहासिक  स्थळ म्हणून जतन आणि संवर्धन केले जाते. जरी काळाच्या ओघात रायगड किल्ल्याचा बाराचा भाग कोसळला असला तरी रायगड किल्ला आज ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्ष म्हणून उभा आहे.

असा हा मी पाहिलेला किल्ला म्हणजेच रायगड किल्ला निसर्गरम्य, पर्यटकांसाठी प्रसिद्ध ठिकाण आणि ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा किल्ला समजला जातो.

तर मित्रांनो ! ” मी पाहिलेला किल्ला  मराठी निबंध | Mi Pahilela Killa Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

या निबंध मध्ये आमच्याकडून काही पॉईंट ( Points ) राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment