मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

आजचे जग हे आधुनिक जग म्हणून ओळखले जाते आणि या आधुनिक जगाचा घटक म्हणजे मोबाईल होय. आज मोबाईल सर्वांचे गरज बनला आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आपल्याला मोबाईल पहायला मिळतो. त्यामुळे मोबाईल  शिवाय संपूर्ण जग अपूर्णच आहे. मानवाने लावलेल्या सर्व सुविधांपैकी मोबाईलचा शोध महत्त्वाचे साधन बनला आहे.

आज 21 व्या शतकामध्ये सर्व मनुष्य मोबाईल शिवाय जगणे अशक्यच आहेत. आजच्या काळातील दिवसाची सुरुवात ही सुद्धा मोबाईलच्या  अलार्म पासूनच होते. आजची पिढी मोबाईल इतके हवी गेली आहे की कुठलेही कार्य करण्यासाठी मोबाईलच लागतो.

व्यवसाय नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्या सहवासामध्ये सहजरीत्या राहणे हे मोबाईल मुळे शक्य झाले आहे. जगात कुठल्याही कोपऱ्यामध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकांना बोलणे, बघणे मोबाईल मुले अतिशय सोपे झाले आहे.

आजच्या तरुणांमध्ये तर मोबाईल चे चलन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल हा आजच्या तरुणांचा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

बाजारपेठेत सुद्धा मोबाईलची वेगवेगळी विशेषता आणि मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुण पिढी मध्ये मोबाईल चे वेगवेगळे मॉडेल घेण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मोबाईल मुळे सर्व गोष्टी सहजरीत्या करणे सोपे झाले आहे. मोबाईल मुळे आपले जीवन सोपे बनले आहे. मोबाईल मुळे आपण आपल्या नातेवाईकांशी  बोलणे व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून पहाणे शक्य झाले आहे.

मोबाईल मध्ये रेडिओ mp3 यांसारखे फंक्शन असतात ज्याच्या मदतीने आपण वेगवेगळी गाणे ऐकू शकतो. तसेच मोबाईल मध्ये कॅल्क्युलेशन चे देखील ऑप्शन असते ज्यामुळे आपण कुठेही कुठल्याही प्रकारचा हिशोब करू शकतो. जास्त लोक मोबाईल मध्ये युट्युब च्या मदतीने व्हिडिओ, मनोरंजनाचे कार्यक्रम, सिनेमा  पाहणे पसंत करतात.

त्यामुळे मोबाईल मध्ये संपूर्ण जग सामावून गेले आहे. एवढेच नसून मोबाईल मध्ये कॅमेरा चे फंक्शन असते ज्याच्या मदतीने आपण एखाद्या चा फोटो किंवा एखाद्या ठिकाणाचा फोटो काढणे शक्य झाली आहे. एवढेच नसून आपण मोबाईल मधील सेल्फी या आधारे  स्वतः चा फोटो  स्वतः काढून शकतो.

तसेच मोबाईल मध्ये विविध प्रकारच्या ॲप उपलब्ध असतात ज्याच्या मदतीने आपण घरबसल्या ऑनलाईन खरेदी करू शकतो. मोबाईल च्या मदतीने घरबसल्या आपल्याला ट्रांजेक्शन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पैसे पाठवणे किंवा पैसे काढणे यासाठी आपल्या बँकेच्या रांगेत उभा राहण्याची गरज आता भासत नाही.

मोबाईलचे खूप सारे फायदे आहेत. जर कोणाला तात्काळ मदत हवी असेल तर एमर्जन्सी नंबराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जसे की, पोलीस, ॲम्बुलन्स त्यांना फोन करून मदतीसाठी  तत्काळ बोलता येते.

सध्याचे जग हे सोशल मीडियाचे जग समजले जाते. दररोज लाखो लोक आपले फोटोज किंवा इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर टाकत असतात. अशा प्रकारचे सोशल मीडिया चे ॲप्स म्हणजे फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर यांच्या माध्यमातून जगभरातील लोक एकमेकांना जोडले जातात.

अशा सोशल मीडिया एप्स मध्ये काही जण फोटो पोस्ट करतात काहीजण त्या फोटोला कमेंट करून एकमेकांशी जोडले जातात. इतकेच नसून मोबाइलमुळे रेल्वेचे तिकीट बुक करणे, बसचे तिकीट बुक करणे, हॉटेलचे तिकीट बुक करणे इत्यादी गोष्टी घरबसल्या करणे शक्य झाले आहे.

जसे की नाण्याच्या दोन बाजू असतात. त्या प्रमाणे मोबाईलच्या देखील दोन बाजू आहेत. मोबाईलचे जितके फायदे आहेत तितके त्याचे परिणाम सुद्धा आहेत. मोबाईल जेवढा आपल्यासाठी फायदेमंद ठरू शकतो तितके त्याचे परिणाम सुद्धा होऊ शकतात.

आज माझ्या काळामध्ये मोबाईल हे एक फायदेशीर साधन न राहता ते एक व्यसन बनत चालले आहे. मोबाईलच्या माध्यमातून  ब्लॅकमेलिंग करणे, विविध अफवा पसरवणे यांसारखे प्रमाण वाढत चालले आहे. मोबाईल मुळे सर्व व्यक्ती व्यस्त झाले आहेत घरातील कुटुंबातील सर्वजण मोबाईल घेऊन बसतात त्यामुळे एकमेकांशी बोलणे, संवाद करणे इत्यादींची प्रमाण कमी होत चालले आहे.

मोबाईल मुळे नातेसंबंधामध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये दुरावा पसरत चालला आहे. एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा सण उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व जण मोबाईलचा वापर करत आहेत.

आज मोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांना मोबाईलचे व्यसन जडत आहे.  दिवसभर मोबाईल मध्ये गेम  खेळणे, व्हिडिओ  पाहणे, पिक्चर पाहणे त्यामुळे डोळ्यांना त्रास होत आहे.

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे विकार यांच्या समस्या वाढत आहेत. तसेच डोके दुखी, पाठीचा कणा दुखणे, डोळे चुरचुरणे या समस्यांचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

तरुण पिढी मोबाईलचा वापर  हा वाईट मार्गावर जाण्यासाठी करत आहे त्यामुळे आजची तरुण पिढी खूप बिघडली आहे. मोबाईल च्या अती वापरामध्ये चिडचिडेपणा येतो. तसेच नातेवाईकांमध्ये, कुटुंबामध्ये दुरावा पसरत आहे.

लहान मुले सुद्धा अभ्यास पूर्ण झाल्यास मोबाईल खेळण्यासाठी मागतात. इतकेच नव्हे तर काही मुलांना मोबाईलचे इतके वेड आहे की ते कुठलेही कृत्य करायचे म्हटले की पहिले मोबाईल मागतात जसे की, जेवण करायचे म्हंटले तरीही त्यांना त्यांच्या हातात मोबाईल द्यावा लागतो तरच ते जेवण करते. त्यामुळे लहान मुलांना देखील लहान वयामध्ये चा मोबाईल चे व्यसन जोडत आहे.

अशाप्रकारे मोबाईलला आपल्यासाठी चांगला आणि वाईट दोन्ही करू शकतो. पण ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण मोबाईलचा वापर कसा करावा. त्यामुळे  मोबाईल चा सदुपयोग केला तर मोबाईल आपल्यासाठी वरदान ठरू शकतो. अन्यथा मोबाईल एक शाप ठरू शकतो.

तर मित्रांनो ! ” मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही पण चालले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi”

Leave a Comment